Worry Free Jivanasathi उपाय

स्वाध्याय

Worry Free Jivanasathi उपाय सर्वप्रथम तुम्हाला नियमितपणे वापरता येईल अशी एखादी वही, डायरी किंवा जर्नल विकत घ्या. एखादी दोन कप्प्यांची किंवा चार कप्प्यांची स्पाइरल बांधणीची (स्पायरल बाइंडिंग) वही तुमच्या कामासाठी वापरण्याची कल्पना चांगली आहे.

एकतर त्यामुळे तुम्हाला लिखाणातील सलगता राखता येईल आणि दुसरं म्हणजे हवे तेवढे पृष्ठविभाजक असल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेळी लिहीणं सोयीचं असेल.

कृती क्र. १:

Worry Free Jivanasathi उपाय
Photo by Zachary DeBottis on Pexels.com Worry Free Jivanasathi उपाय

पहिला विभाग तुमच्या ध्येयाचं किंवा उद्दिष्टांचं टिपण करण्यासाठी राखून ठेवावी. तुम्ही खास करून विविध कप्प्यांची वही वापरणार असला,तर त्यावर तशी खूण करा.एकाखाली एक असं लिहून तुमच्या सर्व ध्येयांची एक यादी बनवा.

नमूद करावयाच्या ध्येयांच्या संख्येवर कसलीही मर्यादा नाही. तसंच त्यांच्या स्वरूपावर व व्याप्तीवर कसलंही बंधन नाही.

Worry Free Jivanasathi उपाय बऱ्याचदा असं होतं की, व्यावहारिक अडचणीच्या सबबीखाली किंवा ध्येयपूर्तीसाठीचा कालावधी, तसंच आपली कुवत यांवर स्वत:च स्वत:वर घातलेल्या मर्यादांमुळे, आपण ध्येयांपासून विचलित होतो.
ज्या ध्येयांनी आपल्याला प्रेरित केलेलं असतं आणि जी गाठण्यासाठी आपण उत्सुक असतो, त्यापासून विचलित होण्यास – आपणच कारणीभूत होतो.Worry Free Jivanasathi उपाय

म्हणून तुमच्या विचारांना साचू न देता उड्डाणासाठी हलकासा धक्का द्या,

तुम्ही आपली उद्दिष्टं कागदावर उतरवू लागाल, तेव्हा तुमच्या व्यवसायातल्या तुम्ही ठरविलेल्या उद्दिष्टांनी सुरुवात करा. ती तुम्हाला उद्दिष्टसाधनेच्या मार्गावर
व्यग्र ठेवतील.

त्यात तुमचा सुरुवातीचा पगार, तुमची वेतनवाढ, कंपनीच्या महत्त्वाच्या ग्राहकांना किंवा अशिलांना धरून ठेवण्यासाठीची युक्ती,अशा अनेक उद्दिष्टांचा समावेश असू शकतो.

कंपनीच्या वार्षिक विक्रीच्या संदर्भात निशाणाच्या मध्यावर मारायचा नेम, कंपनीच्या भागधारकांना अहवाल देण्यासाठी ठरवलेला अबकड इतका नफा, प्रत्येक शेअरवरील कंपनीच्या नफ्यातली अपेक्षित
वाढ यांसारखी काहीही कारणं असू शकतात.
ज्याखेरीज, कंपनीतील तुमच्या टीममधला अंतर्गत संघर्ष कमी करून ती अधिक कार्यक्षम बनवणं, हेदेखील तुमच्या यादीत बसू शकतं.

ही झाली प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणची उद्दिष्ट्ये.

आता कार्यस्थळाबाहेरील उद्दिष्टं.

ती तुमच्या व्यवसायातील नामांकित नाममुद्रा
असलेल्या कंपनीसाठी काम करण्याची इच्छा किंवा सिंगापूरमधील आकाशीच्या चंद्रासमान वाटणारी नोकरी पटकावणं यांसारखी कित्येक असू शकतात.

चाकोरीबाहेरील छंद जपणारी उद्दिष्टं असू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रसिद्ध म्युझिक बँडमध्ये सहभागी होणं, एखाद्या नामांकित ललित कला विद्यालयात कलार्जन करण्याची संधी मिळवणं, सेंद्रिय पद्धतीनं फलोत्पादनाचा व्यवसाय, उपजीविकेचं साधन बनवण्यासाठी घराकरिता भरावयाचे कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फेडणं.

तुमची सगळीचं स्वप्न’ उत्तुंग आयुष्य बदलून टाकणारी असायला हवीत,असं नाही. मैलाचा दगड म्हणता येईल अशा लहानसहान स्वप्नांचादेखील तुमच्या
यादीत समावेश करू शकता. तुमच्या मनात असलेली एखाद्या गोष्टीची प्रस्तुती,थोडक्यात सर्वकष, यादी बनवा. तिच्यावर कोणतीही मर्यादा नको.

कृती क्र. २:

Worry Free Jivanasathi उपाय आता प्रत्येक उद्दिष्टावर/ध्येयावर/स्वप्नावर ‘समाप्त’ची तारीख लिहा. तुम्ही जे काही साध्य करायचं ठरवलं आहे, ते पूर्ण करण्यासाठी किंवा प्रत्यक्षात
उतरवण्यासाठी ती तुम्ही स्वत:ला दिलेली मुदत असेल. अर्थात, तुम्ही ठरविलेल्या अंतिम तारखेच महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा किंवा अगदी दररोजदेखील पुनरावलोकन करू शकता. निर्णय तुमचा असेल.Worry Free Jivanasathi उपाय

एक मात्र पक्कं ध्यानात ठेवा की, काही कारणांनी ठरविलेल्या कालावधीत तुमची ध्येयपूर्ती झाली नाही, तर ती बाब तुमचं मनःस्वास्थ्य बिघडवण्यास अजिबात कारणीभूत होता कामा नये. उलट, तुमचं स्वप्न साकार व्हावं, म्हणून तुमच्या आसपासची सकारात्मक ऊर्जा प्रयत्नशील आहे, याविषयी कृतज्ञता बाळगा.अर्थात, त्यासाठी तुम्हाला सतत आशावादी राहून आयुष्यातील इतर अंगांची
सर्वतोपरी कष्ट घेऊन काळजी घ्यावी लागेल.

आत्तापर्यंत तुमच्या वाट्याला काय
आलं आणि तुम्ही याआधीच काय मिळवलं, यावर लक्ष केंद्रित करा.

कारण तुमच्यातल्या कृतज्ञतेच्या भावनेला उजाळा देण्याचा हाच क्षण असतो.

एखादी जादूची कांडी वापरून आशावादी राहता येत नाही. त्यासाठी तुमच्यासमोर उद्दिष्टं लागतात. ती कागदावर उतरवलेली असावी लागतात.

भले ती वेळेत सफल झाली नाही तरी चालते. पण ती समोर असतील तर निराश न होता एकचित्ताने उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने प्रयत्न करणं सोपं होतं.

तुमची ध्येयं कागदावर लिहून काढल्याने तुमच्या बुद्धीचं सामर्थ्य विधायक आणि सकारात्मक दिशेने काम करण्यास शिस्तबद्ध होतं. तसंच त्यामुळे तुमच्या अंतिम ध्येयावर एकत्रित राहण्यास मदत होते.

ध्येयावरच्या एकाग्रतेचं सातत्य अतिशय महत्त्वाचं आहे.त्याच्याविना आयुष्य हा नशिबाचा खेळ असून, त्यात तुमच्या निवडीला कसलाही मार्ग असतो.

कृती क्र. ३:

पुढच्या पायरीत तुमच्या कृतज्ञतेच्या किंवा आनंदाच्या भावनांना शब्दरूप देण्यासाठी तुमच्या वहीतला दुसरा भाग राखून ठेवावा,

प्रतिरात्री, न चुकता, दिवसभरातल्या तुम्हाला कृतज्ञ किंवा आनंदी वाटावयास लावणाऱ्या तीन किंवा पाच गोष्टी लिहून काढा. त्या आकड्यात सातत्य राखा.

तुम्ही तीन गोष्टीचं स्वरूप ठरवलं असेल, तर ते तसंच ठेवा. तीन आणि पाच यांमध्ये अदलाबदल करत राहू नका तुमच्या आनंदाची आणि कृतज्ञतेची कारणं विविध असू शकतात, अगदी निर्णायक किंवा मूलभूतपासून सामान्य किंवा अगदी रटाळ म्हणता येईल इथपर्यंत.

उदाहरणार्थ, रसाळ आणि मधुर स्वादाच्या आंब्याच्या
जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीसारख्या साध्या गोष्टीपासून,
आठ आकडी पगाराच्या घसघशीत बक्षिसासारखा अधिक गुंतागुंतीच्या गोष्टीपर्यंत साऱ्यांना समाविष्ट करून
घेतो.
कधी-कधी माझ्या खास दोस्तांसोबत विलक्षण
मजेत घालवलेली एखादी सामान्य संध्याकाळ,तर कधी ऑफिसमधलं एखादं किचकट काम कौशल्याने हाताळल्यामुळे झालेली प्रशंसा,

तुमच्या आनंदाच्या कारणांची एक यादी बनवा.
नंतर तुमच्या कृतज्ञतेच्या भावनांमागच्या घटनांची नोंद करा.
तुमच्या प्रत्येक विधानाची सुरुवात ‘मी इतकी
आनंदात आहे…’ किंवा ‘मी मनापासून कृतज्ञ आहे…’ अशी व्हायला हवी.

उदाहरणार्थ, ‘वेदान्तच्या पार्टीत माझा वेळ इतका सुरेख गेला, की मन आनंदाने भरून आलं’ किंवा ‘आज मला एका हेडहंटर कंपनीकडून बोलावणं आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.’

सारांश काय,

Worry Free Jivanasathi उपाय तर ही यादी तुमच्या ध्येयसिद्धीच्या मार्गावरील दीपस्तंभ आहे. ध्येय साध्य झाल्यावर आनंदाच्या डोहात हरखून जाणं स्वाभाविक असले,तरी त्या खडतर मार्गावरचा प्रत्येक मैलाचा दगडदेखील आनंदाचा ओघळ असतो.हे समजून खुल्या मनाने ते स्वीकारण्यास ही यादी मोलाचा हातभार लावते.Worry Free Jivanasathi उपाय

आपण आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासाची मजा घेत आहोत, याची तुम्हाला जाणीव करून देण्यास ही यादी निश्चितच उपयोगी पडेल.Worry Free Jivanasathi उपाय

Leave a Comment

%d bloggers like this: