Meditaion Types

images_1592242319751

Meditaion Types ध्यान म्हणजे साक्षीभाव, ध्यान म्हणजे साक्षीदार होणं., ध्यान ही कोणतीही पद्धती नाही. हे तुम्हाला मोठ विरोधाभासी वाटेल कारण मी तर पद्धतीवर पद्धती देत आहे;

पण ऐका व्यापक अर्थान ध्यान ही कोणतीही पद्धती नाही. ध्यान एक भान आहे.शुद्धिवर असणे आहे.तरीही पण तुम्हाला पद्धतीची गरज आहे, कारण या उच्च जागृतावस्थेपासून तुम्ही खूप दूर आहात. हे भान तुमच्या आतच खोलवर दडलेलं आहे. तरी देखील तुम्ही त्यापासून दूर आहात.

अगदी या क्षणी देखील तुम्ही ध्यान प्राप्त कराल: पण तसं होणार कारण तुमच्या चंचल मनाचे काम मात्र चालूच राहते. या क्षणी ते शक्य असूनही अशक्य आहे. यात जी पोकळी आहे ती भरूनकाढण्यासाठी पद्धतीची गरज आहे, पद्धती आहे तेवढ्याचसाठी.तर आरंभी पद्धतच ध्यान बनते.

मात्र असे केल्यानंतर शेवटी तुम्हाला हसू येईल.तुम्हाला जाणवेल की ध्यानाची पद्धत ही ध्यान असत नाही. ध्यान तर एक अंतिम शक्ती आहे आणि तिची गुणवत्ता वेगळ्याच प्रकारची आहे. तिला कोणत्याच वस्तूशी काही देणं घेण नसतं; पण हे अगदी शेवटी घडून येईल. असं नका समजू की आरंभीच हे घडेल, नसता पोकळी कधीच भरून निघणार नाही.

                   प्रयत्नाने सुरुवात करा


ध्यानाच्या पद्धतीत कृती आहे, कारण तुम्हाला काही करण्याचा सल्ला दिला जातो.ध्यान करणं म्हणजे काही करणंच आहे; मौन पाळणं देखील काही करणंच आहे, काहीच न करणदेखील एक प्रकारचं करणंच आहे. बाह्य रूपानं पाहिलं तर सगळयाच ध्यान पद्धती कृती आहे; पण खोलात पाहिलं तर ती कृती नाही.

कारण तुम्हाला जर यात यश आलं तर सगळ्या कृती समाप्त होतात.आरंभीच फक्त असं वाटू लागतं की प्रयत्न केले जात आहेत;

पण जसजसे तुम्ही यशस्वी होता तसे प्रयत्न दूर होऊ लागतात. आणि सगळं कसं स्वयंस्फूर्त आणि प्रयत्नरहितहोत जातं. तुम्ही यात यशस्वी होता तेव्हा कोणतीच कृती शिल्लक राहत नाही. मग तुम्ही प्रयत्न करण्याची कसलीच गरज राहत नाही. श्वासोछ्वास करायला आपणाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत तशी स्थिती येते;

परंतु आरंभी मात्र प्रयत्न करावे लागतात.कारण मनाला सवयच प्रयत्न करण्याची असते. प्रयत्नरहित काही दाखवलं तर ते अर्थहीन वाटायला लागतं. झेन ध्यान पद्धतीत प्रयत्न रहिततेवर खूप भर देण्यात आला आहे. त्यात गुरू आपल्या शिष्याला सांगतो, ‘बसून राहा काहीही न करता बसून राहा.’ आणि शिष्य तसा प्रयत्न करतो. कारण प्रयत्नाशिवाय तुम्ही करू तरी काय शकता?


तर आरंभी प्रयत्न असतील, कृतीपण असेल; पण केवळ आरंभी ते अनिवार्यच असते.अशा वेळी तुम्हाला सतत याचे भान असणे अवश्यक आहे की याच्या पलीकडे आपल्याला जायचे आहे. एक क्षण असा आलाच पाहीजे ज्यावेळी ध्यानासाठी तुम्ही काहीच करत नाहीत अशी स्थिती यावी.

बस, तुम्ही फक्त विश्रातीयुक्त सावध असा आणि येईल. मग तुम्ही बसा किंवा उभे राहा, ध्यान आपोआप घडून येईल. काहीच करू न फक्त जागरूक राहा आणि ध्यान घडून येईल. काहीच करायचं नाही, केवळ जागे राहायचे सावध राहायचे आणि ध्यान घडेल.


तुम्हाला ज्या विविध ध्यान पद्धती करता त्याच मुळी प्रयत्नरहित स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी. आंतरिक बदल, अंतरोअनुभूती प्रयत्न करून येत नसते. कारण प्रयत्न एक तणाव असतो. प्रयत्न करताना तुम्ही मुळीच विश्रात असू शकत नाही, कारण प्रयत्नच एक अडसर बनतो. हे लक्षात ठेवून तुम्ही प्रयत्न केला तर हळूहळू प्रयत्नसस्थिती प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल, प्रयत्न आपोआप गळून पडतील.Meditaion Types


मन मोठे दुर्बोध जटिल आणि कोमल असत.काय करावं हे जेव्हा कळत नाही तेव्हा काहीच न करणं उत्तम. कारण अज्ञानानं तुम्ही काही करू गेल्यास प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचा बनतो.असं करणं


घातकदेखील बनू शंकतं. ते आत्मघातकी बनू शकते.

 

Meditaion Types ध्यान म्हणजे साक्षीभाव, ध्यान म्हणजे साक्षीदार होणं., ध्यान ही कोणतीही पद्धती नाही. हे तुम्हाला मोठ विरोधाभासी वाटेल कारण मी तर पद्धतीवर पद्धती देत आहे;

मनाबद्दल तुम्ही काहीच जाणत नसता. मन तर एक शब्दच आहे. त्याचा गुता तुम्हाला माहीत नसतो. मन हे अस्तित्वाची एक जटिल बाब असते.

त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नसते. मन सगळ्यात जास्त कोमल असते. तुम्ही त्याला नष्ट करू शकता. तुम्ही असं काही कराल की ते पुन्हा पुसून काढणं अशक्य असेल. ध्यानाची पद्धत अगदी गहन अनुभवावर आधारित आहे;

एका गहन साक्षात्कारावर आधारित आहे. प्रत्येक पद्धत दीर्घप्रयोगावर आधारित आहे.तर हे लक्षात ठेवा. आपण स्वतःहून काहीही करायचं नाही. तसंच दोन विभिन्न पद्धतींची सरभेसळ करायची नाही. कारण प्रत्येक पद्धतीची कार्यशैली वेगळी असते, तिचे मार्ग भिन्न आहेत, तिचे आधार भिन्न आहेत.यासर्व पद्धती पोहोचवतात एकाच मुक्कामावर; परतु त्यांची साधनं भिन्न भिन्न आहेत. काही वेळेस तर ते परस्परविरोधी असू शकतात. म्हणून दोन पद्धती एकत्र मिसळू नका. खरं तर काहीच मिसळू नका. पद्धत ज्या प्रकारची असते तिचा त्याच प्रमाणं उपयोग करा.


त्यात काहीही बदल करू नका. कारण त्यात तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही.तरी तुम्ही बदल केला तर तो घातक ठरेल.
एखादी पद्धत तुम्ही अवलंबिता. त्याआधी ती तुम्हाला पूर्णपणे समजली आहे याची काळजी घ्या. तुम्हाला काही शंका असेल आणि पद्धत नक्की कशी आहे याची माहिती नसेल तर तिचा अंमल न करणंच योग्य ठरेल. कारण प्रत्येक पद्धत तुमच्यात क्रांतिकारी परिवर्तन घडवते!
आरंभी पद्धत नीट समजून घ्या. समजल्यानतरच तिचा अमल करा.Meditaion Types

ओशो रजनीश यांचे ध्यानाचे प्रकार

%d bloggers like this: