Pranayama Breathing कसे असावे

Pranayama Breathing कसे असावे श्वसनाचा वेग साधारणपणे दर मिनिटाला १५ आणि २४ तासात २१,६०० असा असतो.

परंतु यात व्यक्तीच्या जीवनमानाप्रमाणेच तसेच प्रकृतीस्वास्थ्य आणि भावना यांच्यामुळे फरक पडतो.

प्राणायामामुळे प्रत्येक श्वासोच्छ्वासाची क्रिया करण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे वृद्धावस्था येण्याची क्रिया लांबते आणि माणसाला दीर्घायुष्य लाभते.Pranayama Breathing कसे असावे

Pranayama Breathing कसे असावे
प्राणायामातील श्वसन कसे असावे

Pranayama Breathing कसे असावे वृद्धावस्थेमध्ये श्वसनक्रिया कमी होते कारण फुफ्फुसातील वायुकोश आकुंचन पावतात आणि प्राणवायू आत घेण्याचे प्रमाण कमी होते.

प्राणायामामुळे ही आकुंचन होण्याची क्रिया थांबून वायुकोशांचे आकारमान टिकून राहते आणि लाल रक्तपेशीचे अभिसरण शरीराच्या सर्व भागांमध्ये नीट होऊन सर्व शरीरात जीवन व चैतन्य पसरते.

प्राणायामाच्या सरावामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा वृद्धापकाळ लाबवू शकतात.Pranayama Breathing कसे असावे

प्राणायामामध्ये श्वासोच्छ्वास नाकावाटेच केला पाहिजे.


आसनांवर प्रभुत्व मिळाल्यावर प्राणायामावर प्रभुत्व मिळवावयाचे असते.याला पर्याय नाही.

आसनांमुळे फुफ्फुसांतील तंतूंना  लवचिकता येते आणि प्राणायाम चागला करता येतो.शरीरातील मज्जातंतूची एकंदर लांबी ६००० मैल आहे.

त्यांची कार्ये अत्यंत नाजूक स्वरूपाची असल्यामुळे त्यांना स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याकरिता त्यांची फार काळजी घ्यावी लागते.

प्रत्येक आसन पुन्हापुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने पण दर वेळेला जास्त वेळ देऊन केल्यास मज्जासस्था स्वच्छ व मोकळी ठेवता येते आणि प्राणायाम करताना चैतन्याचा म्हणजेच प्राण प्रवाह बिनविरोध चालू राहतो.

अर्धवट केलेल्या आसनांमुळे श्वसनकार्य उथळ होते आणि त्यांची धारणाशक्ती देखील कमी होते.

शरीराची जर नीट काळजी घेतली नाही व त्याचे कोडकौतुक केले, तर ते विश्वासघातकी मित्र बनते.

शरीराला आसनांनी आणि मनाला प्राणायामाने शिस्त लावावी.

सुख आणि द्वदातून मुक्त होऊन आत्मज्ञान मिळविण्याची ही खात्रीची रीत आहे.ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची गरज असते.


जीवनज्योत म्हणजेच प्राण प्रज्वलित ठेवण्यासाठी
फुफ्फुसामध्ये योग्य प्रमाणात हवा घेतलीच पाहिजे.

प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी बरगड्यांमधील स्नायू, मध्यपटल आणि कटिरपटल (pelvic diaphragm) यांची हालचाल नीटपणे होण्याकरिता योग्य आसनांचा सराव करावा.

प्राणायामाला सुरुवात करण्यापूर्वी मलमूत्रोत्सर्जन करावे.

बद्धकोष्ठ असलेल्या व्यक्तींनी प्राणायाम केला तरी चालेल, कारण त्यामुळे मूत्राशयावर होतात तसे आतड्यांवर दुष्परिणाम होत नाहीत.

वाघ, सिंह आणि हत्ती इत्यादी हिंस्त पशूंना शिकविणारा माणूस त्यांच्या सवयी व लहरींचाअभ्यास करून मगच त्यांना हळूहळू शिस्त लावतो.

तो त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्याशी समजूतदारपणे वागतो.

प्राण्यांच्या कलाने न घेतल्यास हे पशू त्याच्यावरच उलटण्याचा व त्यालाजायबंदी करण्याचा धोका असतो. साधकानेही त्याचप्रमाणे वागले पाहिजे.

हवेच्या दाबावर चालणारी यंत्रे योग्य तन्हेने वापरल्यास अत्यंत कठीण खडकसुद्धा कापून काढतात.

Pranayama Breathing कसे असावे परंतु तो जर पद्धतशीरपणे हाताळली गेली नाहीत, तर ती यंत्रे खराब तर होतीलच, परंतु वापरणारालाही इजा होण्याचा संभव असतो.

म्हणून याच कारणास्तव आपल्या श्वसनक्रियेचा नीटपणे अभ्यास करावा आणि काळजीपूर्वक पायरी पायरीने पुढे जावे.

प्राणायाम जर धांदलीने किंवा जास्त जोराने केला,तर साधकाला त्रासदायक ठरेल.Pranayama Breathing कसे असावे.

प्राणायामाचा सराव

Pranayama Breathing कसे असावे प्राणायामाचा सराव ठराविक वेळेला आणि ठराविक बैठकीतच करावा.

काही वेळा प्राणायामाच्या नेहमीच्या पद्धतीमुळे त्रास होतो. तसे झाल्यास ती पद्धत बदलून शरीराला व मनाला आणि मज्जातंतू व मेंदू यांना आराम देऊ शकणाऱ्या दुसऱ्या एखाद्या पद्धतीचा तात्काळ अवलंब करावा.Pranayama Breathing कसे असावे

असे केल्याने शरीरातील भागांचे पुनरुज्जीवन होईल आणि साधकाला ताजेतवाने वाटू लागेल.

प्राणायाम अंधश्रद्धेने नित्य कृत्य म्हणून करू नये.आपल्या श्वसनक्रियेचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याला समजूतदारपणे. मोकळ्या मनाने व शहाणपणाने नीट वळण द्यावे.

Pranayama Breathing कसे असावे प्राणायामाच्या सरावाकरिता एकांत आणि स्वच्छ, हवेशीर आणि जेथे किडामुंगी नाही अशी जागा निवडावी. शांततेच्या वेळी प्राणायामाचा सराव करावा.Pranayama Breathing कसे असावे

★Pranayama Breathing कसे असावे दिवसातुन कमीत कमी १५ मिनिटे तरी प्राणायाम करावा. Pranayama Breathing कसे असावे

%d bloggers like this: