Worry free कसे व्हाल 2020
Photo by Samuel Silitonga on Pexels.com


                           ध्यानाची वेळ
Worry free कसे व्हाल 2020 तूम्ही ध्यानाला बसता त्यावेळी लक्ष विचलित करणारं असं काही जवळपास असू देऊ नका. फोन बाजूला काढून ठेवा. मन सगळ्या गोष्टीपासून अगदी मुक्त करा,ध्यानाच्या ठीकाणी जाल त्यावेळी चपला काढन ठेवा. कारण पवित्र स्थानावर तुम्ही बसणार
आहात.मन ज्या ज्या गोष्टीत गुंतलय ते सगळ बाजूला करा. अगदी जाणीवपूर्वक हे करा. व्यस्ततामुक्त व्हा. अव्यस्तस्थितीत ध्यानात जा.रोज चोवीस तासात केवळ एक तास काढायचा. बाकीच्या तेवीस तासात आपलाव्यवसाय, आपल्या इच्छा, आपले विचार, महत्त्वाकांक्षा यात व्यतीत करा.तुम्हाला जाणवेल की ध्यानासाठी काढलेला एक तासच तुमच्या आयुष्यातील वास्तविक काळ आहे. एकच तास तुम्ही वाचवता,


                         उपयुक्त स्थान
तुम्ही अशी एखादी जागा निवडा की जी ध्यानाच्या वृद्धीला उपयुक्त असेल. जसे एखाद्या वृक्षाखाली बसणं उपयुक्त असेल. सिनेमागृहात किंवा रेल्वेस्टेशन परिसरात बसण्यापेक्षा निसर्गाच्या वातावरणात, पहाडावर, नदीजवळ अशा जागी जा. त्या वातावरणात ताओ (निसर्गाची शक्ती) चोहीकडे स्पंदित आहे, प्रवाहित आहे. वृक्ष पाहा. तो सतत ध्यामग्न असतो. ते ध्यान मौनात आणि अचेत अवस्थे असतं. तुम्ही वृक्ष व्हा असं मी म्हणत नाही. तुम्हाला बुद्ध व्हायचंय मात्र बुद्धात वृक्षासारखी एक बाब आहे. तोही वृक्षासारखा हिरवागार आहे, रसपूर्ण आहे. वृक्षासारखाच उत्साहित आहे.मात्र एक फरक आहे तो लक्षात घ्या. वृक्ष झोपलेले, निद्रित आहेत. तर बुद्ध जागा आहे.एखादा वृक्ष आहे, त्यावर सुंदर पक्षी गात-बागडत आहे, बाजूला मोर नाचतो आहे,किंवा एखादी नदी वाहत आहे, प्रवाहाचा नाद ऐकू येत आहे, किंवा एखादा धबधबा आहे,त्याचं महासंगीत आहे. ध्यानाला अगदी उपयुक्त स्थान आहे.निसर्ग शुद्ध आहे, प्रदूषणरहित आहे आणि हे शक्य नसेल तर आपल्या खोलीत दार बंद करून बसा. शक्य असेल तर आपल्या घरात एक विशिष्ट जागा ध्यानासाठी राखून ठेवा.घरात गर्दी असेल तर एखादा छोटा कोपराही चालू शकतो. मात्र तो केवळ ध्यानासाठीच वापरला जावा. कारण विविध कृत्ये असतात आणि प्रत्येक कृत्ये आपल्या लहरी निर्माण करीत असतं. विशिष्ट जागा केवळ ध्यानासाठीच वापरली तर ती जागा ध्यानमय बनते.तुम्ही ध्यान करता त्यावेळी ज्या लहरी निर्माण होतात त्या ती विशिष्ट जागा आत्मसात करीत असते. पुन्हा तुम्ही त्या जागी ध्यानासाठी बसता तेव्हा या लहरी तुमच्याकडे येऊ लागतात. त्या तुम्हाला सहयोग देतात, प्रतिसाद देतात.एखादी व्यक्ती पूर्ण ध्यानी बनते तेव्हा ती व्यक्ती सिनेमागृहात असो किंवा रेल्वेस्टेशनवर देखील सहजपणे ध्यान करू शकतो.पंधरा वर्ष सतत मी देशभर भ्रमंती करीत राहिलो. दिवस आले अन् गेले, वर्षे आली अन् गेली. कधी रेल्वेनं, कधी विमानानं कधी मोटारनं सतत फिरत होतो. त्यानं काही फरक नाही पडत. तुम्ही एकदा ‘स्व’ मध्ये आत्मस्थित झालात तर मग काही फरक पडणार नाही;परतु नवीन साधकाला एकदम हे जमणार नाही.वृक्ष जेव्हा आपली मुळें भक्कमपणे पक्की जमिनीत गाडतो. मग वादळ येवो की प्रचंड पाऊस, काही परिणाम होणार नाही. उलट यामुळं वृक्ष मजबूत होतो. परंतु झाड लहान असतात, कोमल असतात तेव्हा लहान पोरापासून देखील त्यातील धोका असतो. एखादी रस्त्यानं जाणारी गायदेखील त्याला नष्ट करण्यास पुरेशी आहे.सुखासनात बसा शरीराची स्थिती इतकी सुखासनम् असावी की तुम्हाला शरीराचं भान नसावं. अगदी विश्रांत, आरामदायी. म्हणजे नेमकं काय? तुम्ही आपल्या शरीराचं अस्तित्व विसरता ती स्थिती आरामदायी असते. तुम्हाला सतत शरीराची जाणीव होते त्यावेळी तुम्ही कष्टात असता. मग तुम्ही खुर्चीवर बसा की जमिनीवर त्याला महत्त्व नाही. तुम्ही अगदी आनंदी स्थितीत राहावं कारण तुमचं शरीर आनंदी स्थितीत नसेल, तर ज्याचा संबंध खोल तळाशी असतो असा हेतू पूर्ण होणार नाही. अगदी आरंभीच्या पातळीवरच तुमची गडबड होईल.मग आणखी खोलवर जाण तर दुरच.ज्याला आंतरिक आनंदापर्यन्त पोहोचन्याचा प्रयत्नं करायचाआहे त्यांच शरीर सहज सुलभ स्तितिथ असने आवश्यक आहे!जी स्थिती सरळ, सुलभ तुम्हाला वाटते त्या स्थितीपासून सुरू करा.तुम्ही एकदमच केवळ बसायला सुरुवात करू लागलात तर बेचैन होऊ लागाल. तुम्ही असं बसण्याचा जेवढा प्रयत्न कराल तेवढी तुमची बेचैनी वाढेल. आणि मग आपलं विक्षिप्त मनच तुम्हाला आठवेल, दुसर काही नाही. यातून दुःख निर्माण होईल, तुम्ही हताश व्हायला लागाल, आनंदित असण्याच्या अनुभवापासून दूर जात राहाल तुम्ही स्थिर बसता त्यावेळी तुम्हाला आंतरिक विक्षिप्ततेची जाणीव होते. हे तुम्ही निष्ठेनं चालू ठेवलं तर खरंच विक्षिप्त होऊ लागाल. असं पूर्वी बऱ्याचदा घडलं आहे. म्हणून तुम्हाला निराशा वाटेल, दुःख होईल, उदास वाटेल असा कोणत्याच प्रकारचा सल्ला मी देत नसतो.आपली विक्षिप्तता जास्त जाणवेल असं काही सांगत नसतो. कारण आपल्यातील विक्षिप्ततेची जाणीव सहन करण्याची तुमची तयारी असणार नाही.काही गोष्टी तुम्हाला हळूहळू समजू दिल्या पाहिजेत. ज्ञान सदा शुभ असत नाही.हळूहळू ते पचविण्याची तुमची क्षमता वाढेल तसं ते ज्ञान फुललं पाहिजे.मी सुरुवात करतो तुमच्या विक्षिप्तपणापासून, तुमच्याआसनस्थितीपासून नाही.तुमचा वेडेपणा चालू द्या. तुम्ही  वेड्यासारखे नाचा, तुमच्या आत नैमक याच्या विरुद्ध अवतरेल.अत्यंत वेगानं तुम्ही नाचता तेव्हा तुमच्या आत शांत बिदूची जाणीव व्हायला लागते.तुम्ही शांत बसून राहा तर विक्षिप्तपणाचा अनुभव येऊ लागतो. नेहमी विरुद्ध विपरीत घडत असत.वेड्यासारखं, अगदी अव्यवस्थित नाचणं, रडणं, श्वास प्रक्रिया चालु ठेवन यातून तुम्हाला मी वेड होऊ देतो.बाह्य स्तरावरच्या वेडेपनातून तुम्हाला आपल्या आत ऐका गहन बिंदुची जाणीव होते तो बिंदू असतो शांत आणि स्थिर स्थितीचा. तुम्हाला खुप आनंदी वाटू लागेल, तुमच्या आत केंद्रबिंदूवर आतंरिक मौन तुम्हाला अनुभवाला येईल.तुम्ही सरळ ताठ बसाल तर आत विक्षिप्तता जानवेल.बाहेरुन शांत आणि आत मात्र विक्षिप्त अशी स्थिति होईल.तुम्ही विधायक, जिवंत, गतिमान असलेल्या सक्रिय ध्यानविधीनं आरम्भ करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.त्यामुळे तुम्हाला तुमच्या आत स्थिरतेचा विकास होतो याचा अनुमव येऊ लागेल. ही स्थिरता जितकी विकसित होईल तितका तुम्हाला बैठक आसन आडव पडण्याची स्थिती याचा उपयोग होईल. तुम्हाला अधिक शांत ध्यान विधी शक्य होईल;पन हे साधेपर्यंत स्थिती अगदीच वेगळी असेल,.सक्रियतेनं, गतिमानतेनं सुरू होणारी ध्यान पद्धत तुम्हाला इतर रूपान देखील उपयुक्त होईल. कारण यात एक प्रकारचे रेचन होते, तुम्ही जेव्हा बसता तेव्हा व्यथित होता कारण तुमचं मन तर चालू असते आणि तुम्ही तर आसनस्थ बसलेले असता,शरीरातील,प्रत्येक पेशी, प्रत्येक स्नायू ताणाचा अनुभव करतो, कारण जे तुमच्यासाठी स्वाभाविक नसतं ते लादण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असता. त्यामुळं स्वतः आणि स्थिती यात विभाजन होतं. आणि ज्या भागावर तुम्ही स्थिती लादू पाहता, जो भाग दाबू पाहता तो मौलिक असतो. दमन करणाऱ्या भागापेक्षा तो जास्त मूल्यवान आहे. आणि मग मूल्यवान भागाचा निश्चित विजय होईल.वास्तविक, तुम्ही ज्याचं दमन करीत आहात ते बाहेर फेकून द्यायच असतं, दाबायच नसतं. कारण तुम्ही त्याला सतत दाबत आले आहात. म्हणून ते सगळं तुमच्या आत साचून गेलेलं असतं. तुमचे सगळे संस्कार, सगळी सभ्यता आणि शिक्षण हे दमनकारी आहे.तुम्हाला सुयोग्य शिक्षण दिलं गेलं असतं, जागरूक माता पिता लाभले असते तर सहजपणे बाहेर फेकता येतं ते तुम्ही दाबून ठेवलंनसतं. तुम्ही अंतर्मनाविषयी अधिक सजग राहू शकला तर तुमची संस्कृती तुम्हाला बाहेर फेकून देण्यासारखं सहज फेकून देण्यास साह्यभूत ठरली असती. जस एखादं मूल रागात येतं तेव्हा ‘राग करू नकोस’ असं आपण त्याला सांगतो आणि ते मूल राग दाबू पाहातं. जी क्षणिक घटना असते ती स्थायी बनू लागते.ते आता मूल राग करणार नाही; पण आतल्या आत धुमसत मात्र राहील. अशा क्षणिक घटनामुळे येत गेलेला राग मोठ्या प्रमाणात आपण साचवून ठेवतो. आपण जर राग दाबला नाही आणि त्या त्यावेळी त्याला वाट करून दिली तर ती व्यक्ती रागीट राहत नाही. कारण राग येतो आणि व्यक्त केला की निघून जातो. म्हणून आपल्यावर मुलांनी राग काढावा,दाबू नये असं मी सांगेन, राग येऊ द्यावा; पण त्याला खोलात जाऊ देऊ नये, त्याला दाबू नये.जीवनात समस्या तर असतातच., त्या येणारच, अशा वेळी आपण म्हणूत की रागवा,तर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर राग काढाल.पण मुलांना दिशा देता येऊ शकते. त्याला राग आला तर आपण त्याला उशी देऊ आणि सांगू की मार त्या उशिला, काढ राग त्यावर, म्हणजे लहानपणापासूनच मुलाला रागासाठी दिशा देण्याचे काम होते.त्याला एखादी वस्तू द्या. राग आहे तोपर्यंत तो त्या वस्तूची आदळआपट करीत राहील. राग निघून जाईपर्यंत ते मूल असं वागेल. काहीच क्षणात त्याला आलेला राग सपुष्टात येईल. रागाची साठवणूक होणार नाही, तो साचून राहणार नाही.तुम्ही काम, क्रोध, लोभ या सगळ्या विकारांचा साठा तुमच्या करून ठेवलेल असतो. आणि हाच विकारांचा साठा तुम्हाला वेळोवेळी विक्षिप्त बनवित असतो. हे सगळ तुमच्या आतंच आहे. तुम्ही एखाद्या दमन करणाऱ्या पद्धतीनं आरभ कराल तर विकारांध दमन होईल; पण विकारापासून तुम्ही मुक्त नाही होणार. म्हणून मी आरंभ करतो रेचनापासून,आधी दमन झालेल्या सर्व विकारांना व्यक्त होऊ द्या. एकदा का हे विकार हवेत मोकळे झाले तर तुम्ही परिपक्वतेकडे वाटचाल करू लागता. जस क्रोध आला तर ता दाबू नका,त्याला वाट करून द्या. याला मी रेचन प्रक्रिया म्हणतो.


जर तुम्ही स्वतःच प्रेममय होणार नसलात, ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम कराल तिच्यापुरतंत तुम्ही प्रेमळ होणार असलात, तर याचा अर्थ मी अजून परिपक्व झालो नाही. कारण प्रेमळ होण्यासाठी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहात, आश्रित आहात. प्रेमळ होण्यासाठी एखादी व्यक्ती समोर हवी. असा प्रेमळपणा फार उथळ असणार. म्हणजे प्रेमळपणा हा स्वभाव नसतो. मी प्रेमळ नसेल तर ते प्रेम खोलवरचं नसतं. ते माझ्या प्राणाचा अश बनत नाही.
तुम्ही जेवढे स्वावलंबी असाल, कमीत कमी इतरांवर विसंबून असाल, कमीत कमी आश्रित असाल, तितकं जास्त परिपक्व व्हाल. तुम्ही एकटं असताना क्रोधीत असाल तर अधिक परिपक्व व्हाल. कारण क्रोधी होण्यासाठी तुम्हाला इतर घटकाची गरज नसते.


म्हणून आरंभच रेचनापासून करणं मी अनिवार्य मानतो. कसल्याही इतर बाबींचा विचार न करता तुम्ही तुमचे विकार बाहेर काढले पाहिजेत.ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग वाटतो, त्या व्यक्तीशिवायच तुम्हाला राग येऊ द्या.रडा. बिनकारण रडा. रडण्यासाठी कारण शोधू नका. हसा, अकारण हसा. मग पाहा,साचलेले सगळे विकार हवेत विरून जातील. तुम्ही फक्त विकारांना मार्ग मुक्त करून देत.


चला. आणि एकदा का ही पद्धत तुमच्या अगवळणी पडली तर तुम्ही भूत, भविष्यातन पूर्णपणे मुक्त होता.काहीच मिनिटात तुम्ही जन्मभराच्या ओझ्यातून – नव्हे जन्म जन्मांतरीच्या ओझ्यातून मुक्त होता. तुम्ही तुमच्यात दंडलेलं सगळ काही बाहेर फेकून द्यायला तयार असाल.तुमच्या आत असलेली विक्षिप्तता बाहेर काढायला तयार असाल तर काहीच क्षणात सगळ कस स्वच्छ होईल. तुम्ही मग स्वच्छ झाला, ताजेतवाने अन् निर्दोष. तुम्ही पुन्हा बालपणात शिरता अशा निर्दोष निरागस स्थितीत बसून ध्यान होऊ शकत. बसा किंवा आडव पडा.कारण आता तुमच्या आत ध्यानाला अडसर असणारी कोणतीच विक्षिप्तता शिल्लक राहिली नाही.

आचार्य ओशो रजनीश

%d bloggers like this: