Padmasan 100 टक्के कृती

Padmasan 100 टक्के कृती:बैठकीची अनेक आसने हठयोगात उपलब्ध आहेत. या आसनांचा स्वतंत्र अभ्यास करता येतो.

तसाच इतर आसने, बंध, मुद्रा, प्राणायाम, त्रिया, इत्यादी यौगिक प्रकारचि एक तांत्रिक अंग म्हणूनही त्यांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ,पर्वता-सन पद्मासन अंतर्भूत आहे,

तर योग मुद्रेत पद्मासनात बसावे लागते.उड्डियानबंध बसून करताना पद्मासनची गरज पडते, तर कपालभाती क्रियेचे ते अपरिहार्य अंग आहे, भस्तिकातंत्रातील तर तो अनिवार्य भाग समजला जातो.ध्यानातील ‘समंकाय-शिरोग्रीवम् ‘ अशी आदर्श स्थिती पद्मासनात सहज प्राप्त होते.

मात्र स्वतंत्रपणे केलेले पद्मासन व इतर प्रकारांतील एक तांत्रिक अंग म्हणून केलेले पद्मासन यांच्या तांत्रिक भागात काहीसा फरक पडतो.बैठक पक्की व्हावी आणि मेरुदंड नि उत्तमांग यांना नैसर्गिक स्थिती आणि स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून बैठकीच्या आसनात पायांची वैशिष्टयपूर्ण रचना केलेलीअसते.

या रचनेन मुख्यतः दोन प्रकार दिसुन येतात. एक म्हणजे पायांची व पावलांची एकमेकांत पक्की गुंतवणूक करून उत्तमांगास आणि मेरूदंडास स्थिरंता देणारी,व सहजासहजी न सुटणारी रचना आणि दुसरी म्हणजे पावलांची साधी गुंतवणूक करून पाठीच्या कण्याला सहज स्थिरता देणारी जुन्या भव्य इमारतींच्या विस्तृत पायाप्रमाणे असलेली रचना.

पहिल्या प्रकारात पायांच्या रचनेतील घट्टपणा, तर दुस-्या प्रकारात पायांच्या रचनेतील विस्तृतता उत्तमांगास आधारभूत होते.

पहिल्या प्रकारात वज्रासन, पद्मासन, स्वस्तिकासन आणि वीरासन मोडतात,तर दुसऱ्या प्रकारात समासन व सिद्धासन यांचा अंतर्भाव होतो.

तुलनात्मक दृष्टीने पायांच्या विस्तृत रचनेची समासन व सिद्धासन यांसारखी आसने धारणा-ध्यानांना अधिक सोयीस्कर असतात, तर प्राणायामात पद्मासन व स्वस्तिकासन अधिक श्रेयस्कर ठरतात.

img 20200731 205532823180185959801947
डावे पाऊल उजव्या जांघे जवळ बसवताना

Padmasan 100 टक्के कृती: पद्मासनात उलटे केलेले पायांचे तळवे विरुद्ध जांघेत बसबिले जातात आणि टाचांवर तळहात एकमेकांवर ठेवले जातात. हे तळपाय नि तळहात कमळाच्यापाकळयांसम भासतात. म्हणून या आसनाला ‘पद्मासन ‘किंवा ‘कमलासन ‘असे म्हणतात.

तंत्र :Padmasan 100 टक्के कृती

img 20200731 2054415523894779080084699
पद्मासन

पूर्वस्थिती

पाय पसरून व हात दोन्ही बाजूंना जमिनीवर टेकून बसा.

कृती :

पाय एकमेकांना चिकटून ठेवा.डावा पाय गुडघ्यात दुमडून, दुमडलेला गुडघा डाव्या हाताच्या मदतीने छातीजवळ आणा.

डावी पोटरी मांडीला चिकटून ठेवा.नंतर डाव्या तळहातात आतील बाजूने डावी टाच पकडा. उजव्या तळहाताने डाव्या पायाचा चवडा बाहेरुन धरून दुमडलेला डावा गुडघा जमिनीकडे आणा दोन्ही हाताच्या भवतीने डाव्या पावलाला, तळपाय वरच्या बाजूला यईल असा पीळ भरा.

डावे पाऊल उजव्पा जांधेत किंवा जांधेजवळ मांडीवर घट् बसेल व डावी टाच ओटीपोटाखालील हाडावर (प्यूबिक बोन) बसेल अशी कृती करा पद्मासनात डावे पाऊल उजव्या जांघे जवळ बसविताना नंतर उजवा पाय दुमडून, दुमडलेला गुडधा येईल तितका छातीकडे आणा.

उजव्या तळहाताने आतून टाच आणि डाव्या तळहाताने बाहेरून उजव्या पायाचा चवडा पकडा. गुडघा जमिनीकडे आणा. पायाचा तळवा वर येईल असा पायाला आणि पावलाला पीळ द्या आणि उजवा तळपाय डाव्या जांघेत असा पक्का बसवा की उजवी आणि डावी टाच एकमेकींजवळ येतील, आणि दोन्ही गुडघे जमिनीवर रुतल्याप्रमाणे पक्के होतील.

(प्रथम काही दिवस गुडघे जमिनीला लागत नाहीत.काही दिवसांच्या सरावाने गुडघे आपोआप जमिनीवर टेक लागतात.)नंतर डावा तळहात वरच्या टाचेवर ठेवा व त्यावर उजवा तळहात ठंवा. चार बोटे एकत्र ठेवून आंगठे बाहेर ठेवा. याला ‘पद्म मुद्रा’ म्हणतात.तळहात वरच्या बाजूस करून, हात खांद्यापासून बोटांपर्यंत सरळ ठेवा. तळहाताचा मागील भाग गुडध्यावर ठेवा.

img 20200731 2054091121624435184243401
पद्मासनाची अंतिम स्तिथि

आसन सोडण्याची कृती :

दृष्टी व मन मोकळ करा. हात मुक्त करा. हातांच्या मदतीने वरील उजवा पाय जांघेतून मोकळा करून सरळ करा. नंतर हातांनी डाव्या पायाला आधार द्या आणि डावे पाऊल जांधेतून काढा आणि पाय सरळ करा. हात दोन्ही बाजूंना टेकून आरामात बसा.

सूचना :

Padmasan 100 टक्के कृती

१. पद्मासन प्रथम उजवा किवा डावा पाय दुमडून    करता येते.
२. अंतिम स्थितीत हात सरळ ठेवताना खांदे पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी कमरेपासून पुढचे शरीर पुढे झुकू देऊ नये.
३. पद्मासनात नासाग्र, भ्रूमध्य किंवा अर्धोन्मीलित नेत्रांनी सहज दृष्टी ठेवावी.
४. बंधासहीत पद्मासनात मूलबंध (गुदाचे आकुंचन), उड्डियान बंध (पोट खपाटीस नेणे), जालंधरबंध (हनुवटी छातीवर घट्ट रोवणे) व जिह्वाबंध (कंठ-
संकोच करून जीभ टाळ्घास चिकटविणे) हे सर्व बंध एकाच वेळी अथवा वेगवेगळे लावता येतात.
५. पद्मासनातील अंतिम स्थितीत हातांची स्थिती निरनिराळी असू शकति.पद्ममुद्रा, ज्ञानमुद्रा, ब्रोणमुद्रा, इत्यावी मुद्रांत हात ठेवता येतात. (त्यांची माहिती
याच प्रकरणात शेवटी पहावी.)
६. पायांच्या घट्ट रचनेमुळे कपालभाती,भस्त्रिका इत्यादि ज्यांत शरीराला झटके बसतात अशा प्रकारांत  श्वसनात निरतांत गरज असते.

अभ्यास :

एक मिनिटापासून एक तासापर्यंत पद्मासनाचा एक-दोनदा अभ्यास करता येतो. मात्र प्रगती हळूहळू करावी.

दॄष्टि :


नासाग्र किंवा सहज (अर्धोन्मीलित नेत्रांनी).इवासोच्छ्वास : चालू राखावा.
सनोधारणा : श्वसनावर किंवा एखाद्या चक्रावर ठेवावी.

पूर्वाभ्यास :

◆एक पाय पसरा आणि दुसरा दुमडा. पाऊल विश्द्ध जांघेत घट्ट बसवा. काही वेळ ही स्थिती धारण करा. मग दुसऱ्या पायाने हीच कृती करा.
◆एक पाय दुमडा. त्याचे पाऊल विरुद्ध जांघेत बसवा. दुसरा पाय गुडध्यात दुमडून पहिल्या पायाच्या खाली ठेवा. हे ‘अर्धपत्रासन झाले.असेच प्रारंभ करून करा.

लाभ :


Padmasan 100 टक्के कृती १. भस्त्रिका, उज्जायी, सूर्यभेदन, इत्यादी प्राणायामांत अधिक आवश्यक आहे.


२. केवळ पद्मासनात बसून ‘अजपाजप केला ( श्वसनावर ध्यान ठेवले) तरी चित्त शांत होण्यास व मनाची चंचलता कमी होण्यास मदत होते.


३. मेरुदंड ताठ ठेवण्याची सवय होते. त्याच्यातील वक्रतेचे दोष कमी होतात.


४. कंबर व खालील मेरुदंडाच्या भागातून जाणाऱ्या नाडया (कॉसिजिअल व सँऋ्ल नव्ह्हज्) प्रभावित होतात.
५. श्वसन दीर्ध व मंद होते. त्यामुळे भावना, विचार, वासना , इत्यादींचा क्षय होतो.


६. या आसनस्थितीत नाडयांना मिळणारी विश्रांती, मनाला मिळणारी शांती,श्वसनात येणारा मंदपणा आणि सहजता यांमुळे हे आसन ध्यान-धारणेला उपयुक्त ठरते.


७. मेरूदंडाचा ताठपणा, दूढता आणि स्थिरता यांमुळे प्राणायामातील पूरक आणि रेचक करताना होणारे प्रसरण व आकुंचन या हालचाली बाधारहित नि मुक्त होतात. म्हणून बहुतेक प्राणायाम-्प्रकारात हे आसन आधारासन म्हणून स्वीकारतात.


८.घीटे व गूडघे हे सांधि आणि त्यांना जोडलेले स्नायुबंध व स्नायू लवचिक आणि कार्यक्षम बनतात.
९. मूलबंध लावण्याला मदत होते.


१0.पचन आणि ऊसर्जन क्रिया सुधारतात


११.गुदप्रदेश आणि जननेन्द्रिय स्वास्थपूर्ण बनतात Padmasan 100 टक्के कृती

2 thoughts on “Padmasan 100 टक्के कृती”

Leave a Comment

%d bloggers like this: