Disease चे आत्मज्ञानात रूपांतरण

          Disease चे आत्मज्ञानात रूपांतरण

Disease चे आत्मज्ञानात रूपांतरण जे काही विद्यमान आहे त्याचा विनाअट आंतरिक स्वीकार करणं म्हणजे समर्पण, असं म्हणताना या क्षणी आपण तुमच्या जीवनाविषयी बोलत आहोत,तुमच्या एकूण जीवनस्थितीविषयी नाही!किंवा जीवनदशेविषयी नाही.व्याधी किंवा आजारपण तुमच्या जीवनदशेचा एक भाग आहे. म्हणजे ज्याला भूतकाळ आहे, तसाच भविष्यकाळही आहे. जोपर्यंत तुम्ही वर्तमानात जागृतपणे उपस्थित राहून तुम्हाला मुक्तता देणारी शक्ती प्राप्त करून घेणार नाही. तोपर्यंत भूत आणि भविष्य याचं निरंतर चक्र चालूच राहतं. तुम्हाला माहीत असाव की, तुमची जीवनदशा निर्माण करण्याच्या तळाशी काहीतरी खोल;पण अत्यावश्यक अस काहीतरी असतं. ते असतं तुमचं जीवन, तुमचं कालातीत वर्तमानातील अस्तित्व.

वर्तमानात समस्या अशा नसतात; त्यामुळ आजारपण, व्याधी उद्भवत नाहीत; कोणीतरी तुमच्या परिस्थितीला एखादं नाव देतं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता म्हणून त्या परिस्थितीत तुम्ही कायम राहता आणि मग तुमचे हे तात्पुरते असंतुलन केवळ एखादे गंभीर आजारपण बनत नाही तर ते टिकून राहते. हेच तुमच्या आजारपणाचं कारण असतं; त्याचं बळ वाढतं. ह्या तात्पुरत्या असंतुलनाचे रूपांतरण गंभीर आजारपणात होतं.

या घटनेवर लक्ष केंद्रित केल्याने मात्र त्याला काही नाव देऊ नका.मानसिकदृष्ट्या लेबल लावू नका. त्यामुळं शारीरिक दुखणं, अशक्तपणा, बेचैनी किंवा विकलांगता अशा साऱ्या व्याधींचं क्षेत्र संकुचित होतं. याचाच अर्थ तुम्ही वर्तमान स्वीकारता, समर्पण करता. व्याधीच्या कल्पनेला समर्पण करत नाही!तुमच्या यातनांमुळे तुम्ही वर्तमानात यावे, वर्तमानातील उपस्थितीच्या अगदी तीव्र स्थितित यावे. याचा वापर आत्मबोधासाठी करून घ्या.

Disease चे आत्मज्ञानात रूपांतरण
Disease चे आत्मज्ञानात रूपांतरण

समर्पणातून जे आहे ते वास्तव बदलत नसतं, निदान त्यात प्रत्यक्ष बदल होत नसतो. समर्पण तुमच्यात मात्र बदल घडवीत असतो आणि तुम्ही बदललात तर तुमच्या सभोवतालचं सगळं जग बदलतं. कारण सभोवतालचं जग तुमच्या मानसिकतेचं केवळ प्रतिबिंब असतं.आजारपण किंवा व्याधी ही समस्या नसते. तुम्ही स्वतः समस्या असता.तुम्ही तुमच्या अहंकारी मनाचे गुलाम असता. ते तोपर्यंत तुम्हीच समस्या राहता.

तुम्ही जेव्हा आजारी असता किंवा असमर्थ असता तेव्हा असं वाटून घेऊ नका की, आपण नापास झालो, अयशस्वी झालो. तसेच अपराधी भाव मनात येऊ देऊ नका. तुमच्याबरोबर कोणी गैरवर्तन
केलं किंवा तुमचा अपमान केला तर आपल्या जीवनाला दोष देऊ नका, स्वत:लाही दोष देऊ नका. कारण असं वागणं म्हणजे प्रतिरोधच असतो.

तुम्ही खरोखरच गंभीर आजारी असाल तर त्या स्थितीचा उपयोग आत्मज्ञान- प्राप्तीसाठी करा. तुमच्या आयुष्यात काही वाईट घडलं
तर आत्मज्ञानासाठी त्या स्थितीचा उपयोग करा.

आजारी स्थितीतून चित्त काढून घ्या. त्या स्थितीला भूत किंवा भविष्य जोडू नका. वर्तमान क्षणात गहनपणे जागृत- उपस्थित राहण्यासाठी
याचा उपयोग करा,

मग पाहा, काय घडतंय ते ? किमयागार बना.मूळ धातूचं सोन्यात रूपांतर करा. पीडेचं आणि दुःखाचं चेतनेत रूपांतर करा. विनाशाचं आत्मज्ञानात रूपांतर करा.

तुम्ही खरंच गंभीर आजारी आहात काय ? आणि आता मी जे सांगतो त्याबद्दल तुम्ही रागावले आहात काय? असं असेल तर हे स्पष्ट असू द्या की,तुमचा आजार तुमच्या आत्मप्रतीतीचा भाग बनला असून, तुम्ही आपली ओळख आणि आपला आजार दोन्ही वाचवण्याचा प्रयत्न करीत आहात.

तुम्ही ज्या स्थितीला आजारपण म्हटलं आहे, त्याला ‘वास्तविक तुम्ही कोन आहात ?’ याच्याशी काही देणं-घेणं नाही. जेंव्हा एखादं गंभीर आजरपंण अक्षमता, कुटुंब परिवार सामाजिक प्रतिष्टिची हानी, घनिष्ठ संबंधांत दुरावा प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनं झालेलं दुःख किंवा स्वतः च्या मृत्यूच भये तुमच्या मनावर परिणाम करीत असतं, त्या वेळी त्याची दुसरिहि बाजू असते हे लक्षात घ्या. तुम्ही महानतम, अवर्णनीय अश्या स्थिति पासून एकच पाऊल दूर असता.मूलभूत   दुःख याचे रासायनिक रूपांतरण करुण त्याला परमानंदात बदलणं यापासून फारच कमी अंतरावर असता. या एका पावलाच्या अंतरावर जे असतं ते असतं समर्पण.तुम्ही अशी प्रतिकूल स्थितीतही आनंद आणि प्रसन्नता मिळवाल असं मला म्हणायचं नाही तस होणारही नाही;

परंतु तुमचं दुःख आणि वेदना तुमच्या गहन अंतरातून उगवणाच्या आंतरिक शांतीत बदलेल, स्थिरतेत बदलेल.”ईश्वरी शांती” म्हणतात आणि ती सगळ्या ज्ञानाच्या पलीकडील असते.त्याच्या तुलनेत आनंद आणि प्रसन्नता या फार उथळ बाबी असतात. या तेजस्वी शांतीबरोबरच एक जाणीव येते.ही जाणीव मनाच्या पातळीपासून आलेली नसते तर
अस्तित्वाच्या गहनतेतून आलेली असते. ती अशी असते की, तुम्ही अमर आहात. अविनाशी आहात. हा काही केवळ कोरडा विश्वास नाही. ही पूर्ण निश्चितता आहे आणि याला बाह्य व दुय्यम पुराव्याची गरज नाही.

यातनेच रूपांतरण शांतीत

काही अति टोकाच्या स्थितीत वर्तमानाचा स्वीकार करणं तुम्हाला अशक्य असेल; पण समर्पणाच्या स्थितीत तुम्हाला आणखी संधी मिळू शकते.

पहिली संधी म्हणजे समर्पण. प्रत्येक वेळी त्या क्षणालाअसलेल्या वास्तवाचा स्वीकार करणं, समर्पण करणं. जे आहे ते नाहीसं करता येत नाही; कारण ते आधीच अस्तित्वात आहे. म्हणून जे आहे ते मान्य करा किंवा जे नाही ते आहे तसं स्वीकारा.

मग,
तुम्हाला जे करायचं ते करा, परिस्थितीत जे करणं आवश्यक असतं ते करा.
अशा स्वीकार स्थितीत तुम्ही टिकून राहिलात तर नकारात्मकता निर्माण होणार नाही, अधिक पीडा होणार नाही, अधिक असमाधान येणार नाही. मग तुम्ही अप्रतिरोधाच्या स्थितीत राहता.हलक्याफुलक्या, तणावरहित स्थितीत राहता, संघर्षमुक्त राहता.

तुम्ही असं करू शकला नाहीत, तुम्ही त्याची संधी गमावली असेल सबयीमळं आणि अचेतन प्रतिरोधात्मक वृत्ती उफाळून आल्यामुळे, तुम्हाला अशी स्थिती असहय असल्यामुळं कोणत्या ना कोणत्या रूपानं दुःख आणि वेदना तुम्ही निर्माण करता. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की, ही सगळी कष्टप्रद स्थिती परिस्थितीनं निर्माण केली आहे; पण वास्तव तसं नसतं. पीडा आणि दुःखाला परिस्थिती जबाबदार नसते. तुम्ही जो प्रतिरोध करीत असता,त्याचा स्वीकार आणि समर्पण करण्याऐवजी प्रतिकार करू लागता तो प्रतिरोध.प्रतिकार हे खरं कारण असते. म्हणजे आपल्या दुःखाला आपणच जबाबदार असतो.

तरीपण आता समर्पणाची तुम्हाला दुसरी संधी उपलब्ध होत असते.

बाहेर जे काही घडतं त्याचा तुम्ही स्वीकार करू शकत नसाल तर तुमच्या आत जे आहे त्याचा स्वीकार करा. बाह्य परिस्थिती स्वीकारणे जमत नसेल तर आंतरिक स्थिती आहे तशी स्वीकारा

.याचा अर्थ : दुःख आणि पीडेचा विरोध करू नका. त्याला आहे तसं राहू द्या. पीडा आणि दुःख ज्या स्वरूपात असेल त्याला समर्पण करा. काही आपत्ती, संकट असेल, नैराश्य असेल, भीती वाटत असेल, एकटेपण सतावत असेल तर त्या स्थितीचा स्वीकार करा.त्यावर कुठल्याही नावाचा ठप्पा लावू नका.

केवळ त्याचे साक्षीदार बना, पाहत राहा सगळं साक्षीभावानं, कवटाळा त्या स्थितीला.आणि मग पाहा समर्पणाचा चमत्कार, अगदी तीव्र वेदनादेखील गहन शांतीत रूपांतरित होते याचा अनुभव तुम्हाला येईल. अस करणं म्हणजे तुम्ही सुळावर चढण्यासारखं असतं. बनवा त्याला स्वर्गारोहणाचा मार्ग. करा प्राप्त त्यातून पुनरुज्जीवन.

एक क्षण, समर्पण वरगैरे विसरून जा. कारण दुःख आणि यातना खूप तीव्र असताना समर्पणाची भाषा निरर्थक वाटू लागते. अशा गहन दुःखातून बाहर पडण्याची तुमची तीव्र इच्छा असते. तुम्ही ज्या कष्टमय अनुभवातून जाता त्याची जाणीवदेखील नकोशी वाटते. यापेक्षा जास्त सामान्य स्थिती कोणती असणार?पण त्यातून पळून जाण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नसतो हेच खरे. यातून पळून जाण्याचे फसवे मार्ग असू शकतात.

जीव तोडून एखाद्या कामात स्वतःला रमवण, मद्यपान करणं, मादक पदार्थांचं सेवन करणं,क्रोधात जळत राहणं, दमन करणं, सहन करण्याचा निग्रह करण इत्यादी मार्ग असू शकतात; पण त्यामुळे काही तुमची दुःखातून मुक्तता होत नसते. त्याविषयी असावध आणि अचेतनगहन काही दुःखाची तीव्रता कमी होत नसते.

तिकडं दुर्लक्ष करणं हा उपाय होत नसतो. तुम्ही दुःखाचा स्वीकार नाकारला तर त्याचा परिणाम तुम्ही जे काही करता त्यावर होतो, तुमच्या
नातेसंबंधांवर होतो.,

हे सगळं प्रदूषित होतं. तुम्ही हे
सगळे वाणीद्वारे इतरांशी बोलता तेव्हा त्यातून प्रदूषण पसरतं. तेव्हा आपल्या मनावर आणि वाणीवर आपले नियत्रण असावे लागते!

Leave a Comment

%d bloggers like this: