
In Pranayama Eye आणि Ear Position
◆In Pranayama Eye आणि Ear Position मेंदूच्या चलबिचलतेवर डोळ्याकडून नियंत्रण केले जाते आणि मनाच्या चलविचलतेवर कानाकडून नियंत्रण केले जाते. प्राणायाम करतेवेळी डोळे बंद व निश्चल हवेत आणि कानाने फक्त श्वासाचा आवाज ऐकावयास हवा.
वरच्या पापणीने बुबुळावर थोडा सौम्य दाब आणून व खालची पापणी निष्क्रिय ठेवून डोळे बंद ठेवावेत, म्हणजे ते नरम राहतील. त्यांना कठीण व कोरडे बनवू नये.
In Pranayama Eye आणि Ear Position वरच्या पापण्या डोळ्यांच्या खोबणीच्या बाहेरील कोपऱ्याकडे हलवाव्यात, म्हणजे नाकाजवळील व डोळ्याच्या खोबणीच्या आतील कोपऱ्यावरील त्वचेवरचा तणाव कमी होईल.In Pranayama Eye आणि Ear Position
बुबुळ स्थिर ठेवावे आणि नाक समांतर ठेवावे, कपाळाच्या मध्यावरील त्वचेवरचा ताण सैल करावा, म्हणजे भुवयांच्यामधील सुरकुत्या जातील व ते क्षेत्र निष्क्रिय राहील.
◆ सुरुवातीला बैठकीवर प्रावीण्य मिळविणे कठीण असते कारण नकळत शरीर झुकत असते म्हणून मधूनमधून डोळे क्षणभर उघडून शरीर झुकले आहे का व डोके एका किंवा दुसऱ्या बाजूला, वर किंवा खाली झाले आहे का, याचा आढावा घ्यावा.
घशातील
चेहऱ्यावरील,ताण

कानशिलावरील त्वचेवर ताण नसल्याची खात्री करून घ्यावी. शेवटी डोळे स्थिर आहेत की अस्थिर आहेत याची खात्री करावी. नंतर मस्तक, व शरीर यांना योग्य स्थितीत आणावे. घसा सैल ठेवावा व डोळे निष्क्रिय ठेवावेत. तेथील स्नायू ढिले ठेवले म्हणजे त्वचा ढिली पडते.
वरचे ओठ आणि नाकपुङ्या ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये यांच्या कार्यावर ताबा ठेवतात. वरचा ओठाजवळचा भाग सैल करावा. त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू व मेंदू यांना आराम मिळतो. प्राणायामाचा सराव बसून करत असताना कानशिलावरील त्वचा कानाच्या बाजूने सरकली तर मेंदूवर दबाव आहे असे समजावे,
तीच त्वचा डोळ्यांच्या बाजूला सरकली तर मेंदू शांत आहे असे समजावे. खाली जमिनीवर आडवे झाले म्हणजे कानशिलावरील त्वचा कानाच्या बाजूला सरकते, डोळ्यांच्या बाजूला सरकत नाही.
◆ आपण जणू काय डोळे मिटून पाठीमागच्या वस्तुकडे पाहत आहोत अशा प्रकारे आपली नजर अंतर्मुख करावी. म्हणजे दूष्टी अंतर्मुख असली तरी डोळे पूर्ण उघडे आहेत असे वाटेल. श्वास घेताना व सोडताना बुबुळे खालीवर होतात. या हालचाली थांबविण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांच्यामुळे मेंदुचे व्यवहार चालू होतील.
◆डोळ्यांच्या पापण्या सैल असल्या म्हणजे अंधुकपणा येतो. बुबुळे हलावयास लागली म्हणजे लक्ष उड़ते.हवेमुळे एखादी ज्योत फडफडावी तशा वरच्या पापण्या आकुंचन पावल्या की, विचारांचीही फडफड होते. संपूर्ण आराम असला म्हणजे असे प्रकार होतं नाहीत.
◆डोळ्याच्या पापण्यांचे केस जर एकमेकांना भिडले नाहीत तर मेंदू कार्यरत राहतो आणि शिथिल होत नाही. भुवयांवर जर ताण पडला, तर तेथील केस राग आलेल्या माणसाच्या केसांप्रमाणे उभे राहतात. भुवईचे केस जर पडलेले असले, तर मेंदूला विश्रांती मिळते.
४७) आपली कर्णरंध्रे एकमेकांशी समपातळीवर आणि खांद्याच्या वरच्या भागापासून समान अंतरावर ठेवावीत. कानांनी श्वसनाचा आवाज ऐकला पाहिजे आणि प्राणायामाचा सराव चालू असताना त्यांना अगदी हलके वाटले पाहिजे. जबडे घट्ट आवळू नयेत, कारण तसे केल्याने कानाभोवतालची जागा घट्ट होईल आणि कान बंद होतील. कान आतील बाजूने जड होतील व
त्यात खाज सुटेल.
◆डोळे, कान किंवा फुफ्फुसे यांच्यापासून निघणाऱ्या सूक्ष्म चेतनावाहक नाड्या मेंदूच्या मध्यभागी जेथे एकमेकांना ओलांडतात, त्या जागेवर म्हणजे डोळ्यांच्या मध्ये आणि मागे मुख्यत्वेकरून लक्ष द्यावे. या मध्यबिंदूतूनच सर्व चेतनांवर आणि श्वसनावर नियंत्रण होते.

6 thoughts on “In Pranayama Eye आणि Ear Position”