Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान उज्जायी या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे “विजेता अथवा ‘जो स्वत:वर विजय मिळविण्यासाठी सहाय्य करतो तो’.उज्जायी प्राणायामात संथपणे (मिनिटाला तीन ते चार), सहजतेने अधिकाधिक श्वास आत घेणे व त्यानंतर संथपणे, सहजतेने जास्तीत जास्त उच्छ्वास बाहेर सोडणे ही क्रिया असते.
घशातील कंठनळी व श्वासनलिकेचे वरचे तोंड हे स्वरयंत्रातील भाग अंशत: बंद केल्याने श्वसनप्रवाह मर्यादित होतो. या अवस्थेत श्वसनप्रवाह पृष्ठभागांशी घशाला जातो व सौम्य, एकसारखा व हलका असा स…… (विस्तवावर पाणी ओतल्यावर होतो तसा) आवाज निघतो. मन श्वसनावर व विशेषत: स…..आवाजावर केंद्रित केलेले असते.Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान
* Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान चेह-्यावर स्मितहास्य ठेवून चेहऱ्याचे स्नायू विश्रांत करा. त्यामुळे तुम्ही विश्रात तर व्हाल शिवाय हा अभ्यास आवश्यकतेपेक्षा अधिक त्रास होईल इतका करण्यास तुम्हाला आपोआपच प्रतिबंध केला जाईल.Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान
तुमच्या घशावर सजगता प्रस्थापित करा.घशाच्या,समोरच्या(काल्पनिक)छिंद्रातून तुम्ही श्वसन करीत आहात, अशी कल्पना करा.
अशारितीने आपण कंठनळी व,श्वासनलिकेचा वरचा भाग अंशतः अरुंद करू.त्यामुळे या मार्गातून हवा संथपने पुढे जाईल व दीर्घ स…..असा आवाज येईल.
* हा आवाज हळू व एका लयीत असावा. तो ऐकण्यास आल्हाददायी असावा.तो इतरांना ऐकू जाणार नाही व केवळ आपल्यालाच ऐकू येईल असा असावा.
* प्रारंभी उज्जायी केवळ उच्छ्वासाच्या वेळी करा व कालांतराने श्वास व उच्छ्वास या दोन्ही वेळा करा.
* हठयोगाची संहिता उच्छ्वास डाव्या नाकपूडीने सोडण्यावर भर देतात.उच्छवासाचा कालावधी श्वासापेक्षा दुप्पट असावयास हवा.
* डाव्या नाकपूडीने अथवा दोन्ही नाकपूड्यांनी उच्छ्वास पूर्णपणे सोडल्यावर श्वास घेण्यापूर्वी श्वसन आपोआप थांबते. विश्रांत होऊन जितका वेळ सुखावहतेने शक्य असेल तेवढा या केवल कुंभकाचा आंनद लुटा.
* हे उज्जायीचे एक आवर्तन झाले. अशी किमान नऊ आवर्तने करणे श्रेयस्कर आहे.
* उज्जायीचा अभ्यास करतांना प्रगत साधक श्वासानंतर व काही वेळा उच्छ्वासानंतरही श्वास रोखून धरतात.
लाभ
* झोपेत घोरण्याचे प्रमाण कमी होते. * आवाजाची गुणवत्ता सुधारते व तो मधूर होतो. (गातांना) सहजपणे पट्टी बदलता येते. * टॉन्सीलिटीस, सर्दी, घशातील खवखव, अस्थमा, उचक्यांचा अतिरेक व अतिसंवेदनशील घसा या समस्या निवारल्या जातात. * मन शांत होऊन चिंता कमी होते. * सजगता वाढते.
उज्जायी – ध्यानाकडे
Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान श्वसन व सिसकारण्याचा आवाज यांच्याशी ‘सोहम्’ किंवा ‘ओम् ओम्’ यासारख्या मानसिक जपाचा समन्वय साधला तर मनाच्या खोलवरच्या पातळ्यांवर भ्रमण करता येते. ‘सो श्वास आत घेतेवेळी तर ‘हम’ उच्छ्वास सोडतांना किंवा एक ‘ओम्”श्वासाबरोबर व दुसऱ्यांदा ‘ओम्’ उच्छवासाच्यावेळी. सिसकारण्याचा आवाज मानसिक जपास मार्गदर्शन करतो व त्यामुळे मनाची प्रशांत व संतुलित अवस्था तयार होते.
उज्जायी श्वसनामागचे विज्ञान
उज्जायी श्वसन म्हणजे संथ केलेला, काहिसा नियोजित व श्वसनमार्गाशी प्रतिकार करून केलेला श्वास व उच्छ्वास होय. लोकाना या प्रकारच्या प्राणायामाचा अभ्यास केल्याने शांततेच्या भावनेचा अनुभव येतो. तसे इ.इ.जी.वर देखील दिसून येते.
उज्जायी प्राणायाम करीत असतांना एखाद्या व्यक्तीचा इ.इ.जी.काढल्यास त्यावरील अल्फा लहरींच्या हालचालींवरून सहज लक्षात येते, की त्या व्यक्तीला आतून किती शांत वाटते आहे ते.मन:स्थिती संतुलित, विश्रांत व मोकळी करण्याची शरीरातील यंत्रणा – लक्षण असते.
या अभ्यासात सिसकारण्याचा जो आवाज येतो त्याचा व्हॅगस मज्जेवर सकारात्मक परिणाम होतो. मज्जासंस्थेस ताजीतवानी व टवटवीत ठेवणारी व्हॅगस ही प्रमुख मज्जा असते. शरीराला अत्याधिकतेने क्रियमाण होण्यापासून ही मज्जा परावृत्त करते तसेच शरीरातील ऊर्जेचा साठा पूर्ववत करते.
Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान मानसिक प्रक्रिया खूप सक्रिय होते त्यावेळी मेंदूस आवश्यक असणारा अधिक रक्तपुरवठा उज्जायीच्या अभ्यासामुळे सहजतेने होतो.Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान
2 thoughts on “Ujjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान”