Survive in This Earth

Survive in This Earth
Survive in This Earth

Survive in This Earth करोना च्या भीषण परिस्थितित आजचे सायन्स अपयशी ठरले तरी, आजचे सायन्स खुप काही शिकतय!आणि शिकत राहिल!यात शंका नाही.


आता तर जैवकीय युद्ध याची सुरवात  झाली आहे,पण या युद्धात मानवाने तग धरायचा असेल तर,संशोधनावर जास्त खर्च करावा लागेल.

आता बस,झाले मंदिर,मस्जिद,चर्च याना देणग्या देणे!तोच पैसा आपन आता,निसर्गातील संशोधनासाठी मग ते विषाणु विरुद्ध लस शोधने असो, की मानव शरीरातील प्रतिकार शक्ति वृधींगत करने असो,जेणे करुन मानव आणि अन्य जीव या पृथ्विवर जास्त दिवस तग धरून राहतील!

यासाठी संगणक,रोबोट,उपग्रह आणि अन्य तांत्रिक साधने यांचा वापर करुन घ्यावा लागेल!एका बाजूला जीवशास्त्रज्ञ मानवी शरीराची, त्यातही मेंदू आणि भावनांची रहस्यं उकलत आहेत.

आणि त्याच वेळी संगणक तज्ज्ञ (डाटा प्रोसेसिंग)आपल्याला शक्ति देत आहेत. जैव-तंत्रज्ञान क्रांती ही माहिती-तंत्रज्ञान क्रांतित सामावली तर मग बिग डाटा अल्गोरिदमचा उदय होईल.

बिग डेटा अल्गोरिदम माझ्यावर पाळत ठेवेल, माझ्या भावना तो माझ्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे जाणेल, पण त्यांनंतर सत्ता माणसांकडून संगणकांकडे हस्तांतरित होईल. ‘मुक्त इच्छे ‘बाबतचा माझा भ्रम वितळून जाईल. आजवर कोणीही पोहोचू शकल नव्हत,अशा माझ्या मनाच्या तळात काय चाललं आहे याची खडानुखडा माहिती रोज माझा संबंध येतो त्या संस्था,कंपन्या आणि सरकारी कार्यालय यांच्या हाती लागेल.

ते त्या माहितीचं केवळ आकलनच करून घेतील असं नाही, तर ते माझ्या मनामध्ये फेरफारही करू शकतील.ही बाब अतिशय थोडक्यात मांडायची तर
जैविक ज्ञान, संगणनाची शक्ती आणि डाटा यांचा गुणाकार केला की माणसांवर ताबा मिळवण्याची क्षमता हाती लागते.

हे समीकरण औषधनिर्मितीच्या क्षेत्रात अनुभवाला येत आहे याचे आपण साक्षीदार आहोत! औषधाबाबतचे आपले महत्त्वाचे निर्णय,आपण आजारी आहोत की निरोगी आहोत, या भावनांवर अवलंबून नसतात किंवा आपल्या डॉक्टरांनी केलेल्या निदानांवरही
अवलंबून नसतात;

परंतु आपल्या देहातील विविध प्रक्रियांबाबत संगणकांनी जे संगणन केलं आहे, त्यावर अवलबून असतात  कारण त्यांचं यासंबंधातल ज्ञान आपल्यापेक्षाही अधिक असतं. सातत्याने येणाऱ्या जैवतांत्रिक विदाच्या प्रवाहामुळे महाविदा अल्गोरिदम अहोरात्र आपल्यावर नजर ठेवू शकतील.

आपल्या शरीरात इन्फ्लुएंझा, कॅन्सर किवा अल्झामायर यांसारखे रोग वा व्याधींची सुरुवात केव्हा होणार याची खबर त्याना खूप आधी, आपल्याला त्याची जाणीवही होणार नाही अशा वेळी मिळेल!त्यामुळे प्रत्येकाच्या देहानुसार म्हणजे जनुक, व्यक्तिमत्त्व इत्यादीनुसार योग्य उपाययोजना, पथ्य, व्यायामाचं वेळापत्रक यांच्या शिफारशी ते करू शकतात!


मानवी इतिहासात कधीही मिळालेली नव्हती एवढी उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होईल,पण नेमक्या याच कारणामुळे लोक बहुधा कायमचे आजारी होतील.

परंतु २०५0मध्ये बायोमेट्रिक संवेदक, महाविदा अल्गोरिदम यांच्यामुळे कोणताही रोग, व्याधी, वेदना वा अधुपणा जाणवायच्या आधीच कळेल.आणि त्यावर उपाययोजनाही केली जाईल.

धूप्रपान आणि फुप्फसाच्या कॅन्सरचा संबंध संख्याशा्त्राने सिद्ध झालेला असतानाही अनेक लोक धुम्रपान करतात पण तुमच्या डाव्या फुष्फुसाच्या वरच्या भागात १७ कॅन्सरग्रस्त पेशी आहेत.

असा इशारा बायोमेट्रिक संवेदकाने दिल्यावर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही संवेदकाच्या इशाऱ्याची पर्वा केली नाही आणि संवेदकाने ही माहिती तुमच्या विमा कंपनीला, कार्यालयाला,आणि कुटुंबा कड़े पाठवली तर मग काय?

Survive in This Earth हे ,सर्व तांत्रिक आणि नवीन संशोधनाचा वापर करुण होईल आणि जर विषाणु आणि रासायनिक युद्ध याबद्दल अगोदरच कळले तर मानव आणि अन्य जीवन या पृथ्विवर सामान्यपणे जीवन जगु शकेल!Survive in This Earth

@तुल भीमसेन तांबें

Leave a Comment

%d bloggers like this: