Meditation Types Part 2

Meditation Types Part 2 ध्यानधारणेच्या प्रक्रियेत आपण मनाला जखडून ठेवणाऱ्या सवयीपासून मनाला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो.

सतत विचार करण,एखादी गोष्ट,घटना उलटसुलट तपासून बघणं,आठवणीत रमणं, कोणत्या ना कोणत्या समस्येवर उपाय शोधणं

आणि भूतकाळ किंवा भविष्यकाळातील घटनांवर लक्ष केंद्रित करणं या साऱ्यातून मुक्त व्हावं,असं आपण ध्यानधारणेच्या प्रक्रियेतून मनाला सांगत असतो.

मनात वा्याच्या वेगानं विचार चालू असतात, भावनांची आवर्तनं जाणवत असतात.

Meditation Types Part 2: विचार व भावनांच्या आवेगाला आवर घालून थोडं संथपणे, संयतपणे मार्गक्रमण करायला आपण मनाला मदत करतो.

त्या विचारांची गर्दी जर दूर केली तर त्या जागी आपल्या आतमध्ये डोकावण्याची शक्ती येते. आपल्या जाणिवा अधिक तरल होऊ शकतात.

ध्यानधारणा करणं म्हणजे समस्यांवर विचार करणं किंवा एखाद्या घटनेची उलटसुलट तपासणी करणं नव्हे.

मनाला हवं तसं भरकटू देणं, स्वप्नवत् काल्पनिक गोष्टींत रमणं असा ध्यानधारणेचा अर्थ होत नाही.

मनातल्या मनात सतत संवाद करणं, आपणच आपल्याशी वाद घालत बसणं किंवा विचारांची प्रक्रिया तीव्र करणं याही गोष्टी ध्यानधारणेत होत नाहीत, किंवा अपेक्षित नाहीत.

शांतपणे कुठलाही आटापिटा न करता एकाग्रचित्त स्थितीत स्वत:चा शोध घेणं आणि जागृतावस्था प्राप्त करणं, हे ध्यानधारणेचं फलस्वरूप असतं.

Meditation Types Part 2
Meditation Types Part 2

Meditation Types Part 2: ध्यानधारणा करताना आपण मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करता.अनेक गोष्टींकडे मन आकर्षित होत असतं, काही गोष्टी मनात घर करून बसलेल्या असतात तर जागृतावस्थेत आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींत आपण सतत गुंतत राहतो. या सगळ्यांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण ध्यानातून करत असता.अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी मन पूर्णपणे रिकामं करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि ते संभवतही नाही. मनाचं लक्ष एका सूक्ष्म गोष्टीकडे केंद्रित कले तर त्यायोगे मन बाह्यजगातील कोलाहालापासून दूर येऊन स्वतःमध्ये, आपल्या आतील जगात वळण्यास प्रवृत्त होत. आपण स्वतः चित्त आतमध्ये एकाग्र केले त मनाला ताण देणाच्या इतर गोष्टींपासून मनाला मुक्ती मिळेल. सतत काळजी करणं,कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या योजना आखणं, विचार करणं, हे असं का, ते तसं का या प्रश्नांच्या गुंत्यात सापडणं या सर्वांचं ओझं मनात सतत असतं. ते ओझं दूर झालं तर मन हलक होऊन सकारात्मक गोष्टींकडे वळतं. हे ध्यानानं साध्य होतं.ध्यानधारणेच्या साधकाला एकाग्रचित्त होण्यासाठी एखादं साधन दिलं जातं.बन्याच वेळा ध्वनीचा उपयोग केला जातो किंवा एखादी प्रतिमा डोळ्यासमोर आणल्यानेही मन एकाग्र करणं जमू शकतं. कोणता ध्वनी अथवा प्रतिमा या बाह्य किंवा सूक्ष्म गोष्टी वापरायच्या ते साधकाच्या मनोवस्थेवर अवलंबून आहे. ध्यानधारणेत ज्या ध्वनीचं उच्चारण केलं जातं, त्याला मंत्र असं म्हणतात. मंत्रोच्चारण हे मन एकाग्र करण्यासाठीचं अतिशय प्रभावी साधन आहे.मंत्रामध्ये एखादा शब्द, वाक्य, विशिष्ट तऱ्हेचे आवाज किंवा एखादा शब्दावयव यांचा अंतर्भाव होतो. मंत्रावर मन एकाग्र केल्याने, साधकाचे मनातील इतर निरर्थक गोष्टींकडे लक्ष जात नाही. परिणामतः त्याला स्वतःच्या अंतरंगात खोलवर शिरायला मदत होते. ‘ओम’, ‘आमेन आणि ‘शालोम’ अशा प्रकारचे अनेक मंत्र जगभर वापरले जातात. मनाची एकाग्रता वाढणे हा या सर्वच मंत्रोच्चारणाचा उद्देश्य आहे.एखादा शब्दावयव, ध्वनी अथवा शब्द यांचा मंत्र म्हणून वापर करताना त्याचं उच्चारण कसं करावं, याचे काही नियम आहेत. हे नियम जगभरातील सर्व महान अध्यात्मिक परंपरांमध्ये आहेत.मंत्रोच्चारण हे एक अतिशय महत्त्वाचं परिणामकारक शास्त्र आहे. जे या मंत्रोच्चारणाच्या शास्त्रात पारंगत असतील ते त्यांच्या शिष्यांनाही उत्तम प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. साधकानं सुरुवातीला करायचा मंत्रोच्चारणाचा सराव साधा सोपा असून त्यासाठी गुरूच्या मार्गादर्शनाची गरज नाही. पण जेव्हा साधकाला मनावर नियंत्रण ठेवण्याच्या साधनेला सुरुवात करायची असेल तेव्हा योग्य त्या मंत्राची निवड करणं आवश्यक आहे. अध्यात्मिक परंपरेनुसार गुरूंनी दिलेल्या मत्राचा वापर केल्याने ध्यानधारणा अतिशय प्रभावी आणि फलदायी ठरते.पतंजली हे योगशास्त्राचे प्रसिद्ध उद्गाते व भाष्यकार. मंत्र आपल्यामधल्या आतल्या आवाजाचं, सद्सदविवेकबुद्धीचं प्रतिनिधित्व करतो,असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मंत्र हा आयुष्यातील विनाशी आणि अविनाशी अशा दोन भागांना सांधणारा एक पूल आहे. मृत्यूच्या वेळी आपल शरीर, श्वास आणि आपल्या संवेदना विनाश पावतात. आपला आत्मा आणि सुप्त मन है अविनाशी भाग मत्त्य शरीरापासुन अलग होतात. त्या वेळी त्या सुप्त मनात साधकानं केलेळा मंत्रोच्चारणाचे ठसे कायमस्वरूपी राहातात. मृत्यूनतरच्या प्रवासात आत्म्यागीं एकरूप झालेलं हे मंत्रोच्चारणाचं अस्तित्व अतिशय महत्त्वाचं ठरतं. साधकाच्या अज्ञाताच्या प्रवासाला त्याची मदत होते.Meditation Types Part 2

Meditation Types Part 2: काही वेळा योग्य ध्यानधारणेच्या पद्ध्तीची तुलना करण्यात, अमुक एक अध्यात्मिक मार्ग किंवा गुरू ‘श्रेष्ठ’ आहे, अशा वादात लोक गुंतून राहातात

ध्यानधारणा शिकवणारे सच्चे गुरू ध्यानाचे वैश्विक स्वरूप ओळखून त्याचा आदर करतात. याबाबतीत स्वत:ची महती वाढवणं आणि परंपरावादी संकुचित विचार करणं यांपासून ते दूर राहतात. आपल्यातील सर्व आयामांचा, अस्तित्वाच्या सर्व बाजूंचा शोध घेण्यासाठी ध्यानाचा फायदा होतो.

सर्व स्तरांवर आयुष्याची लाबा,रुंदी/खोली पद्धतशीरपणे मोजण्याचं ते एक साधन आहे. गुरूनं अहंकारापोटी त्याचा ध्यानधारणेची पद्धती हीच सर्वश्रेष्ठ असं न मानता जर साधकाचं हित केंद्रस्थाना ठेवलं,

तर निश्चितच त्याला मोल प्राप्त होतं आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिस् लागतात.सुरुवातीच्या काळात साधक ध्यानधारणेच्या बाबतीत अनुभिज्ञच असतो.ध्यानाच्या पद्धतीबद्दल त्याच्या मनात सुस्पष्टता नसल्यानं त्याला स्वतःला पद्धत निवडणं, समजणं शक्य होत नाही.

Meditation Types Part 2: योग्य अशा वेळी गुरूच्या प्रभावाखाली त्यांनी सांगितलेल्या पद्धतीचंच अनुसरण तो करतो. दुदैवाने काही गुरू अप्रामाणिक असतात आणि ते स्वत: ध्यानाचा नियमितपणे सरावही करत नाहीत. यामुळे नव्याने ध्यानधारणा शिकणाऱ्या साधकांचा गोंधळ उड़तो. विश्वसनीय अशा ध्यानमार्गाच्या शोधात ते एका गुरूकडून दुसऱ्या गुरूकडे जाण्यात वेळ घालवतात.

वेळ, पैसा आणि ताकद खर्ची पडूनही हाती काहीच लागलं नाही, की त्यांना नैराश्य येतं आणि परिणामतः ते मनापासून ध्यानाची साधना करणं थांबवतात.Meditation Types Part 2

Leave a Comment

%d bloggers like this: