Meditation Eyes Position

Meditation Eyes Position
Meditation Eyes Position


Meditation Eyes Position मिटलेल्या डोळ्यांनी“– तुमचे डोळे बंद करून घ्या; पण हे डोळे मिटणे पूरेसे नाही. पूर्णतः मिटवणे म्हणजे डोळे बंद करणे आणि त्यांचे भिरभिरणे थांबवणे होय.नाहीतर काय होईल की बाहेरील कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टी पाहत राहणे हे सुुरु
राहील.

डोळे मिटलेले असले तरी तुम्ही बाहेरच्या वस्तू पाहाल– त्या वस्तुप्रतिमा असतील.

वस्तू प्रत्यक्षात जरी तेथे नसल्या तरी त्यांच्या प्रतिमा, कल्पना, साठलेल्या आठवणी यांचा प्रवाह सुरू होईल, म्हणजे अद्यापही तुमचे डोळे पूर्णतः बंद करणे म्हणजे काहीही न पाहणे होय. हा फरक समजून घ्या.

तुम्ही डोळे मिटू शकता, ते अगदीच सोपे आहे. प्रत्येकजण प्रत्येक क्षणाला ते बंद करत असतो.

रात्री झोपताना तुम्ही डोळे मिटता;पण त्याने तुमच्या अंतर्रंगातील स्वभाव तुम्हाला समजणार नाही.

Meditation Eyes Position डोळे अशा रीतीने मिटा की, बघण्याची काहीच शिल्लक नाही– बाहेरची वस्तू बाह्यवस्तूची मनातील प्रतिमा यापैकी काहीच नको, असावा फक्त कोरा, अर्थशून्य काळोख, जणू काही तुम्ही अचानक आंधळे झाला आहात- हे अंधत्व फक्त वास्तवापुरते नाही, तर स्वप्नांच्याबाबतीतही असायला हवे.Meditation Eyes Position


यासाठी अभ्यास करावा लागेल. तो लगेचच होणार नाही. त्यासांठी दीर्घ काळ आवश्यक आहे. तुम्हास दीर्घकालीन प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटेल अशा कोणत्याहा वेळी डोळे बंद करा.

डोळ्यांच्या सर्व हालचाली आतून थांबवा. एकटी हालचाल होऊ देऊ नका. निश्चलतेची अनुभूती घ्या. असे अनुभवा की, जणू डोळे दगड बनले आहे आणि डोळ्यांच्या त्या ‘दगडी’अवस्थेत राहा.

काहीही करू नका,फ़क्त तेथे राहा.एखाद्या दिवशी तुमच्या अचानक लक्षात येईल की, तुम्ही स्वतःच्या अंतरंगात पाहत आहात.तुम्ही तुमच्या शरीराचे फक्त बाह्यरूप पाहिलेले आहे. तुमच्या शरीराला तुम्ही आरशात पाहिलेले आहे किंवा तुमच्या हातांचे बाह्यरूप पाहिले आहे. तुमच्या शरीराच्या आत काय आहे हे तुम्ही पाहत नाही.

स्वतःमध्ये तुम्ही कधी प्रवेश केलेला नाही. आतमध्ये काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही कधी शरीराच्या आणि तुमच्या अस्तित्वाच्या मध्यवबिंदूवर गेला नाहीत.

डोळे बंद करून घ्या, तुमच्या आतील अस्तित्वाचे निरीक्षण तपशीलवार करा आणि एका अवयवाकडून दुसर्याकडे बघत फिरत राहा. फक्त पायाच्या पंजाकडे जा. सगळे शरीर विसरा आणि फक्त पंजा बघा. तेथे स्थिर व्हा आणि बघत राहा.

त्यानंतर संपूर्ण पायांना बघून वरच्या दिशेने येताना प्रत्येक अवयवाचे निरीक्षण करत या मग अनेकानेक गोष्टी घडतात. मग तुमचे शरीर असे एक संवेदनक्षम वाहन बनते, ज्याची तुम्ही कधी कल्पना ही करू शकत नाही, मग कुणाला स्पर्श करताना, तुमचे सर्वस्व तुमच्या हातात तुम्ही ओतू शकता आणि तो स्पर्श परिवर्तनशील बनू शकतो.

शिक्षकाचा स्पर्श, गुरूंचा स्पर्श तसा असतो. ते कोणत्याही अवयवात सर्वस्व ओतू शकतात आणि तेथे एकाग्र राहू शकतात. तुम्ही जर शरीराच्या कोणत्याही भागात पूर्णत्वाने जाऊ शकलात. तर तो भाग चैतन्यमय होईल.

Meditation Eyes Position इतका की, त्याच्या बाबतीत काय घडेल याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. तर मग तुम्ही पूर्णतः डोळ्यांकडे या. जर तुमच्या डोळ्याने पूर्णतः उतरून तुम्ही कुणाच्या डोळ्यात पाहिले तर त्याच्या अंतरंगात खोलवर तुम्ही घुसू शकता.डोळे मिटून तुमच्या आंतरिक अस्तित्वाचे निरीक्षण करा. ते करताना प्रथमतः त्याचा बाह्यभाग असणाऱ्या शरीराकडे तुम्ही आतून- तुमच्या आत्मकेंद्रावरून बघायचे आहे.

तेथे स्थिर राहा आणि बघा. तुम्ही शरीरापासून वेगळे व्हाल; कारण द्रष्टा हा कधीच दृश्यविषय नसतो. निरीक्षक हा निरीक्ष्य वस्तूपासून वेगळा असतो. जर पूर्णतः आतून तुम्ही तुमचे शरीर बघू शकलात तर तुम्ही म्हणजे तुमचे शरीर असल्याचा भ्रम तुम्हाला कधी होणार नाही. तुम्ही त्याच्यापासून पूर्णपणे वेगळे राहाल. शरीरात असाल; पण शरीर नसाल. हा झाला पहिला भाग.

असे झाल्यावर तुम्ही शरीरापासून मुक्त होऊन कुठेही जाण्यास स्वतंत्र आहात. तुम्ही तुमच्या मनात जाऊ शकता, अगदी खोल. तो मनाच्याआतील गुहा आहे.

तुम्ही मनाच्या गुहेत प्रवेश करू शकलात तर मनापासूनदेखील तुम्ही विलग व्हाल.मग मन एक विषयवस्तु आहे, तसेच मनात येणारे हे मनापेक्षा वेगळे व विलग आहेत. हे तुम्ही पाहाल. तुमच्या अंतरंगाचे सखोल निरीक्षण करणे याचा अर्थ अशा रीतीने मनात प्रवेश करणे हा आहे.

शरीर आणि मन या दोहोच्याही आत जायला हवेआणि त्यांच्याकडे आतून बघायला हवे. मग तुम्ही केवळ साक्षी राहता त्यांच्याकडे आतून बघायला हवे. मग तुम्ही केवळ साक्षी राहता आणि ही साक्ष भेदता येत नाही, जिच्या आत जाता येत नाही, तिला बघता येत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मसत्यापर्यंत आलेले असता.

Meditation Eyes Position तुम्ही साक्षीच्या स्रोताचे साक्षी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा,ते अतार्किकआहे.जर कुणी असे म्हणाले, “मी माझा साक्षीभाव पाहिला आहे.” तर ते अतार्किक आहे.ते अतार्किक का आहे ? कारण जर तुम्ही स्वतःच्या साक्षीभावाची साक्ष होत असाल ती स्वतःची साक्ष असणार नाही. ज्याने पाहिले आहे तो साक्षीदार असतो. तुम्ही जे बघू शकता; ते तुम्ही नसता, तुम्ही ज्याचे निरीक्षण करू शकता; ते तुम्ही नसता, तुम्हाला ज्याच्याविषयी जाणीव होते; ते तुम्ही नसता.Meditation Eyes Position

आचार्य ओशो रजनीश

1 thought on “Meditation Eyes Position”

Leave a Comment

%d bloggers like this: