Meditation Types Part 1

Meditation Types Part 1 ध्यानधारणा‘ हा शब्दप्रयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यामुळे ध्यानधारणा म्हणजे नेमक काय, त्याचा सराव कशा प्रकारे करावा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

ध्यान करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तिचा विचार करण, अस काहींना वाटत.तर काहीजणांना ध्यानावस्था म्हणजे दिवास्वप्न बघणं किंवा काल्पनिक गोष्टीत रमणं असं वाटतं.

ध्यान धारणेविषयी असलेले हे गैरसमज आहेत.’ध्यान‘ ही अतिशय वेगळी प्रक्रिया आहे. ती पूर्णपणे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे.

Meditation Types Part 1: ध्यानधारणा हे एक तंत्र आहे त्यामुळे मन शांत होतं, स्थिरावतं.

मनात जागृतावस्था निर्माण होते.ही जागृतावस्था, आपण एरवी बाह्य जगात वावरत असताना असलेल्या जागृतावस्थेपेक्षा वेगळी आहे.

ध्यानधारणेत तुम्ही पूर्णपणे जागृत आणि सावध असता.

पण मनाचं त्या वेळी बाह्यजगाकडे किंवा तुमच्या आजूबाजला घडणाऱ्या गोष्टीकडे काहीही लक्ष नसत.याचा अर्थ तुमचं मन निद्रितावस्थेत असतं किंवा स्वप्न पाहात असतं,

Meditation Types Part 1:काल्पनिक गोष्टीत गुंग असतं,असंही नाही.

उलट मन स्थिर, शांत आणि एकाग्रचित्त झालेलं असतं.

मेडिटेशन (ध्यानधारणा)या शब्दाचं मूळही मेडिकल किंवा मेडिकेट या शब्दांच्या मुळासारखंच आहे.

एखाद्या गोष्टीकडे ‘लक्ष पुरवणं’ किंवा त्यावर काम करणं’ असा अर्थ या सर्वच शब्दांच्या मुळाशी आहे.

ध्यानधारणेत तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या,अस्तित्वाच्या सर्व बाजूंकडे नीट पारखून पाहता.तुम्हाला स्वत:लाच अनभिज्ञ अशा या गोष्टी असतात.

तुमच अस्तित्व अनेक पातळ्यांवर असतं. त्यातील खोलवर अस्तित्वात असलेल्या पातळ्यांची जाणीव तुम्हालाअसते.या खोलवर दडलेल्या पातळ्या खूप महत्त्वाच्या असतात.

विचारांची प्रक्रिया, एखाद्या गोष्टीचं पृथ:करण करणं,दिवास्वप्न बघणं,भावनांची अनुभूती,आठवणी या सर्वापेक्षा तुमच्या अस्तित्वात खोलवर दडलेल्या या पातळ्या अधिक परिपक्व असतात. त्या सर्वात जास्त परिणामकारक असतात.

Meditation Types Part 1: ध्यानधारणेत तुम्ही ‘स्व’चा शोध घेता, लक्ष पुरवता, अशा ध्यानाची ही प्रक्रिया शांत, शिथिल असते.त्याचे वेळी तुमचं सारं चित्त तीव्रतेनं तुमच्या अंतर्गत अस्तित्वाचा शोध घेत असतं.

अशा प्रकारे ध्यानाद्वारे सतत बाह्यजगाकडे भरकटणारं मन आत वळवणें अवघड नसतं किंवा त्याचा ताणही येत नाही.

याउलट ध्यानानं तुमच्या मनाला विश्रांती मिळते.मात्र मनाला अशा प्रकारे या आतल्या गाभाऱ्याकडे लक्ष पुरवण्याची शिकवण नसणं ही सुरुवातीची सर्वात मोठी अडचण असते.जगभरातील सर्व समाजांमध्ये त्या त्या संस्कृतीत जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये माणसं शिकून घेतात विचार करणं,काम करणं आणि बाह्य जगातील वस्तूंचा आणि अनुभवांचा शोध घेणं.

ध्यानधारणा म्हणजे काय?भाग 1
Meditation Types Part 1

Meditation Types Part 1: आपण ज्या जगात राहातो,ते जग समजून घेण्यासाठी आपण जीवशास्त्र,पर्यावरणशास्त्र रसायनशास्त्र यांसारखी शास्त्रे शिकतो, पण कुणीही-शाळा,कॉलेज किंवा विद्यापीठात – आपल्या अंतर्मिती जाणून घेण्यास किंवा त्यांच्याकडे बोलणं,लक्ष द्यायला आपल्याला शिकवत नाही. प्रथम स्वत:ला अंतर्बाह्य जाणण्याआधीच आपण केवळ आपल्या समाजातील मूल्यं, चालीरीती, उद्दिष्टं शिकत राहातो.यामुळे आपण स्वत:च्या बाबतीत अज्ञानी राहातो आणि दुसऱ्याच्या सल्ल्यांवर,सूचनांवर अवलंबून राहातो.शरीर,मन आणि श्वास हे तुमच्या अस्तित्वाचे तीन भाग आहेत. तुम्हाला स्वत:ची ओळख पटण्यासाठी या तीन पातळ्यांवर स्वत:ला समजून घेतलं पाहिजे.त्याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. ध्यानधारणा हे त्यासाठीचं अतिशय सूक्ष्म स्वरूपात अचूकपणे काम करणारं वेगळंच तंत्र आहे. ध्यानाला सुरुवात केल्यानंतर काही काळानं तुमच्या लक्षात येईल की ध्यानामुळे तुमच्यात होणाऱ्या चांगल्या बदलांमुळे,तुमचं जगणं आनंददायी होत आहे.विचारांची सुस्पष्टता, सजगता वाढून तुमची चित्तवृत्ती प्रफुल्लित राहाते. नियमित ध्यानधारणा केल्यानं तुम्हाला त्रास देणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळ्यांवरील तणाव दूर झाल्यानं तुमचं जगण सुंदर होतं.सुरुवातीला साधकांना सर्वसाधारणपणे जे प्रश्न पडतात,निरसनही त्यात केलेलं आहे. या तंत्रांचा वापर करून तुम्ही काही काळ सराव करू शकता. मात्र या मार्गक्रमणात एक वेळ अशी येते की तुम्हाला ध्यानधारणा करणाऱ्या अनुभवी साधकाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो.ध्यानाला सुरुवात केल्यास तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला शरीराच्या कुठल्याही अवघड कसरती यात करायच्या नाहीत.ध्यानधारणेचं तंत्र आत्मसात करताना कुठल्याही चमत्कारिक, अनोळखी गोष्टींची सबय लावून घ्यायची नाही. तसंच त्याचे फायदे मिळवण्यासाठी दीर्घ काळ ध्यान करत बसण्याचीही गरज नाही. प्रत्यक्षात ध्यानधारणा हा तुमच्या दैनंदिन जीवनातला एक आनंददायी अनुभव ठरेल. तुमचं शरीर तणावमुक्त, शिथिल होईल. मन अधिक सर्जनशील आणि एकाग्र होईल.तुमचे आरोग्य आणि इतरांशी असलेले नातेसंबंध यात लक्षणीय सुधारणा होतील.ध्यानधारणा ही शरीर-मनाचं आरोग्य सुदृढ़ करणारी उपचारपद्धती आहे.त्यामुळे स्नायूंमधील ताण नाहीसा होऊन ते शिथिल होतात. तसेच मज्जासंस्थेची
कार्यक्षमताही वाढते, त्यामुळे मन तणावमुक्त होतं. मन शांत, तृप्त झालं की आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती तणावाशी सामना करण्यात खर्ची पडत नाही.थोडे दिवस जरी तुम्ही निश्चयानं, प्रामाणिकपणं सराव केला तरी तुम्हाला बदल जाणवतील.तुमचे भुकेवर नियंत्रण राहील तसंच काही प्रमाणात तुमचा रागही आटोक्यात येईल.ध्यानधारणेने तुमची झोपेची गरज कमी होईल आणि शरीर मनाच्या पातळ्यांवर तुम्हाला ताजंतवानं वाटेल.लेखक, कवी आणि विचारवंत यांना अधिक सर्जनशील होण्याची गरज भासते.एखाद्या विषयाची समज, त्यातील गर्भितार्थ पटकन कळावा, थोडक्यात बुद्धिचातुर्य,तल्लखपणा वाढावा असं त्यांना वाटतं ध्यानधारणा हे असं एक तंत्र आहे की जे आत्मसात केल्यानं तुमच्या दैनंदिन जीवनातील कामाची प्रतिभा वाढेल.ध्यानधारणा आरोग्याच्या दृष्टीनंही फलदायी ठरते. सध्याच्या आधुनिक जगात बऱ्याच आजारांचे मूळ मानसिक,भावनिक अस्वस्थतेत असतं. अशा प्रकारचे आजार कोणत्याही पारंपरिकऔषधोपचारानं किंवा मानसिक उपचारानं बरे करता येत नाहीत.कारण आजाराचं मूळ तुमच्या मनात,तुमच्या भावनांत दडलेलं असेल तर केवळ बाह्य उपचारानं तो आजार बरा होणं शक्य नाही. आजाराच्या कारणमीमांसेकडे अनेक शास्त्रज्ञांचं लक्ष वळलं आहे व ते अशा निष्कर्षप्रत पोचले आहेत की तुम्ही जर स्वत:च्या मनोवस्थेचा शोध घेतला नाही,स्वत:च्या भावना जाणून घेतल्या नाहीत आणि केवळ बाह्य उपचार घेत राहिलात तर तुम्ही कायमच त्या उपचारपद्धतीवर आणि डॉक्टरवर अवलंबून राहाल,याउलट ध्यान धारणेनं लोक अधिक स्वयंपूर्ण होतात.त्याचं आत्मिक बळ वाढतं.परिणामतः आयुष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी ते अधिक सक्षम होतात.ध्यानधारणा म्हणजे काय?ह्या बद्दल थोड़ी माहिती तुम्हाला मिळाली असेल,भाग 2 मधे ध्यान प्रक्रियेबद्दल विचार करु,आभार…..Meditation Types Part 1

2 thoughts on “Meditation Types Part 1”

Leave a Comment

%d bloggers like this: