Perfect Breathing To live long

save 20200517 223033 2
perfect Breathing

Perfect Breathing To live longदीर्घ श्वास घेताना लक्ष फुफुसाच्या तळावर केंद्रित करुन हवा थेट श्वासाखाली नाभिपर्यंत ओढुन घेतली पाहिजे आणि हवेमुळे पोट फुगल्याच जानवले पाहिजे.
जेंव्हा तुम्ही खालच्या भागावर लक्ष केंद्रित करता तेव्हा खुप जास्त हवा फुफुसात शिरते,खेळाडू आणि सुदृढ लोक सर्वसाधारणपणे ‘मध्यम श्वसन’करतात.म्हणजे त्यांच्या स्नायुमुळे बरगड्या वर आणि बाहेर ढकलल्या जातात त्यामुळे जास्त हवा फुफुसात शिरू शकते.तरी पण यात सुद्धा फुफुसाची पुर्ण क्षमता वापरली जात नाही!

यामधे छातीच्या पिंजऱ्यात दोन्ही बाजुचे स्नायु बरगडया वर आणि बाजुला उचलतात आणि श्वासपटल आकुंचन पावते आणि खाली सरकते त्यामुळे खालच्या बाजुनेही जाएगा वाढते आणि फुफुसाची पोकळी निर्माण होते जागा वाढते.आणि फुफुसाची पोकळी मोठी होते.त्यामुळे योग्य प्रकारे दीर्घ श्वसन करताना तुम्ही तुमचे लक्ष नाभिवर केंद्रित करायला पाहिजे.

  Perfect Breathing To live longकल्पना करा तुमची फुफुसे म्हणजे तुमची फुफुस  म्हणजे दोन लांब कठिन सिलेंडर्स आहेत त्यांच्या तळाशी एक मऊ लावचिक फुगयाचे रबर बसवलेले आहे,हे आहे तुमचे श्वासपटल तुमच्या श्वासपटललाच आकुंचन प्रसरण पावण्याचा अनुभव घ्या.आपल्या कमरेवर दोन्ही बाजूनी हात ठेवा.अंगठे मागच्या बाजूला आणि बोटे पोटावर नाभिच्या बाजूला आता खांदे न उचलता मोठा श्वास घ्या.लक्ष फुफुसाच्या खालच्या भागावर केंद्रीत करा.
तुमच्या हाताच्या मधला पोटाचा भाग प्रसरण पावल्याचं कळले ना?हात सहज ठेवलेले असले तरी पोटाचे प्रसरण झाल्यामुळे हाताचा किंचितसा दाब पोटाला जानवेल.आता सावकाश उच्छ्वास करा.पोट पूर्ववत होईल.


@तुल भीमसेन तांबे

Leave a Comment

%d bloggers like this: