Vajrayana 100 percent १) पार्श्वभूमि: वज्र म्हणजे इंद्राचे सर्वात मजबूत असे अस्त्र, वज्राचा दुसरा अर्थ आहे पुरुषाचे जननद्रिय.
२) पूर्वस्थिती : दंढासन
आसन कसे करावें? (पहिली पद्धत)
१. उजवा पाय गुडव्यात दुमडून गुड्या छातीच्चा दिशेने व टाच उजव्या बाजूस सीटला लागेल असा उभा करावा.
२. डाळ्या बाजूला झुकून हा तळपाय सावकाश मुडपून उजवा तळपाय उजव्या बाजूच्या सीटखाली येईल असे पहावे.
३. डावा पाय गुडध्यात दुमडून गुडया छातीच्चा दिशेने आणून टाच डाळ्ा बाजूला सीटला लागेल अशारीतीने उभा करावा.
४. थोडे उजव्या बाजूस झुकून डावा तळपाय सुडपून डाव्या बाजूच्या सीटखाली येईल असे पहावे.
५. शेवटी दोन्ही तळपायांनी तयार झालेल्या खळा्यात सीट रेस्ट होईल अशा रीतीने बसावे.
६. दोन्ही गुडघे जुळवण्याचा प्रयत्न करावा,
७. तळहात गुडघ्यांवर ठेवावेत. (द्रोणमुद्रा किंवा ध्यानमुद्रा घ्यावी.)आसन कसे करावे?
(दुसरी पद्धत)
(ज्यांचे वजन जास्त असून पाय
दुमडणे जमत नाही त्यांच्यासाठी)
१. दोन्ही गुडघे जमिनीला टेकून दोन्ही गुडध्यांवर उभे रहावे (कंबरेत न वाकता).
२. हळूहळू सीटचा भाग टाचांवर ठेवावा.
३. सरावाने तळपाय मुडपून दोन तळपाय जुळल्याने तयार होणाऱ्या खळग्यात सीट बसवावी.
४. दोन गुडघे जुळवून तळहात गुडघ्यांवर ठेवावेत.
५. डोळे बंद ठेवून स्थिर थांबावे.
आसनाची आदर्श स्थिती
१. पाठ, मान, डोके ताठ व सरळ ठेवून जमिनीला लंबरेषेत ठेवा,
२. दृष्टी जमिनीला समांतर ठेवावी,
३. गुडधे एकमेकांशी जुळवून ठेवावेत,
४. तळपायाचे अंगठे खाली जुळलेले ठेवावेत,
५. गुडघे जुळवताना मागे सीट उचलू नये,
६. श्वसन संथपणे चालू ठेवावे,
आसन कसे सोडावे?
Vajrayana 100 percent १.डाव्या बाजूला झुकून उजवा मुडपलेला
तळपाय सोडवून घ्यावा व सरळ करावा,
२. उजव्या बाजूला अकून उजवा पाय असाच सय करून दंडासनात यावे,
४) किती वेळ आसनात थांबावे? : पहिल्याच दिवशी जास्त वेळ या आसनात बसू नये,हळू हळू वेळ वाढवावी, सुमारे ५ ते १० मि, स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा,
५)गुडघे दुखी, वजन जास्त असणाऱ्या लोकांनी २० सेकंदाच्या छोट्या छोट्या आवृत्त्या करून मग १ मि., २ मि, असा कालावधी वाढवावा,Vajrayana 100 percent
कायदे
Vajrayana 100 percent १. पचनक्रिया सुधारते. त्यामुळे जेवणानंतर लगेच करता येते.
२. गुडघ्याचे आरोग्य सुधारते. सांध्यातील वंगण वाढून गुडघ्याचे सांधे लवचिक होतात.
३. प्राणायाम व ध्यानाच्या अध्यायात प्रगती होते.
४. मनाची एकाग्रता वाढते,
५, चेहऱ्यावरचे बांग, पिंपल्स (Acne), सुरकुत्या इ. तक्रारी कमी होतात.Vajrayana 100 percent
संभाव्य चुका:
१. मागे सीट उचलली जाते.सीट पूर्ण पणे
तळपायांच्या खळग्यात स्थिर नसते.
२. मान खाली जाते.
३. तळपायाचे अंगठे खाली एकमेकापासून दूर असतात,
४, गुडघे एकमेकांपासून दूर असतात.
काळजी
१. टाचांवर बसू नये, टाचा दुखू लागतील.
२. हुमॅटॉईड आर्थायटीस, सायनोव्हायटीस (गुडघ्याच्या सांध्यात आत वंगण सोडणाऱ्या पापुद्याला सूज), गुडघ्याच्या सांध्याच्या पिशवीत पू होणे(Septic arthritis), गुडघ्याचे ऑपरेशन झालेल्या लोकांनी करू नये.
३. गुडघ्याला मार बसून गुडघा दुखत असताना करू नये.
४. वजन जास्त असल्यास हळूहळू कालावधी वाढवावा; अन्यथा गुडघ्याच्चा सांध्यांच्या स्नायूबंधनांना इजा होण्याची शक्यता असते तसेच गुडघेदुखी सुरू होते.