OM गुणगुणणे, प्रणवोच्चार

OM गुणगुणणे, प्रणवोच्चार

OM गुणगुणणे, प्रणवोच्चार: ओम हे निर्मितीचे चिन्ह आहे.ओम ही निर्मितीची शाब्दिक अभिव्यक्ती आहे. निर्मितीमागची शक्ती व तिचे चलनवलन याविषयी वर्णन करावयाचे असते त्यावेळी ओम ही अभिव्यक्ती विविध धर्मांत व संप्रदायांत विद्यमान असते.

OM गुणगुणणे, प्रणवोच्चार
OM गुणगुणणे, प्रणवोच्चार

ओम‘ हा स्वर केवळ भारतीय संस्कृतीतच विशेष नाही आहे तर. त्यास अन्य धर्मांमधे देखील धार्मिक महत्त्व आहे. जरी ‘ओम‘ ची कोणतीही व्याख्या करण्यात आलेली नसली तरी त्यास वैश्विक ध्वनी समजण्यात येतो. हा ध्वनी अनादिकालापासून अस्तित्वात असून सर्व ध्वनींची एकत्रित अभिव्यक्ती होय.आमेन‘ हा देखील’ओम’ या स्वरापासून निर्माण झाल्याचे म्हंटले जाते. त्याचा अर्थ ‘ते असेच असू द्याव’असा आहे. अरबी लोकांमधे याच शब्दाच्या जवळ जाणाऱ्या ‘आमीन या शब्दाला देखील धार्मिक महत्त्व आहे.

webp6398658897658188197.
OM गुणगुणणे, प्रणवोच्चार

OM गुणगुणणे, प्रणवोच्चार: देवत्व व अधिकार दर्शविण्यासाठी देखील ‘ओम’चा उपयोग करण्यात येतो. इंग्लिश भाषेत ‘ओम’ हा स्वर विविध शब्दांमधे सापडतो. जसे ओम्नीसायन्स (असीम ज्ञान), ओम्नीपोटंट (असीम शक्ती असलेला) व ओम्नी व्होरस (सर्व काही खाणारा).ओमेन‘ या शब्दातही हा स्वर आढळतो. ओमेन म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत.तसाचे ओम्बड्सुमन हा शब्द आहे. त्याचा अर्थ,त्याचा अर्थ,न्याय निवडा करण्याचा अधिकार असलेली व्यक्ति.OM गुणगुणणे, प्रणवोच्चार

ओम चा जप केल्याने अशी कंपने निर्माण होतात, की ज्यामुळे आपल्यावर खोल व गहिरा परिणाम होतो. सुखावहतेने खोलवर श्वास आत घेतल्यावर साधकाने ‘ओ’ असा ध्वनी काढून उच्छ्वास प्रारंभ करावा. व हळूहळू ‘म’ चा उच्चार करीत सुखावहतेने जेवढ़ा वेळ शक्य असेल तेवढा उच्छ्वास चालू ठेवावा.

ओम म्हणतांना म्हणजेच प्रणवोच्चार करतांना उदराचे स्नायू हळूहळू आत खेचले जातात व छातीतील हवा बाहेर फेकली जाते.

हे गुणगुणणे अथवा जप सुखावहतेने व्हावयास हवे. जप संपल्यावर लगेचच हवा आत घेण्यासाठी जीव गुदमरावयास नको. कुवलयानंद यांनी असे सुचविलेले आहे, की प्रणवोच्चारानंतर उदरास विश्रांत होऊ द्यावे. त्यावेळी थोडा श्वास आत घ्यावा.

श्वास न घेताही साधकास श्वसनातील विरामाचा, केवल कुंभकाचा अनुभव येऊ शकतो.पुढचा श्वास घेण्याची इच्छा उत्पन्न होईपर्यंत हा अनुभव टिकून राहतो.प्रणवोच्चार उत्तरोत्तर प्रगती करीत तीन प्रकारे करता येतो.

१. मोठ्याने उच्चार

२. हळूवारपणे उच्चार

३. मानसिक उच्चार

प्रारंभी मोठ्याने गुणगुणे चांगले.त्यामुळे दाबून ठेवलेल्या आतील भावनांना मोकळी वाट करून दिली जाते. अशा भावना व्याधीमुक्तीच्या प्रक्रियेत अडसर ठरत असतात.त्यानतर हळूवारपणे उच्चार करावा.

यावेळी निर्माण होणारा ध्वनी केवळ साधकालाच जाईल इतका बारीक असावा. शेवटी, सजगता वाढ़वल्यावर मानसिक उच्चाराकडे वळावे. मानसिक उच्चारादरम्यान तुम्ही निद्रावश झालात तर पुन्हा मोठ्याने उच्चार करावा.सारे काही निवारले जाते. अगदी मानसिक जप सुरू ठेवण्याची इच्छादेखील नाहिशी होते.

ओम‘ चा उच्चार केल्याने मन कालांतराने शांत होते व अस्वस्थता, चिंता,तनाव सारे काही निवारले जाते अगदी मानसिक जप सुरु ठेवण्याची इच्छा देखील नाहीशी होते.व त्या शांत सागरात डुंबत राहावेसे वाटते. एकाग्रतेसाठी कोणताही प्रयास न करता ही अंतर्गत शांततेची भावना वर उचंबळून येते.विश्रांतरितीने करावयास हवा.

गुणगुणण्याची पर्यायी पद्धत

‘ओम’ साडेतीन  स्वरांचा         बनलेला आहे,

      ‘अ’  ओ’  ‘म’

                 त्यानंतर,मौन, शांतता.

प्रणवोच्चार तीन समान भागात विभागून देखील आपण ‘ओम’ म्हणू शकतो

‘अ’  एक तृतीयांश,

‘ओ’ साठी एक तृतीयांश

‘म’ साठी एक तृतीयांश ,अश्या

पद्धतीने वेळ विभागुन तीनही स्वर एकापाठोपाठ परस्परात मिसळून प्रणवोच्चारकरता येऊ शकतो. त्याचवेळी साधकाला कंपने नाभीपासून छाती, घसा त्यानंतर चेहरा व डोके इथपर्यंत जात असल्याचे जाणवते. शांतता म्हणजे आनंदाचे निवासस्थान.

‘ओम’ उच्चारानंतर या शांततेचा आनंद लुटता येतो.

जपावरील संशोधन

ओम’ जपातील शाब्दिक उत्तेजन कंपने यामुळे मेंदू क्रियमाण होतो. ‘ओम’ जपामुळे चयापचय व हृदयाची गती कमी होते. शारीरिक विश्रांति च्या संदर्भातील मानसिक सतर्कतेचे हे लक्षण असल्याचा अर्थ या निष्कर्षा नंतर निघतो.

‘ओम’ जपावर करण्यात आलेल्या विविध अभ्यासांद्वारे असे लक्षात आले, की त्यामुळे एकाग्रता, स्मृती व मेंदूची आकलनशक्ती वाढीस लागते व थकण्याची पातळी कमी होते.

शांतते पलिकडील ध्वनी

बरेचसे लोक बोलतात कारण शांततेपेक्षा बोलणे त्यांना सुसह्य वाटते. आपल्यापैकी बन्याच जणांच्या बाबतीत जरी तोंड शांत असले तरी,मन किंचाळतअसते.कोलाहलापासून सुटका करून घेण्याचा बोलत राहणे हा एक सोपा उपाय वाटतो.

OM गुणगुणणे, प्रणवोच्चार: म्हणून तोंडाच्या शांततेपेक्षा मनाची शांतता अधिक महत्त्वाची असते. जी मनाची शांतता आपल्याला आपल्या आतील शहाणपणा, ज्ञानाचा मार्गदर्शक आवाज ऐकण्यासाठी सक्षम करते, ती खरी शांतता.आणि तीच खरी वैश्विक शांतता.OM गुणगुणणे, प्रणवोच्चार

Leave a Comment

%d bloggers like this: