Perfct Breathing100 टक्के लाभ

Perfct Breathing100 टक्के लाभ

Perfct Breathing100 टक्के लाभ: आत्मसात करण्याची रीत आपल्या सामान्य श्वसनात आपण साधारणपणे ५०० मिली हवा आत घेतो. फुफ्फुसांची सरासरी क्षमता ४०००-५००० मिली असताना सामान्य श्वसनात अदलाबदल केल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण मात्र केवळ १० ट्के असते.

जे आपल्या फुप्फुसाच्या आकाराच्या मानाने आश्चर्य वाटावे इतके कमी असते.श्वासाद्वारे आत घेतलेली, प्राणवायूने समृद्ध अशी हवा फुप्फुसांच्या जेमतेम मध्यभागात पोहोचते.

फुप्फुसांच्या खालच्या व वरच्या पाळ्यांपर्यंत हवा जातच नाही. त्यामुळे उच्छ्वासावाटे आपण केवळ ५०० मि.ली.हवा बाहेर टाकतो.

Perfct Breathing100 टक्के लाभ
Perfct Breathing100 टक्के लाभ

फुप्फुसांच्या खालच्या व वरच्या पाळ्यांमध्ये, प्राणवायू मिळण्यापासून वंचित राहिलेली हवा बाहेर टाकली जाऊ शकत नसल्याने तशीच साचून राहते.क्षयरोग फुप्फुसांच्या वरच्या पाळ्यांमध्ये तर न्युमोनिया खालच्या पाळ्यांमध्ये असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

त्यामध्ये,प्रकारच्या श्वसनामुळे फुप्फुसाचा खालचा भाग प्राणवायू शोषून घेण्यासाठी सक्षम बनतो छातीचा व फुप्फुसांचा मघला भाग त्यानंतर विकसित होत जातो. नंतर लहान मूल अधिक हालचाल करावयास लागते व अधिक क्रियाशील होते त्यावेळी फुप्फुसांचा वरचा भाग विकसित होतो.

Perfct Breathing100 टक्के लाभ: प्रौढावस्थेत (श्वसनाच्या वेळी) आपले उदर स्थिर ठेवण्याकडे आपला कल असतो. आपल्या सजगतेचा बहुतांश भाग तणावकारक बारबींकडेच लक्ष देण्यात इतका खर्च होतो, की आयुष्याच्या गतीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आपण अतिशय वेगाने व उथळ श्वसन करतो.

आपण लहान असतांना उदर श्वसन करतो ज्यामुळे प्रथम फुप्फुसांचे खालचे भाग विकसित होतात.(अशा श्वसनात) पोट जसे फुलते व आकुंचित होत जाते

गतीमान स्वास्थ्यासाठी उच्छ्वास महत्त्वाचे!!

प्रौढावस्थेत घाई, गडबड व चिंतेने आपले आयुष्य व्यापलेले असते.ते सारे आपले उधळ व भराभर चालणारे श्वसन व अर्धेमुर्धे, मधेच तोडलेले उच्छूवसन यामध्ये प्रतिबिंबित होते.

Perfct 100 टक्के लाभ: हेच केवळ आपण विसरलेलो नाही आहोत तर आपले श्वास व उच्छ्वास यातील प्रमाणही फारच अनियमित झालेले असते.जेव्हा आपण व्यवस्थित व विश्रांतावस्थेत श्वसन करतो त्यावेळी श्वास,उच्छ्वास यांच्या लांबीतील नैसर्गिक प्रमाण १:२ असे असते.

याचा अर्थ असा की,श्वासापेक्षा उच्छ्वास दुपटीने अधिक लांब असतो.आपला श्वास चार सेकंदपर्यंत चालला तर उच्छ्वास साधारण परिस्थितीत आपल्याला कोणताही त्रास न होता,असुविधा न होता आठ सेकंदापर्यंत टिकावयास हवा.

केवळ दीर्घ श्वसनापेक्षा” पूर्ण, निर्बंधरहित उच्छ्वास अधिक मौलिक असतो.कारण उच्छ्वासादरम्यान विश्रांतावस्था प्राप्त होत असते. उच्छ्वासामुळेच विश्रांतावस्थेचा प्रतिसाद आपल्या शरीरव्यवस्थेत उत्स्फूर्त होत असतो. दीर्घ व सावकाश उच्छ्वासामुळे परानुकंपी मज्जासंस्था सुव्यवस्थित व कार्यरत होते. त्यामुळे विश्रांतावस्थेचा प्रतिसाददेण्याचे काम सुरू होते व परिणामी अंतर्गत संतुलन पूर्ववत होते.

Perfct Breathing100 टक्के लाभ: सजगतेने केलेले श्वसन मृदू, अकर्कश, शांत, विश्रांत व प्रवाहित होत असते व त्यामुळे हृदयाची गती सावकाश होते व रक्तदाबही कमी होतो. शिवाय, त्यामुळे स्थिरतेची व सुरक्षिततेची सकारात्मक भावना तयार होते. हे नवे,दीर्घ पद्धतीने केलेले श्वसन वास्तविक आपल्या हृदयास विश्रांती घेण्यास प्रवृत्त करते कारण दीर्घ उच्छ्वासामुळे हृदयाची गती कमी होत असते व त्यामुळे हृदयाला विश्रांती घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो.

अचूक उच्छूवासाची परिणती स्वाभाविकपणे नंतर घेतल्या जाणाऱ्या अधिक पूर्ण व प्रयासहिन श्वासात होते.

नियमित सरावाने आपले श्वसन आपल्या बाजूने कोणतेही मुद्दाम प्रयास न करता, आपापत: मोकळे, अधिक स्थिर व अधिक दीर्घ होत जाते.ज्याप्रमाणे श्वसन प्रवाहित होते त्याचप्रमाणे ऊर्जादेखील.परिणामी अनुकंपी मज्जासंस्था शांत होते. त्यामुळे तणाव कमी होतो व आपले शारीरिक, भावनिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते.

नियमित, दैनंदिन सरावाद्वारे हे प्राप्त होते. म्हणून आपल्याला प्रथमच जेव्हा श्वसनाच्या व्यायामांशी परिचय करून देण्यात आला त्यावेळेपासूनच दैनंदिन सराव सुरू करावयास हवा.

तथापी,लवकरात लवकर प्रगती करण्याच्या नादात आपण कोणत्याही परिस्थितीत,अगोदर सांगितल्याप्रमाणे १:२ हे प्रमाण साध्य करण्यासाठी स्वत:वर सक्ती करता कामा नये; त्यासाठी कोणत्याही प्रकारे जोर लावता कामा नये. कारण लगेच नाहीतर नंतर केव्हातरी जबरदस्तीने केलेल्या या श्वसनावर आपले शरीर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करेल. आपल्याला आपले ध्येय सावकाशपणे गाठावे लागेल. तरच आपले शरीर,
नव्या श्वसनपद्धतीशीस्वाभाविकरित्या जुळवून घेईल व नंतर उद्भवणाच्या समस्या टाळता येतील.

शारीरिक स्थिति सुधारने

◆विपरीत श्वसन ओळखने.

◆चुकीचे श्वसन सुधारणे.

◆तीन भागातील श्वसनाचा सराव करणे.

स्थिती

Perfct Breathing100 टक्के लाभ साठी: आणि श्वसनाच्या कोणत्याही व्यायामाचा अभ्यास करतांना मेरूदण्ड सरळ असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे हवेचा प्रवाह रोखला जात नाही. पुढे वर्णिल्याप्रमाणे कोणत्याही स्थितीत मन हे साध्य करता येते.

१. सतरंजीवर मांडी घालून बसणे :

दीर्घकाळपर्यंत जमिनीवर किंवा सतरंजीवर आरामदायी पद्धतीने बसण्यासाठी जेणेकरून पाठीखालचे माकडहाड वर जाईल अशा पदधतीने एखाद्या उशीवर बसावे. मेरूदण्ड सरळ ठेवा, डोकंही सरळ, ताठ, तोंड मिटलेले, हात विश्रांत व गुडघ्यांवर ठेवलेले किंवा मांड्यांवर विसावलेले असतील तर तळहातावर तळहात ठेवलेले.

२.बैठक व पाठ यास नव्वद अंशाचा कोन असलेल्या कडक खूर्चीवर बसणे:

जर तुम्हाला जमिनीवर बसणे असुविधाजनक व त्रासदायक वाटत असेल.विशेष करून नितंब,पाठीचा खालचा भाग व गुडघे यामध्ये;तर त्याएवजी खूचीत बसा,शारिरिक असुविधेमुळे लक्ष विचलित होण्यापेक्षा शरीर व मनावर श्वसनाचे होणारे सूक्ष्म परिणाम जाणणे व त्यांची मजा लुटणे केव्हाही चांगले.

. पाठीवर आडवे झोपणे.

पाय दुमडणे किंवा सरळ पसरणे; जसे अधिक आरामदायी असेल तसे: मेरूदण्डाच्या सरळ रेषेत मान येण्यासाठी मानेखाली पातळ ऊशी घ्या.त्यामुळे श्वसन दीर्घ व अधिक आरामदायी होण्यास सहाय्य मिळते.

चला तर,Perfct Breathing100 टक्के लाभघेण्यासाठी आपण वरील सूचनाचा वापर करूया.Perfct Breathing100 टक्के लाभ

3 thoughts on “Perfct Breathing100 टक्के लाभ”

Leave a Comment

%d bloggers like this: