Bhujangasana for Back Pain 100% Relief १) पार्श्वभूमी : भुजंग म्हणजे नाग. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीरांची आकृति फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते.

२) पूर्वस्थिती : सम पालथी अवस्था किंवा पोटावर झोपून हात खांद्यांना समांतर समोर डोक्याच्या वरच्या दिशेने पसरावेत,
आसन कसे करावे :
Bhujangasana for Back Pain 100% Relief 1 दोन तळहात जमिनीवर टेकवून कोपर आकाशाकडे करून दोन्ही तळहात बाजूस छातीजवळ ठेवावेत. हाताची बोटे एकमेकांना चिकटलेली असावीत.
2 कपाळ जमिनीवर टेकावे.
3 श्वास घेत पुढे हात, छाती, मान व डोके वर उचलून हात कोपरात सरळ करीत वर यावे.
4 श्वास सोडून समोर पहावे व खांद्यातून कोपरात व कोपरातून मनगटात सर्व शरीराचा भार सोडावा.
5 सावकाश मान आणखी वर उचलत छताच्या एखाद्या बिंदूवर नजर एकाग्र करावी व नंतर नजर मागे मागे वळवीत मान मागे पाठीवर ढिली सोडण्याचा प्रयत्न करावा.
6 श्वास, उच्छ्वास सावकाश सुरू ठेवावा. मानेच्या मणक्यांपासून ते माकडहाडापर्यंत सुखपूर्वक चाललेल्या श्वासाकडे साक्षीभावाने पहावे.Bhujangasana for Back Pain 100% Relief

आदर्श आसन स्थिती:
१.अंतिम आसन स्थितीत कंबर जमिनीवर असते.
२. हात कोपरात सरळ असतात.
३. मान मागे ढिली सोडलेली असते.
श्वास उच्छ्वास संथपणे सुरू असतो.
५. पायांची नखे जमिनीला लागलेली असतात.
आसन कसे सोडावे?
१. श्वास घ्यावा व श्वास सोडत सावकाश छाती, मान व डोके खाली
आणून कपाळ जमिनीवर टेकावे.
२. हात शरीराजवळ घ्यावेत.
३. हनुवटी जमिनीवर टेकावी.
संभाव्य चुका:
१. शरीराचा भार हातांवर घेतला जातो.
२. मागे पायांची बोटे टेकून टाचा वर छताकडे गेलेल्या असतात.
३. कंबर वर उचलली जाते.
४. मागे पाय ताठ केले जातात. ढिले सोडणे आवश्यक असते.
५) किती वेळ आसनात थांबावे? :
१० सेकंदापासून सुरुवात करावी व
सरावाने १ मिनिटापर्यंत वेळ वाढवता येते