Worry free 5 mintaat

तुमची चिंता दूर करा 5 mintaat
तुमची चिंता दूर करा 5 mintaat

Worry free 5 mintaat

Worry free 5 mintaat शुद्ध चेतना जाणणे

Worry free 5 mintaat तुमची चिंता दूर करा 5 mintaat तुम्ही मनाला पाहता तेव्हा मनाच्या स्वरूपापासून तुमची जाणीव वेगळी करता आणि मग तुम्ही केवळ साक्षीदार राहता. रूपरंगाच्या पलीकडे असलेली विशुद्ध जाणीव असणारी तुमच्यातील साक्षीभावना बळकट बनते आणि म्हणून भ्रामक मानसिक प्रतिमा कमकुवत होते.Worry free 5 mintaat

मनाला पाहा, असं आपण म्हणतो तेव्हा तो अगदी वैयक्तिक अनुभव असतो; पण त्याचं महत्त्व वैश्विक रूपाचे असतं. तुमची जाणीव एखाद्या रूपाशी एकरूप झालेली असते. त्यातून तुम्ही बाहेर पडता.

रूपापासून तुमची जाणीव बेगळी होते.

भविष्यात घडू पाहणाऱ्या एखाद्या घटनेपासून तुम्ही मुक्त होता.अशा घटनेचा जगाचा अंत’ असे वर्णन करता येईल.

दैनंदिन जीवनात नित्य वर्तमानात जगा ते तुम्हाला खोलवर अंतरंगात नेण्यास सहायक ठरतं. नसता काय होईल ? तुमचं मन, जे अत्यंत चंचल असतं ते तुम्हाला बेफाम वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात बुडवून टाकील.

वर्तमानात राहणं म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या शरीराच्या अस्तित्वात पूर्ण बुडून जा. तुमच्या शरीरात आंतरिक ऊर्जाक्षेत्र आहे, त्याकडे लक्ष द्या. म्हणजेच शरीराला आतून जाणून घ्या. शरीराबद्दल जागृत असण्यानं तुम्ही वर्तमानात राहता, वर्तमानाशी ते तुम्हाला धरून ठेवतं.

जे शरीर तुम्ही पाहता, स्पर्शिता ते तुम्हाला तुमच्या अस्तित्वात नेऊ शकत नाही. दृश्य आणि मूर्त शरीर हे बाह्य कवच आहे किंवा खोलवरअसलेल्या वास्तवाचे मर्यादित आणि विरूप दर्शन आहे.

तुम्ही तुमच्या अस्तित्वाशी सहज संबंधित असता. त्या वेळी खोलवरचं वास्तव अदृश्य व आंतरिक शरीराच्या
रूपानं प्रत्येक क्षणाला तुम्हाला जाणवतं ते तुमच्च्यातील सचेतन अस्तित्व असतं.

म्हणजेच” शरीरात वास करा’ याचा अर्थ शरीराचा आतून अनुभव घ्या,जीवन जाणून घ्या आणि मग तुम्हाला जाणवेल की, तुम्ही तुमच्या बाह्य शरीररूपाच्या पलीकडे आहात.

तुमचे मन तुम्हाला गुंतवून ठेवतं तोवर तुम्ही तुमच्या अस्तित्वापासून तुटलेले असता आणि असं ज्या वेळी घडतं त्या वेळी तुम्ही तुमच्या शरीरात नसता,

असं सामान्यपणे सर्वांच्या बाबतीत नेहमी घडतं. तुमचं सगळे लक्ष आणि सगळी जाणीव मनानं काबीज केलेली असते, मन म्हणजेच तुम्ही अशी स्थिती येते तुम्ही विचारांचं चक्र थांबवू शकत नाही.

तुमच्या अस्तित्वाचं भान तुम्हाला होण्यासाठी हे भान, चित्त- मनापासून हीरावून घेणं आवश्यक असतं. आध्यात्मिक प्रवासाचं हे एक अत्यावश्यक:पण कठीण काम असतं. तुमची सगळी जाणीव, सगळी चेतना निरर्थक आणि टाळता न येणाच्या विचारात गुरफटलेली असते.

ती जाणीव एकदा का मुक्त झाली की तुमचे अफाट चैतन्य मुक्त होतं. हे करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे झाली;विचारापासून दूर जाऊन,

तुमची चिंता दूर करा 5 mintaatतुमचं सर्व लक्ष शरीरात आंतरिकतेकडे केंद्रित करणं.त्यामुळे तुमच्या बाह्य शरीराला जीवनाचा पुरवठा करणारं जे अदृश्य ऊर्जाक्षेत्र
आहे त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवू लागेल.तुमची चिंता दूर करा 5 mintaat

          आंतरिक शरीराशी नातं जोडणं


आता प्रयत्न करा. यासाठी आपले डोळे बंद करणं उपयुक्त राहील. हळूहळू सतत साधना करून शरीरांतर्गत अस्तित्व तुम्हाला सतत जाणवू लागेल. त्यानंतर अशा प्रयोगाची गरज भासणार नाही.

शरीराच्या आत तुमचं चित्त वळवा शरीराला आतून जाणून घ्या.जिवंत आहे ना ते? तुमच्या हातात, बाहूत, पायात चैतन्य जाणवतं ना? तुमच्या पोटात, छातीत जिवंत असण्याची जाणीव होते ना?

तुमच्या शरीरभर तरल ऊर्जाक्षेत्र विस्तारल्याचं तुम्हाला जाणवतं ना? तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला आणि प्रत्येक पेशीला ताजातजेलपणा जाणवतो ना? संपूर्ण शरीरभर एकच ऊर्जाक्षेत्राचा अनुभव तुम्हाला येतो ना?

शरीराच्या आत काही क्षण आपलं लक्ष केंद्रित करा; मात्र त्याबाबतचा विचार करायचा नाही. केवळ त्याला अनुभवा. तुम्ही तुमच्या आत जितक लक्ष द्याल तितकी स्पष्टता तुम्हाला जाणवेल आणि अशी जाणीव जास्त बळकट होत जाईल. तुमची प्रत्येक पेशी जास्त जिवंत झाली आहे असा अनुभव येईल आणि तुमची दृष्टीच बळकट असेल तर तुमचं शरीर प्रकाशमान होत असल्याची जाणीव तुम्हाला होईल.

Worry free 5 mintaat अशी प्रतिमा तात्पुरतीच उपयोगी पडू शकेल;मात्र तुम्ही प्रतिमेची काळजी न करता जाणिवेवर जास्त लक्ष द्या. प्रतिमा मग ती कितीही सुंदर आणि दृढ असो, तिला आकार असतो आणि यामुळं तुम्ही प्रतिमेतच अडकाल व शरीरात खोलवर आत जाण्यास काही वाव मिळणार नाही.Worry free 5 mintaat

एखार्ट टॉल

3 thoughts on “Worry free 5 mintaat”

Leave a Comment

%d bloggers like this: