In 15 Days Pranayamaतील मनाची तयारी

In 15 Days Pranayamaतील मनाची तयारी
In 15 Days Pranayamaतील मनाची तयारी

In 15 Days Pranayamaतील मनाची तयारी: १)जीवनवृक्षाची पाळे वरती आणि फांद्या खाली असतात असे म्हटले आहे. मानवी शरीराचेही तसेच आहे. मज्जासंस्थेची पाळे मेंदूत आहेत. झाडाच्या खोडासारखा असणारा मज्जारज्जू हा पाठीच्या कण्यामधून खाली जातो. मज्जातंतू मेंदूपासून निघून मज्जारज्जूमधून खाली उतरतात आणि त्यांच्या शाखा सर्व शरीरभर पसरलेल्या असतात.


)प्राणायाम करतेवेळी बसण्याच्या कलेचे वर्णन मी माझ्या दुसऱ्या ब्लॉग वर केलेले आहे.(इथे क्लिक करा)कृति


3)शुद्ध व अशुद्ध रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू हे सर्व शरीरभर चैतन्य पसरविण्याच्या नाड्या आहेत. आसनाच्या सरावाने शरीर शिक्षित झालेले असते, त्यामुळे या नाड्यातून प्राणाचा प्रवाह मोकळेपणी होण्यास अडथळे येत नाहीत. नाड्या जर मलांनी भरलेल्या असल्या तर चैतन्य सर्व शरीरभर पसरणार नाही. ज्ञानतंतूंची जर गुंतागृंत झाली असेल तर मन स्थिर राहणे शक्यच नसते आणि मनाला स्थेर्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्राणायामाचा सराव करणे शक्य नसते. नाड्या जर त्रस्त झाल्या असतील तर व्यक्तीचा खरा स्वभाव आणि जगताचे सार शोधून काढणे अशक्य आहे.

wp 15945279255867635945419202780839
मज्जातंतू


)आसनांच्या सरावामुळे मज्जातंतूंना बळकटी येते आणि शवासनामुळे त्रस्त मज्जातंतूंना आराम मिळतो. मज्जातंतूच जर कोलमडले तर मनही ढासळते. मज्जातंतूंवर ताण असेल तर तो मनावरही असतो. मन निश्चित, शांत व ग्रहणशील असल्याशिवाय प्राणायामाची सराव करता येत नाही.


)शांततेच्या शोधामध्ये आधुनिक जग ध्यान आणि प्राणायामकला यामध्ये लक्ष घालू लागले आहे. हे दोन्ही विषय प्रथमदर्शनी मोहक वाटतात परंतु कालांतराने कळून चुकते की ते आत्मसात करणे वाटते तेवढे सोपे नाही. एकतर ते कंटाळवाणे व पुन्हा पुन्हा करावे लागणारे आहेत आणि यात प्रगती फारच मंद असते. याच्या उलट आसनांचा सराव हा सर्व प्रकारे आकर्षक व मनोवेधक असतो. कारण आसने करताना बुद्धी शरीराच्या निरनिराळ्या भागांवर केंद्रित होते. यामुळे एक प्रकारचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होते. प्राणायामाच्या सुरुवातीला दोन नाकपुड्या, मस्तकाच्या अस्थतील पोकळ्या (sinuses), उरपोकळी (thorax), पाठीचा कणा व मध्यपटल यांच्यावर लक्ष केंद्रित होते. यात शरीराच्या इतर भागांकडे लक्ष द्यावयास संधी नसते म्हणूनच श्वसनाच्या प्रवाहाचे नियत्रण करण्याला सर्व शरीर आणि मन तयार होईपर्यंत प्राणायाम सर्व तरह्यांनी मनोवेधक होऊ शकत नाही. अभ्यासात फारशी प्रगति न होता महिने किवा वर्षे निघून जातात. तरीही निष्ठेने, थीर न सौडता आणि चिकाटीन प्रयत्न केल्यास साधकाचे मन श्वसनाच्या प्रवाहाला प्रतिसाद देण्यास तयार होते या परिस्थितीत प्राणायामाचे सौदर्य व आनंद यांचा त्याला अनुभव येती आणि वर्षानुवर्षे सराव केल्यानंतर प्राणायामातील बारकावे त्याला समजू लागतात.


)”प्राणायामाच्या सरावाकरिता “अचल कणा आणि स्थिर परंतु सावध मन या गोष्टी अत्यावश्यक आहेत. एक गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे की, जे लोक पाठीचा कणा मागल्या बाजूला फार वाकविण्याचा प्रयत्न करतात त्यांचा कणा लवचिक असतो. परंतु दीर्घकाळापयंत तो स्थिर राहू शकत नाही. जे लोक कणा फार पुढे वाकविण्याचा सराव करतात त्यांचा कणा स्थिर राहतो. परतु मन स्थिर व सावध राहत नाही कारण कणा मागे वाकविण्यामुळे फुफ्फुसे प्रसरण पावतात, तर पुढे वाकविण्यामुळे ती प्रसरण पावत नाहीत, म्हणून साथकाने या दोन्हीमधील सुवर्णमध्य साधून आपला कणा स्थिर राहील व मन सावध व निश्चल राहील ह्या वर लक्ष दिले पाहिजे.


)प्राणायामाचा सराव हा केवळ यांत्रिक स्वरूपाचा असता कामा नये, मेंदू आणि मन यांना सावध ठेवेल पाहिजे. म्हणजे शरीरस्थिती आणि श्वसनाचा प्रवाह वेळोवेळी बरोबर आहे की नाही,याच्यावर लक्ष राहील. प्राणायामाचा सराव बलप्रयोगाद्वारे होता कामा नये. म्हणूनच त्याच्यामद्धे कोठल्याही प्रकारचे काम लादून चालत नाही.मनाने व बुद्धीने त्याचे सम्पूर्ण स्वागत होणे अत्यावश्यक आहे.

)प्राणायामामध्ये चित्त (मन, बुद्धी आणि आत्मा) आणि श्वसन यामधील नाते आई व तिचे मूल यांच्या नात्याप्रमाणे हवे. चित्त आई व प्राण (श्वसन) हे मूल होय. आईचे आपल्या मूलावर जसे अंत:करणापासून प्रेम असते किंवा ती कोणताही स्वार्थ मनात न ठेवता प्रेम करते व काळजी घेते, तशीच चित्ताने प्राणाची प्रेमळपणे काळजी घेतली पाहिजे.

images 6 501112201850437149278
प्राणायामाचा उपयोग सर्वांगा साठी कसा होतो


)श्वसन एखाद्या खळखळणाऱ्या नदीप्रमाणे आहे. नदीला बंधारे घालून त्यातून कालवे काढले म्हणजे त्यापासून भरपूर शक्ती निर्माण होते. प्राणायामामुळे श्वसनाच्या शक्तीवर लगाम टाकून तिच्यापासून जोम व उत्साह कसा निर्माण करावा है साथक शिकतो.


१०) ज्याप्रमाणे सिंह, हत्ती किंवा वाघ यांना शिकविणारा शिक्षक त्यांना सावकाश व टप्प्याटप्याने काबूत आणत असतो त्याप्रमाणे साधकाने आपल्या श्वसनावर हळूहळू नियंत्रण आणले पाहिजे. तसे न केल्यास श्वसन साधकाचा नाश करेल. प्राणायामाच्या योग्य सरावाने सर्व रोग बरे होतात किंवा काबूत येतात. परंतु प्राणायामाचा सराव जर व्यवस्थितपणे करावा नाहीतर,
दमा,खोकला,डोकेदुखी,कानदुखी,डोळेदुखी इत्यादी श्वसनसंस्थेशी निगड़ित रोग उद्भवतात.

११)मनाची स्थिरता आणि श्वसन यांचा समागम झाल्यावर बुद्धी पण स्थिर होते. बुद्धी स्थिर झाली म्हणजे शरीर बळकट होते आणि साधकाला धैर्य येते.


१२) मन हे सर्व इंद्दियांचे स्वामी आहे, तसेच श्वसन हे मनाचे स्वामी आहे. श्वसनाचा आवाज हाच मनाचा स्वामी आहे आणि हा आवाज एकतानतेने चाल ठेवला म्हणजे मज्जासंस्था शांत राहते. नंतर श्वसन सहज चालू राहते आणि साधक चिंतनाला तयार होतो.


१३) योगासने करताना डोळ्यांना व कानांना प्राणायाम करताना मोठे महत्व आहे. लक्षपूर्वक डोळयांचा वापर करून आसने व निरनिराळ्या अंगस्थिती यामध्ये संतुलन राखता येते. या सर्वांवर आपल्या इच्काशक्तीने प्रभुत्व मिळवता येते आणि आपल्या अवयवांवर ताबा मिळविता येतो. प्राणायाम मात्र या पद्धतीने करता येत नाही. प्राणायामाचा सराव करताना डोळे बंद ठेवावे लागतात आणि मनाचे लक्ष अ्वसनाच्या आवाजावर केंद्रित करावे लागते. कान त्यावेळी श्वसनाच्या प्रवाहाची तालबसता आणि त्यातील बारकावे ऐकतात आणि श्वसनाचे नियंत्रण करून तो मंद व सुरळीत चालू आहे याची खात्री करून घेतात.


१४) आसनांमध्ये विविधता आहे कारण आसने करताना अनेक हालचाली व अंगस्थिती यांचा वापर करावा लागतो आणि आसने करताना लक्ष बदलत असते. प्राणायाम किचित कंटाळवाणा आहे. एकतर साधकाला प्राणायाम एकाच आसनस्थितींत करावयाचा असतो. दुसरे म्हणजे सतत श्वसनाचा आवाज त्याला अखंड व निश्चल ठेवावयाचा असतो. संगीत साधना करताना ज्याप्रमाणे प्रथम स्वरज्ञान करून घ्यावे लागते व सरगम शिकावे लागते तसेच प्राणायामाचे आहे.


१५) आसनाच्या सरावामध्ये वाटचाल ज्ञात असलेल्या स्थूल शरीरापासून अज्ञात अशा सूक्ष्म शरीराकडे होत असते. प्राणायामामध्ये मात्र गती आतील अज्ञात अशा सूक्ष्म श्वासाकडून बाहेरील स्थूल शरीराकडे होत असते.


१६) जळणारे लाकूड त्यावर धूर आणि राख जमल्यामुळे झाकले जाते तसे शरीरातील व मनातील दोष साधकाच्या आत्याला झाकून टाकतात. वाऱ्याची झुळूक आल्यावर राख आणि धूर उडून लाकूड प्रज्वलित होते त्याप्रमाणे प्राणायामाच्या अशुद्ध गोष्टींचा नाश होऊन साथकाची ब्रह्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते आणि तो चिंतन करावयास सिद्ध होतो.

श्वसन ज्याप्रमाणे स्थिर किंवा अस्थिर असेल त्याप्रमाणे मन असते आणि त्याप्रमाणेच योगी असतो. म्हणूनच श्वसनावर नियंत्रण ठेवावयास पाहिजे.In 15 Days Pranayamaतील मनाची तयारी

आचार्य बी.के.एस.अय्यंगार

Leave a Comment

%d bloggers like this: