Uddiyan Bandh करण्याचे तंत्र 2020

Uddiyan Bandh करण्याचे तंत्र 2020
Uddiyan Bandh करण्याचे तंत्र 2020

                 

Uddiyan Bandh करण्याचे तंत्र 2020: उड्डीयान याचा अर्थ वरं उडणे असा आहे.

उड्डीयान ही जठर पोकळीवरची पकड आहे.याच्यामध्ये प्राण किंवा चैतन्य उदरपोकळीच्या खालच्या भागातून वर मस्तकाकडे वाहून नेण्याची क्रिया होत असते.

मध्यपटल उदरपोकळीकडून वर छातीच्या पोकळीकडे उचलले जाते.उदरपोकळीतील इंद्रिये मागच्या बाजूला पाठीच्या कण्याकडे आणि वर ओढली जातो.

प्रथमतः खाली वर्णन केल्याप्रमाणे उड़डीयान बंध उभे राहून करण्याची सवय करावी.नंतरच प्राणायामाच्या सरावामध्ये बसून बाह्यकुंभकाच्या वेळेला उड्डीयान बंध उपयोगात आणावा.

(बाह्यकुंभक म्हणजे श्वास पूर्णपणे बाहेर सोडून पुन्हा आत घेण्याअगोदर कोंडून घरण्याची क्रिया होय.) प्राणायाम नीट जमल्याशिवाय त्यामध्ये उड्डीयान बंघाचा वापर करू नये.

आंतरकुंभकाच्या वेळेलाही उड्डीयान बंधाचा वापर करू नये. (अंतरकुंभक म्हणजे श्वास पूर्णपणे आत घेतल्यावर बाहेर सोडण्याअगोदर रोखून ठेवण्याची क्रिया यामुळे हदयावर ताण पडतो.

              (अ) ताडासनामध्ये उभे राहावे.

wp 15947445327427542379912552819797
ताडासन

(आ) पाय एकमेकांपासून जवळजवळ एक फूट अंतरावर ठेवावेत.
(इ) गुडघे थोडे वाकवून जरासे पुढे झुकावे व हाताची बोटे किचित पसरून मांड्या हातांनी पकडाव्यात.

wp 15947446321077459049518140055204

(ई) हात कोपरांमध्ये थोडे वाकवावेत आणि हनुवटी जालंधर बंधाप्रमाणे जेवढी खालीआणता येईल तेवढी खाली आणावी.


(उ) संपूर्ण श्वास आत घेऊन झटकन बाहेर सोडावा म्हणजे फुफ्फुसातील हवा झपाटयाने बाहेर पडेल.


(ऊ) श्वास आत न घेता श्वसनक्रिया बंद ठेवावी. उदरपोकळीतील सर्व इंद्रिये पाठीच्या कण्याच्या बाजूला मागे वर ओढून घ्यावीत.उड्डीयानाच्या सरावामध्ये छातीचा कधीही खळगा करू नये,


(ए) कमरेचा व छातीचा कणा पुढे आणि वर करावा. उदरपोकळीतील इंद्रिये कण्याच्या बाजूने मागे ओढून त्यांना कण्याकडे दाबावे.


ऐ) उदरपोकळीवरील पकड घट्ट ठेवावी. मांड्यावरून हात काढून ते जरा वरती कमरेच्या बाजूला ठेवावेत म्हणजे आकुंचन अजून भक्कम राहील.


(ओ) उदरपोकळीवरील ताण कभी न करता किंवा हनुवटी वर न उचलता पाठ सरळ करावी.


(औ) अशीच पकड १० ते १५ सेकंदापर्यत सोसवेल त्या प्रमाणात ठेवावी. आपल्या ताकदीपलीकडे जाऊ नये. परंतु ज्या प्रमाणात पेलता येईल त्या प्रमाणात वेळ वाढवीत जावे.


(अ) पथमतः उदरपोकळीच्या स्नायूंवरचा ताण कमी करावा. हनुवटी आणि मस्तक मात्र हलवू नयेत. ती जर हलविली तर हृदय आणि कानशिले यावरचा ताण लगेच जाणवतो.


(अ:) उदरपोकळीला पूर्वीस्थितीवर आणावे. नंतर सावकाश श्वास प्यावा.


(क) (ऊ) ते (अं) पर्यंतव्या परिच्छेदात वर्णन केलेल्या परिस्थितीत श्वास आत घेऊ नये


(ख) थोडा वेळ श्वासोच्छ्वासाची क्रिया करावी व नंतर पुन्हा परिच्छेद (अ) (अं) यामध्ये सांगितल्याप्रमाणे सत्र करावे. मात्र दरवेळेला सहा ते आठपेक्षा जास्त वेळा करू नये.आपली क्षमता वाढेल त्याप्रमाणे पकड ठेवण्याचा काळ व सत्रांची संख्या वाढवावी किंवा सर्व अनुभवी शिक्षकांच्या किंवा गुरूंच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली करावे.


() ही सत्रे दिवसातून एकदाच करावयाची असतात.


(घ)उड्डियान बंधाच्या सरावावर प्रभुत्व मिळाले म्हणजे त्याचा वापर हळूहळू निरनिराळ्या
प्राणायामाच्या प्रकारामध्ये करावा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे उड्डीयान बंधाचा वापर फक्त बाह्यकुभक करतानाचा करावयाचा असतो.(बाह्यकुंभक म्हणजे श्वास पूर्णपणे बाहेर सोडल्यानंतर कोंडून ठेवलेला श्वास).

                     टीप :

(१) उड्डीयान बंध रिकाम्या पोटीच करावा.


(२) श्वास बाहेर सोडल्याशिवाय उदरपोकळी आवळू नये.


(३) कानशिलावर ताण पडला किंवा श्वास आत घेताना त्रास होऊ लागला तर उड्डीयान बंध


आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वेळ झाला आहे असे समजावे.


(४) उड्डीयान बंधाची पकड सोडून उदरपोकळीतील गात्रे पूर्वस्थान.वर आल्यावरच श्वास आत घ्यावा.


मात्र उदरपोकळीतील इंद्रिये आकुंचित असताना फुफ्फुसे आवळू (आखड़ू) नयेत.

                        लाभ

उड्डीयान बंधामुळे प्राण हा महापक्षी मेरुदंडात वास करणाऱ्या व मज्जा चैतन्य वाहून नेणाऱ्या सुधुम्ना नाडीतून वर उडतो असे म्हटले आहे.

हा बंध सर्वोत्तम आहे आणि गुरूने शिकविल्याप्रमाणे जो त्याचा नित्य सराव करतो त्याला पुन्हा तारुण्य प्राप्त होते. याला मृत्युरूपी हत्तीला मारणाऱ्या सिंहाची उपमा दिली आहे. हा बंध,

श्वास पूर्णपणे बाहेर सोडल्यानंतर पुन्हा आत पूर्ण घेण्याअगोदरच्या वेळेतच करावयाचा आहे.


याच्यामुळे मध्यपटलाला आणि उदरपोकळीतील इंद्रियांना व्यायाम मिळतो.मध्यपटल वर उचलल्यामुळे हदयाच्या स्नायूंतना सौम्य तऱ्हेने मालिश होते आणि त्यामुळे त्याना सुस्थिति प्राप्त होते.

उदर पोकळीतील इंद्रियांनासुद्धा सुस्थिती प्राप्त होते, जठाराग्नी वाढतो आणि पचन संस्थेतील त्याज्य पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे या प्रकाराला शक्तिचालन प्राणायाम म्हणतात.Uddiyan Bandh करण्याचे तंत्र 2020

Leave a Comment

%d bloggers like this: