Yogasana and Precautions

Yogasana and Precautions १) दैनंदिन जीवनात आपल्याला अधिक कार्यक्षमतेने राहावयाचे असल्यास आपले शरीर व मन निरोगी असणे अत्यावश्यक आहे ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे.


२) योग शिकवणाऱ्या जाणकार व अनुभवी व्यक्तीकडून योगातील प्रक्रिया शास्त्रशुद्ध आहेत की नाहीत हे जाणून घेतले पाहिजे.


३) ज्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे अशा लोकांकडून योगाभ्यास करताना कोणत्या अडचणी येतात?’, ‘कोणते चांगले अनुभव येतात?’ या मुद्द्याविषयी चर्चा केली पाहिजे.


४) योग हे प्रत्यक्ष अनुभूतीचे शास्त्र असल्याने योगातील सोप्या शुद्धिक्रिया,सोपी आसने आधी शिकून नंतर अवघड आसने, प्राणायाम, धारणा,ध्यानाच्या अभ्यासाकडे वळले पाहिजे.


५) शरीराला रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा शरीराला रोग होऊच नयेत असा स्वास्थ्याचा विचार करणारे हे शास्त्र आहे हे जाणून घेऊन इतरांना त्याचे महत्त्व पटवून सांगून योगशास्त्राचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.


६) काही रोग उदा, ब्लडप्रेशर (रक्तदाब), डायबेटीस (मधुमेह),अॅसिडिटी (आम्लपित्त), बद्धकोष्ठता, निद्रानाश, मानसिक दौर्बल्य,नैराश्य अशा रोगांना मनोकायिक रोग (सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स)असे म्हणतात. योगातील काही आसने, प्राणायाम, ध्यान, ओंकारजप इ. क्रियांनी वरील रोगांचे नियंत्रण करता येते.(योगाभ्यास करताना)

Yogasana and Precautions

Yogasana and Precautions
Yogasana and Precautions


१) पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे (अंदाजे ५ वा)
२) चूळ भरून १ ग्लास पाणी हळूहळू प्यावे. (तांब्याभर नको) तांब्याच्या भांड्यात, चांदीच्या भांड्यात साठवलेले उत्तम)-भांडी स्वच्छ घासून रात्री
पाणी भरून ठेवावे.
३) प्रातर्विधी आटोपून शुभ्र, सैलसर सुती कपडे घालावेत, घट्ट कपडे घालू नयेत. टेरिलीन, टेरिकॉट, पॉलिस्टरचे नको.
४) आंघोळीनंतर कॉटनच्या खरखरीत टॉवेलने अंग स्वच्छ पुसावे. म्हणजे शरीरावरील केसांच्या मुळाशी असणारी रोमरंध्रे उघडी होतील व त्यातून
श्वसन सुरू होईल.
५) योगाभ्यास करताना पोट रिकामे असावे. दूध, चहा, कॉफी घेऊन नाष्टा घेऊन योगाभ्यास करू नये. फक्त पाणी एक ते दीड तास अगोदर घ्यावे.
(अपवाद – अतिवृद्ध लोक व मधुमेही रुग्ण)
६) योगाभ्यास करण्यापूर्वी पोहायला जाणे, जीमला जाणे, जोरदार व्यायाम करून, जॉगिंग करून, कुस्ती, ज्यूदो कराटे इ. करून योगाभ्यास करू नये.

Yogasana and Precautions योगाभ्यास करताना पुरेशी मोकळी हवेशीर समतल प्रकाश येणारी प्रसन्न, स्वच्छ जागा निवडावी. तिथे जवळपास फार रहदारीचा रस्ता व गोंगाट नसावा. तिथे डास, माशा, मुंग्या, कीटक असू नयेत.
पंखा वा ए.सी. लावून योगाभ्यास करू नये.Yogasana and Precautions


1) जमिनीवर ब्लँकेट, जान (घोंगडीचे जाडसर स्वरूप), चादर, मऊ जमखाना,
गोधडी, रजई इ. पसरून पूर्व किंवा उत्तर दिशेस तोंड करून योगाभ्यास सुरू करावा.


२) सुरुवातीस आपल्या देवतेची प्रार्थना, स्तोत्र, मंत्र (जप) म्हणावा म्हणजे मन श्रद्धेने लवकर एकाग्र होते व योगाभ्यासास पूरक, अनुकूल अशी मनोभूमिका तयार होते. रोज जागा बदलू नये.


3) योगाभ्यास करण्यापूर्वी आपले वय, हवामान, होणारा त्रास यानुसार आसने निवडावीत. मुद्रा, बंध, शुद्धिक्रिया इ. गोष्टींचा क्रम लिहून काढून योगाभ्यास
सुरू करावा. अर्थातच यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.


4) सकाळी पोट रिकामे असतानाच योगाभ्यास करणे सर्वोत्तम. परंतु ज्यांना सकाळी जमत नाही किंवा जे रात्रपाळी करतात अशा लोकांनी सायं. ५
वा. (म्हणजे दुपारच्या जेवणानंतर ४ ते ५ तासांनी) योगाभ्यास सुरू करावा.


5) टी.व्ही. बघत, कोणाशी तरी बोलत, रागाच्या भरात, रेडिओ, टेप लावून(हल्ली एरोबिक्स करतात तसे) योगाभ्यास करू नय


6) अगदी लहान वयात (१६ वर्षाच्या खाली) व वृद्धापकाळी ६० वर्षांच्या वर कठीण अवघड आसने शुद्धिक्रियांचा अतिरेक करू नये.


7) आधी स्नान केले नसल्यास योगाभ्यासानंतर शवासन करून तासाभराने स्नान करावे. शक्यतो स्नान करूनच योगाभ्यास करावा हे उत्तम.


8) योगाभ्यास झाल्यावर आपल्या शरीर व मनाच्या ठिकाणी झालेली व स्वतःला जाणवलेली प्रगती एका कागदावर लिहून ठेवावी. (योगडायरी)


9) योगासने, प्राणायाम या शास्त्रीय व विज्ञानानुकूल प्रक्रिया आहेत. त्यांचा परिणाम शरीराबरोबरच मन व संप्रेरकांवरसुद्धा होत असतो. त्यामुळे या
क्रिया योगतज्ज्ञ, जाणकार व अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली कराव्यात.


10) योगाभ्यास केल्यानंतर उत्साह वाटला, शरीर हलके वाटले, स्फूर्ती आली,तर निश्चितपणे समजावे की, योगाभ्यास व्यवस्थित झाला आहे.फिरण्याचा (चालणे) व्यायाम चालतो, त्यानंतर शवासन करून मग योगाच्या सरावाला प्रारंभ करावा,


11) योगाभ्यास झाल्यानंतरसुद्धा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नये,


12) योगाभ्यास करताना मेंदू स्वस्थ व दक्ष असावा,


13) योगाभ्यासात श्वास उच्छ्वास नाकानेच करावा, कारणपरत्वे तोंडाने करावा,
उदा. नाक गच्च, दमा, धाप


14) आरसा समोर ठेवून आसने करावीत म्हणजे चुका लक्षात येतात,काच जमिनीवर टेकलेली असावी.


15) प्राणायाम, धारणा आणि ध्यानाचा अभ्यास करताना डोळे अलगद मिटून बंद ठेवावेत.


16) रोज योगाभ्यास ठराविक वेळी व ठराविक ठिकाणीच करावा म्हणजे मनाचीएकाग्रता वाढते.


17) स्वतःचे वय, ताकद, वजन, हवामान, क्षमता, लवचिकता, ऋतूह, गोष्र्टीचे भान ठेवून अचूक, काटेकोरपणे योगाभ्यास करावा.


18) जोराचा ताप, धाप, सर्दी, खोकला, पाठदुखी, कंबरदुखी, थकवा असताना आसने करू नयेत. अशावेळी प्राणायामसुद्धा करू नये, धारणा व ध्यानाचा सराव तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.


19) योगाभ्यास पूर्ण झालेनंतर एक तासाने पाणी घ्यावे किंवा द्रवपदार्थ घ्यावा.उदा. लिंबू पाणी, मध पाणी इ. (तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार)


20) योगाभ्यास संपलेनंतर वाद, भांडण, प्रवास करू नये.


21) योगाभ्यास झालेनंतर मोठ्याने हाका मारणे, ओरडणे, हसणे, जोरात गाडी चालविणे, वजन उचलणे, धावणे, भरभर जिना चढणे, उतरणे टाळावे.


22) भर उन्हात, कडाक्याच्या थंडीत व जोरदार पावसात फिरू नये.


23) योगाभ्यास करताना लघवी वा शौचाचे वेग आल्यास रोखू नयेत. तसेच वायू (गॅसेस), जांभई, शिंक इ.चे वेगसुद्धा रोखू नयेत. क्रिया तिथेच
थांबवून हे वेग बाहेर जाऊ द्यावेत व पुन्हा स्वच्छ होऊन योगाभ्यास करावा.


24) योगाभ्यास सुरू केल्यानंतर ब्लडप्रेशर, हृदयविकार, डायलेसीस, दमा, संधिवात इ. वरच्या गोळ्या, इंजेक्शन्स तात्काळ बंद करू नयेत.

तज्ज्ञांच्या सल्ल्याने हळूहळू त्यात बदल करावा,


परंतु जीवाणू व विषाणू संसर्गाने येणारे ताप, रक्ताचा कॅन्सर, एड्स यासारखे विकार योगशास्त्राने बरे होत नाहीत. रुग्णांना केवळ थोड्याफार प्रमाणात बरे वाटते.त्यांचे मानसिक संतुलन सुधारते असे अनुभवास आले आहे.

त्यामुळे योगासनाने लगेच मला या विकारातून मुक्ती मिळेल अशा भ्रमात राहून नंतर भ्रमनिरास झालेने योगशास्त्राची निष्कारण बदनामी होते. त्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाकावा.

सांधेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, पचनाचे विकार, ऑॅसिडिटी, बद्धकोष्ठ, फिशर.दमा, अर्धशिशी, काही मानसिक विकार, मणक्यांचे विकार यावर योग हा रामबाण उपाय असल्याचे जगातील सर्व तज्जञ चिकित्सक आवर्जून सांगताहेत.

हाच या शास्त्राच्या परिणामकारकतेचा स्पष्ट आधार आहे. योगशास्त्राचा नियमित अभ्यास,जोडीला योग्य, ताजा सकस आहार व योग्य विहार या गोष्टींनी माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जीवनशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो असे दिसून आले आहे. त्यामुळे रोग झाल्यावर योगाभ्यासाकडे वळण्यापेक्षा रोग होऊच नये हा दृष्टिकोन ठेवून २४ तासांपैकी एक तास योगाभ्यासासाठी दिल्यास आपण उरलेल्या २३ तासांचे राजे होऊ शकतो.

हठप्रदीपिकेत म्हटल्याप्रमाणे योगाभ्यास हा तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी,अशक्त अथवा दुर्बल यापैकी कोणतीही व्यक्ती करू शकते. मात्र तो नियमितपणे केला पाहिजे. ही अट मात्र पाळावी लागते.


१६ वर्षांखालील मुलांनी योगाभ्यास करू नये. कारण त्यांची हाडाची वाढ पूर्ण झालेली नसते तसेच योगाभ्यास करण्यासाठी आवश्यक परिपक्व मनही त्यांच्याजवळ नसते. काही पालक ओढूनताणून त्याला योगाभ्यासासाठी पाठवतात. त्यांचे वय खेळण्याबागडण्याचे, मुक्त स्वच्छंद विहार करण्याचे असल्याने जबरदस्तीने त्यांना योगाभ्यास करायला लावल्यास त्यांच्या मनातया शास्त्राविषयी द्वेष उत्पन्न होतो.

अशी मुले पुन्हा कधीच योगाभ्यासाकडे न वळण्याची शक्यता वाढते.

त्यामुळे १२व्या वर्षांनंतर सूर्यनमस्कार, ॐकार जप इ.सोप्या क्रिया सांगाव्यात व त्याचे फायदे समजावून सांगावेत. या क्रिया त्यांनी मनःपूर्वक केल्यास फायदा होईल.

अभ्यासात एकाग्रता होईल. परीक्षेत यश मिळेल अशा रीतीने त्यांच्या मनाची तयारी करून त्यांना सावकाश, मुंगीची चाल या गतीने योगाभ्यासाकडे वळवावे.Yogasana and Precautions

2 thoughts on “Yogasana and Precautions”

Leave a Comment

%d bloggers like this: