Matsyasana 100℅ कृति सर्वांगासनात कंठस्नायूंचा संकोच व मानेवर येणारे शरीराचे ओझे यामुळे गळयावर दाब निर्माण होऊन कंठस्थ ग्रंथींच्या (थायरॉईड व पॅराथॉयराईड) आरोग्याचे संवर्धन होते व त्यांतील दोष नाहीसे होतात.Matsyasana 100℅ कृति
Matsyasana 100℅ कृतिहीच दोषनाशक व आरोग्यसंवर्धनाची क्रिया सर्वांगासनानंतर, मत्स्यासन या क्रमाने अभ्यास केल्यास त्वरित व अधिक फलदायी होते. म्हणून मत्स्यासनास सर्वांगासनाचे पूरक आसन समजतात.Matsyasana 100℅ कृति
माशाप्रमाणे सहजपणे पाण्यावर तरंगत राहण्याकरिता ( फ्लोटिंग ) मत्स्या-सनातील शारीरिक आकृतिबंध अधिक सोयीचा व उपयुक्त ठरतो. म्हणून याआसनास ‘मत्स्यासन’ असे नाव पडले आहे.
पूर्वस्थिती :
पाय पसरून बसावे.
आसन साधण्याची कृती :
पद्मासनात बसावे
१). दोन्ही तळहात पार्श्वभागाच्या बाजूस जमिनीवर ठेवावे. नंतर प्रथम एका बाजूस वाकून त्या बाजूचे कोपर जमिनीवर ठेवावे. नंतर दुसऱ्या बाजूस वाकून दुसऱ्या हाताचे कोपर जमिनीवर ठेवावे

कोपरापर्यंतचा जमिनीवरील हात एकेक करून मांड्यांच्या बाजूस पुढे घ्यावा व सावकाश मस्तक व पाठ जमिनीवर टेकवावी (आ. ३

नंतर तळहात वरच्या बाजूस करून ते त्या त्या बाजूच्या मांडीखाली घालावे.मांडीच्या दाबाचा बाधार घेऊन, कोपरापर्यंत हात जमिनीवर ठेवून त्यांच्या बळावर कमरेपासून मस्तकापर्यंत शरीर वर उचलावे व मस्तक कमरेच्या बाजूस, पाठीस कमान करून जितके आत बाणता येईल तितके आत आणावे व जमिनीवर ठेवावे

मस्तक जमिनीवर पक्के बसल्यावर तळहात वर घ्यावे. दोन्ही हातांच्या तर्जनींना ‘हुका ‘प्रमाणे आकार द्यावा. नंतर डाव्या तर्जनीने उजव्या पायाचा अंगठा
व उजव्या तर्जनीने डाव्या पायाचा अंगठा वरच्या बाजूने पकडावा (आकृती आ.)कोपर जमिनीस स्पर्श करून ठेवावे. मात्र त्यावर शरीराचा भार घेऊ नये. ही
मत्स्यासनाची अंतिम स्थिती होय.

श्वासोच्छ्यास व दृष्टी:
श्वासोच्छ्वास चालू ठेवावा. शरीर वर उचलून मस्तक जमिनीवर ठेवताना व शेवटची स्थिती धारण करताना श्वास कोंडला जातो.
तसेच आसन सोडतेवेळी मस्तक वर उचलताना नकळत श्वास रोखला जातो. त्या वेळी जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास चालू ठेवावा. दृष्टी भ्रूमध्यावर स्थिर करावी.
ती सवय नसल्यास भुवया वर न उचलता कपाळाकडे पाहावे, अथवा डोळे मिटून कंठताणावर लक्ष द्यावे.
ते कठीण वाटल्यास डोळे मिटून प्राणधारणा करावी.
आसन सोडण्याची कृति
कृती : आसनाच्या अंतिम स्थितीत जाताना ज्याप्रमाणे पायरी-पायरीने जावे लागते त्याच्या विरुद्ध रीतीने हळूहळू आ. ५, ४, ३, २, १ यांत दाखविल्याप्रमाणे क्रमाक्रमाने कृती करावी व पूर्वस्थितीस यावे.
अभ्यास :
◆प्रथम ३ ते ५ श्वासोच्छ्वासांची २-४ आवर्तने करावी. चांगल्या अभ्यासानंतर दोन दीर्घ आवर्तने करावी.
◆पद्मासन घालताना उजवा व डावा पाय
आलटून पालटून प्रथम मांडीवर घ्यावा.
◆ सर्वांगासनाच्या अवधीच्या एक तृतीयांश
किंवा निम्मा वेळ मत्स्यासनाच्या प्रत्येक आवर्तनास द्यावा.
सूचना :
(१) मानेच्या हाडांमध्ये दोष असल्यास किंवा घशाला सूज असल्यास हे आसन करू नये. मस्तकाची कातडी नाजूक असल्यास मस्तकाखाली वस्त्राची घडी घालून सौम्य, मुलायम व सुखदायक असे आसन मस्तकाकरिता तयार करावे. मात्र सरावानंतर ही पद्धत सोडावी.
(२) अंतिम स्थितीत कमरेपासून मस्तकापर्यंत कमान ठेवण्याची व कमानीचे ओझे पेलण्याची क्षमता जोपर्यंत मानेमध्ये व मस्तकामध्ये नसते तोपर्यंत जमिनीवर कोपर दाबून आवश्यक त्या वेळी हातांचा आधार घ्यावा. तसेच कमान साधताना व सोडताना हातांचा आधार घ्यावा. अन्यथा मस्तक घसरून केस तुटण्याची व कातडीस इजा होण्याची शक्यता असते.
(३) पाठीची कमान करताना पूर्वणित हातांच्या आधारस्थितीपेक्षा निराळया मार्गानेही कमान साधता येते. आ. ३च्या शारीरिक स्थितीनंतर हात मागे नेऊन
तळहात, बोटे खांद्याकडे करून कानापाशी ठेवावे व मग हातांच्या आधाराने कमान साधावी. अशा वेळी कमान पक्की झाल्यावरच हात पुढे घेऊन तर्जनींनी अंगठे पकडावे.
पूर्वाभ्यास :
प्रारंभी पद्मासनात बसता येत नसल्यास अर्ध-पद्मासन, सुखासन वा वज्रासन या आसनात बसून, मस्तक जमिनीवर ठेवून कमरेपासून मस्तकापर्यंत कमान साधावी व तर्जनींनी पायांचे अंगठे पकडण्याऐवजी तळहात जांघेपाशी ठेवून
कोपर जमिनीवर ठेवावे.
या अभ्यासाने कमान करण्याचा सराव होईल. त्याच वेळी पद्मासन साधण्याचा अभ्यास चालू ठेवावा, म्हणजे मूळच्या मत्स्यासनाची अंतिम स्थिती हळूहळू साधता येईल.
लाभ :
(१) सर्वांगासनाच्या जोडीने मत्स्यासन केल्यास, सर्वांगासनामुळे ग्रंथीद्वारा शरीराला मिळणारे सर्व लाभ अधिक व्यापक, समृद्ध व तीव्र बनतात.
(२) मानेचे स्नायू दृढ व गळयाचे स्नायू लवचिक बनतात. (३) पाठीच्या स्नायूंना निष्क्रीय आकुंचनामुळे (पॅसिव्ह कॉन्ट्रॅक्शन) प्रतिक्रियात्मक आराम मिळतो.
(४) पाठीच्या कण्याची, विशेषतः मानेजवळील भागाची दृढता वाढते व मानदुखी(स्पॉन्डिलॉसिस) होण्याची शक्यता कमी होते. कणा बळकट बनतो.
(५) फ़ासल्या मधील व फासळी जोडलेले (इंटरकोस्टल व कोस्टल) छातीचे स्नायू ताण
मिळाल्यामुळे अधिक लवचिक बनतात व छातीचा पिजरा जास्त कार्यक्षम बनतो.तसेच श्वसनक्षमता ( लंग्ज़ कपॅसिटी) वाढते. त्यामुळे दम्यावरील योगोपचारात एक महत्त्वाचे आसन म्हणून याचा अंतर्भाव केला जातो.
(६)Matsyasana 100℅ कृति याच्या नित्य अभ्यासाने हनुवटीखालील स्नायूंची अतिरिक्त वाढ व शिथिलता (डबल चीन)नाहीशी होते.Matsyasana 100℅ कृति
लेखक: सदाशिव निमबाळकर