Kapalbhati प्रकार

‘भसावल्लोहकारस्य रेचपूरौ ससंभ्रमौ ।।
कपालभातिर्विख्याता कफदोष विशोषणी’ ।। ह.यो. २ -३५।।

Kapalbhati प्रकार स्नानादि विधि आटोपल्यावर १५ ते २० मिनिटांनी देवासमोर अगरबत्ती लावून प्रसन्न वातावरणांत ३x३ चे आसन तयार करून त्यावर वज्रासन तथा पद्मासनात बसावे.

कमरेच्या नाडयांना बंधन म्हणून पुरुषांनी लंगोट व स्त्रियांनी काच्या लावावा.

बसावयाचे आसन-

Kapalbhati प्रकार
Photo by Karolina Grabowska on Pexels.com Kapalbhati प्रकार

Kapalbhati प्रकार ◆सुखासन,पद्मासन,दर्भांसन,कुशासन अगर लोकरीची घोंगडी किंवा साधी जनी गरम कपडचाची ब्लँकेट घेऊन त्यावर साधा पांढरा सुती कपडा असावा. कारण एवढेच की,आसनस्थ झाल्यावर ज्या क्रिया करणार आहोत त्यात निर्माण होणाऱ्या उष्णतेचा प्रवाह जमिनीत जाऊं नये.Kapalbhati प्रकार

बसतांना पाठीचा कणा ताठ असावा व नुसत्या कल्पनेने गुदद्वार वर ओढलेले असावा.

◆डोळ बंद करून हात गुडघ्यावर ठेवावेत पण हाताची बोटे गढघ्याच्यापुढे जाता कामा नयेत.

◆तसेच ध्यान मुद्रेत किंवा ज्ञान मुद्रेत बसण्याची आवश्यकता नाहीं.उद्देश एवढाच कीं, क्रिया करतांना गुढघ्यावर असलेले तुमचे हात खाली पडता कामा नयेत.

■प्रथम कुलदेवतेचे स्मरण करून शांतपणे १० ते १५ वेळा दीघं श्वास प्रश्वासाची क्रिया करावी.श्वासाला ‘पूरक’ व प्रश्वासाला ‘रेचक’ असे म्हणतात.

■पूरकाच्या वेळेला गुदद्वारापासून पाठीच्या कण्यातून श्वास भरत भरत मेंदपर्यंत जाऊन रेचक करीत खाली गुदद्वारापरयंत परत यावयाचे आहे.ही क्रिया
शांतपणे चालू ठेवावी. गुदद्वाराच्या भागाला भूमि किवा ‘पिड’ असे म्हणतात व मेंदूच्या भागाला ‘सहस्रार’ किंवा ‘ब्रह्मांड’ म्हणतात.वरीलप्रमाणे दीर्घ श्वास प्रश्वास करताना कल्पना करावी की, पिडापासन ब्रह्मांड व ब्रह्मांडापासून पिंड प्रवास चाल ठेवावयाचा आहे.या क्रियेला “प्राणाकर्षण क्रिया”असे म्हणतात.


आसन स्थिर होऊन मनाची चंचलता कमी होते व नंतर पढील क्रिया करणेस प्रकृतीस चालना मिळते. नंतर साधनेची पुढील सुरुवात नमन मुद्रेत
दिल्याप्रमाणे करावी याला योगमुद्राही म्हणतात.

नमन मुद्रा

दोन्ही हात छातीच्या मध्यावर जोडावेत (नमम्कार करावा)छातीचा मध्य म्हणजे मनाचे ठिकाण.

हळुवार श्वास भरत भरत दोन्ही जोडलेले हात वर
नेऊन ताठ ठेवावेत

(वृक्षासनाप्रमाणे).दोन्ही हातांचे दंडाचे आंतील बाजूंचा कानांना स्पर्श झाला पाहिजे. अशा रीतीने ताठ नेलेले हात लगेच त्याच स्थितीतून रेचक करीत खाली जमिनीवर आणावेत.यावेळी कमरेपासूनचा भाग पढे वांकलेला असेल.कपाळा चा भाग व सरळ केलेले हात जमिनीवर टेकल्यानंतर शरीर जरा ढिले सोडावे व शांतपण श्वास प्रश्वास करीत एक मिनिटाकरिता थांबण्याची सवय करावी.

नंतर ढिले केलेले शरीर पूर्ववत् ताठ करून श्वास भरत भरत वर यावे व प्रश्वास (रेचक) करीत डोक्यावर नेलेले हात पूर्वीप्रमाणे हळूहळू नमस्काराचे स्थितीत छातीच्या मध्यावर आणावेत.

याप्रमाणे पुन्हा तीच मुद्रा करावयाची असल्यास त्याचप्रमाणे वर जातांना श्वास घेत जाणे व खाली येतांना श्वास सोडीत येणे असा क्रम ठेवावा.

मुद्रा संपल्यावर हात गुडघ्यावर ठेवावेत.

हात पाठीमागे बांधावयाचे व पोटाला आवळून वर प्रमाणे योगमुद्रा करावयाच्या असतात.अशा प्रकारे मुद्रा केल्यानंतर आसन स्थिरता येते व मनाची चंचलता कमी होते.शरिरांत एक चैतन्य निर्माण होऊन श्वास मार्ग मोकळे होतात.

रक्ताभिसरण(ओटीपोटातील) नाडया मोकळघा होतात व पुढील कपालभातिच्या क्रिया करणे सोपे जाते.

कपालभाति लोहाराचे भात्याप्रमाणे सं-सं ध्वनि करीत दोन्ही नासिकांनी करावयाची आहे.भाति याचा अर्थ शुद्ध करणे.यांत प्रामुख्याने कपाळाच्या भागातील व छातीतील मळमट साफ केले जाते,जशी आरशावर पडलेली धूळ झटकन टाकावी- किवा जसा घरांतील
कचरा झाडू लावून काढावा.

पूढीलप्रमाणे दोन प्रकारांनी कपालभाति केली
जाते.

प्रकार पहिला

आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याने नाकाचा डावा छेद(चंद्र नाडी) बंद करून उजव्या छेदाने (सूर्य नाडीने)लोहाराचे भात्याप्रमाणे घर्षणयुक्त श्वास प्रश्वास जलद गतीने चालू करावेत.

श्वास घेण्याची क्रिया म्हणजे पूरक व प्रश्वासाची क्रिया म्हणजे रेचक.याप्रमाणे पूरक-रेचक
अपर्ण गतीने प्रथम उजव्या नाडीने करावेत.

सुरुवातीस सहज करता येतील तेवढे श्वास प्रश्वास करून शेवटचा रेचक केल्यानंतर त्याच अवस्थेत थोडा थांबण्याचा प्रयत्न करावा.याला बाहय कंभक म्हणतात.

नंतर सावकाशपणे एक दीर्घ पुरक घेऊन २ ते ४ सेकंद आंत थांबवून म्हणजे आंतर कुंभक करून हळहळू दीर्घ रेचक करावा.याप्रमाणे उजव्या नासिकेचा एक टप्पा झाला.

अर्धा मिनिट विश्रांति घेऊन उजवी नाडी उजव्या हाताने अंगुष्ठाने बंद करून डाव्या नाडीने वर प्रमाणेच क्रिया करावी व दुसरा टप्पा साधावा.

अशा रीतीने एकएक नाडी तीन-तीन बेळा चालविण्याचा क्रम ठेवावा.प्रत्येक टप्प्याचे शेवटी अर्धा मिनिट विश्रांति घ्या. सुरुवातीस साधारणपणे १० ते १५ वर प्रमाणे पूरक रेचक करून दर दिवसाचे अभ्यासान त प्रमाण १० पासून वाढवीत १०८ पर्यंत न्यावयास हरकत नाही. क्रमसंख्या आपल्या शक्तिनुसार वाढवीत जावी.

प्रकार दुसरा

कपालभाति क्रमांक १ च्या आठ दिवसाचे अभ्यासानंतर प्रकार दूसरा सुरू करावा.ज्या व्यक्तीला ही क्रिया सहज साधते त्यांनी सुरुवातीपासूनच दोन्ही प्रकार केले तरी चालतील.या प्रकारांत दोन्ही नाडया (सूर्य व चंद्र) एकाचवेळी वरीलप्रमाणे भात्यासमान चालवावयाच्या आहेत.

यावेळी दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवून डोळे बंद करून क्रिया करावी.प्रकार एकचे क्रमशः सहा टप्पे झाल्यानंतर प्रकार दोन चालू करावा. याचेही तीन टप्पे
घ्यावेत म्हणजे दोन्ही प्रकार मिळून नऊ टप्पे होतील.

प्रत्येक टप्प्याच्या शेवटी वर सांगितल्याप्रमाणे अर्धा मिनिट विश्रांति घ्यावी.प्रथम १० पूरक रेचकांचा सनाद भाता चालवून १०८ पर्यंत आपल्या शक्तिनुसार वाढवूं शकता. यांत विशेष घ्यावयाची खबरदारी म्हणजे कपालभातिचे परक रेचक जलद करतांना भात्याप्रमाणेच पुरक घेतला म्हणजे पोट पढे आले पाहिजे व रेचक केला म्हणजे पोट आंत गेले पाहिजे. नैसर्गिकरीत्या याचप्रमाणे श्वास प्रश्वास होत
असतात.झोपलेल्या माणसाच्या पोटाकडे बघतल्यानंतर आपली खात्री होइल.१०८ च्या कपालभातिची सवय झाल्यानंतर मग अंक माजण्याची जरूरी नाही.मग तो एकशेआठ मण्यांचे जपमाळेचा सोsहम्चा जप होईल व त्याचाही आध्यात्मिक आनंद मिळेल.

शंका समाधान सर्वसाधारण कपालभातिचे स्वरूप दोन प्रकारचे आहे. जसे आध्यात्मिक व शारीरिक, आध्यात्मिक कपालभातित फक्त रेचक धक्के देऊन बाहेर घालविला जातो व पूरक स्वाभाविक होत असतो.

कपालभाति मनाच्या स्थितीला संपादन करते म्हणून तिला अध्यात्म कपालभाति म्हटले आहे.व दसरी पूर्णशोधन कपालभाति जिला भस्त्रिका म्हणतात, तिला शारीरिक कपालभाति म्हणतात,

कपालभाति एक विशेष तंत्र आहे,पद्धति आहे त्यात श्वास प्रश्वासाचे खास प्रमाण माहिती करून घेतल्यास अधिक लाभ होतो. श्वसन क्रियेचे तीन भेद होतात, रेचक, पूरक आणि कंभक.कपालभाति प्राणायामांत फक्त रेचक आणि पुरक होतात याचे स्मरण असावे.भाति म्हणजे शोधन,

लोहाराच्या भात्याप्रमाणे पूरक-रेचक घर्षणयक्त करून उष्णता वाढविली जाते म्हणून त्यास भाति नाव दिले गेले आहे.कपालभातित अपूर्ण (दीर्घ नाही)
पूरक रेचक केले जातात.

लाभ:

1)अमाशयाची शुद्धि होऊन पचनशक्ती प्रदीप्त होते. श्वासनलिका,अन्ननलिका, फूप्फसे कार्यक्षम होतात.

2)सर्दी, कफादि विकार, क्षय, श्वास लागणे, छातीची धडधड दूर होऊन मस्तकाचे नाडयांची शद्धि होते. प्राणवायू संचित करण्याची पात्रता येते,पुढील प्राणायामासाठी पाया मजबूत केला जातो.

3)स्त्री-पुरुष तथा प्रौढ व बालकांनीही याचा अवश्य फायदा घ्यावा.कारण कपालभातिने रोगजंतूचा नाश केला जातो.चरबी जळून जंडत्व कमी होते.

4)रक्त शद्ध होते. कातडीचे विकार नाहीसे होतात. स्फ्ति निर्माण होऊन शरीर हलके होते.चित्त शांत होऊन घाबरणे व चिंता कमी होते. तसेच मानसिक संतुलन राखले जाते.

5)रजोगुण आणि तमोगुण कमी होतात.आसन जय प्राप्त होतो, चित्त स्थिर व एकाग्र होणेस मदत होते.

Kapalbhati प्रकार वरीलप्रमाणे कपालभातिच्या लाभाप्रमाणेच जास्तीत जास्त उष्णता निर्माण करणारे शोधन कर्म
निर्माण करण्यास माझ्या उज्जायी या ब्लॉग वर अधिक माहिती मिळेल.Kapalbhati प्रकार

अम्बिका योग कुटीर वर क्लिक करा
जूना आग्रा रोड, ठाणे
(ठाणे, मुलुंड,घाटकोपर,दहिसर,बोरीवली,वसई,भांडुप)
येथे संपर्क करावा.

Leave a Comment

%d bloggers like this: