Bhramri pranayama

Bhramri pranayama सागराचा गंभीर आवाज अंधाऱ्या रात्रि रातकिड्यांचा आवाज,संथ चालीतील नूपुर झंकार,पहाटे दुरुन येणारा मंद घंटानाद,गर्द रानात घातलेली शीळ, एकांतातील ऐकू येणारी झण्याची मुळभूळ, वारा सुटल्यावर बांबूच्या बनात निर्माण होणारा ध्वनी, पुरून येणारा टाळ मृदंगाचा आवाज, पहाटेच्या शांत वेळी खेडयातुन ऐकू येणारी जात्याची घरघर, मंदपणे चालताना येणारा बैलांच्या गळयातील घंटांचा नाद, मंगलप्रभाती एखाद्या तम्बोऱ्यासारख्या तंतुवाद्याचा
आवाज, मध्याह्नी आम्बराईतून येणारा कोकिळेचा पंचमध्वनी, इत्यादी आवाज मानवी मनाला व कानांना एक अपूर्व सुखसंवेदना प्राप्त करून देतात.Bhramri pranayama

अनेक ध्वनीकंपनामुळे किंवा मधुर नादामुळे चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. ती प्रसन्नता अनेक वेळा समाधीसुखाच्या प्रतीची असू शकते.

नादाच्या या सामर्थ्यामुळे नावाला अनेक वेळा ” नादब्रह्म ” असे संबोधिले जाते. या नादब्रह्मामुळे गाणाऱ्यास व ऐकणाऱ्यास गानसमाधीही लागू शकते. इतके नादाचे महत्त्व अध्यात्मशास्त्रात मानले आहे.

शांभवीमुद्रा, षण्मुखीमुद्रा, उज्जायी प्राणायाम,भ्रामरी प्राणायाम इत्यादीत याच नावाचा-कंपनाचा उपयोग चित्त-प्रसादनाकरिता करून घेतला आहे.याला ” लययोग ” असे म्हणतात. हठयोगात याला ” नादानुसंधान” असे म्हटले आहे. चित्तवृत्तींचा निरोध करण्याकरिता नादानुसंधानाचा अभ्यास केला जातो.Bhramri pranayama सागराचा गंभीर आवाज अंधाऱ्या रात्रि रातकिड्यांचा आवाज,संथ चालीतील नूपुर झंकार,पहाटे दुरुन येणारा मंद घंटानाद,गर्द रानात घातलेली शीळ, एकांतातील ऐकू येणारी झण्याची मुळभूळ, वारा सुटल्यावर बांबूच्या बनात निर्माण होणारा ध्वनी, पुरून येणारा टाळ मृदंगाचा आवाज,

त्यात प्रारंभावस्था, घटावस्था, परिचयावस्था व निष्पत्तीअवस्था अशा क्रमाने साधकाची प्रगती होत जाते असे म्हटले आहे. या अवस्थांमध्ये निरनिराळे अनाहत नाद (घर्षणाशिवाय उत्पन्न होणारे नाद) साधकाच्या अनुभवास येतात असे म्हटले आहे. यावरून कंपन वा नाद याला हठयोगात किती उच्च स्थान दिले आहे याची कल्पना येईल.

भ्रामरी प्राणायामात पूरक व रेचक करताना क्रमाने नरभ्रमर व मादी भ्रमर यांच्याप्रमाणे मंद पण गुंगवणारा आनंददायी नाद निर्माण केला जातो. या कंपनयुक्त नादाने शरीर, मन व चित्त प्रफुल्लित होतात व पूर्ण व्यक्तिमत्व एका अननुभूत आनंदाने व्याप्त होते.

असा हा प्राणायाम या आधुनिक तणावपूर्ण युगात तणाव मुक्तीची गुरुकिल्ली म्हणून सिद्ध झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

तंत्र :

पूर्वस्थिती : कोणत्याही आधारासनात बसा. मूलबंध लावा.

mulbandh

कृती: पूरक :

मृदू टाळा (सॉफ्ट पॅलेट) अधिकाधिक घशाच्या निकट आणा व पूरक करण्यास प्रारंभ करा. ” रंग”, ” दंग” या शब्दांतील अनुस्वारांच्या उच्चाराप्रमाणे आवाज निघेल. प्रारंभी हा आवाज अनियमित, खरखरीत व खड-बडीत निघेल. पण अभ्यासाने हा आवाज स्पष्ट, कंपनयुक्त व मधुर निघेल.

तो एखाद्या तंतुवाद्याच्या आवाजाप्रमाणे गोड व आकर्षक वाटू लागतो. पूरक पूर्ण करा.

कुंभक :

जालंधरबंध लावून कुंभक करा. उड्डियानबंध लावा. यथाशक्ती कुंभक करा.

NECK LOCK FOR WEB
जालंधरबंध
bandh 1
बंध

रेचक :

रेचकाचा काळ पूरकाच्या दुप्पट असतो. त्यामुळे तितकीच हवा कमी प्रमाणात बाहेर अधिक वेळात सोडावी लागते. त्यामुळे या रेचकात निर्माण होणाऱ्या
आवाजतरंगाची प्रत निराळी असते.

त्यातील स्वरोत्संग (पिच), मोठेपणा(लाउडनेस), आकारमान (व्हॉल्यूम), कंपन (व्हायब्रेशन्स) व स्वरविशेषता(टिंबर) हे गुण विरळ होतात व हा नाद मादी-भ्रमरासारखा अधिक सूक्ष्म पण मनोहर वाटतो.

जालंधरबंध सोडा. मृदू टाळा घशाच्या निकट आणा. छातीच्या स्नायूंचे सावकाश प्रसरण करा. म्हणजे छातीचे आकुंचन सावकाश होईल व ओंकारातील ‘म्’ सारखा पण ‘न् ‘ मिश्रित आवाज काढा. भ्रमराच्या आवाजाची नक्कल करा, रेचक पूर्ण होईपर्यंत तो आवाज घुमू द्या.

रेचक झाल्यावर परत पूरक-कुंभक-रेचक अशी साखळी इच्छित संख्येपर्यंत
चालू ठेवा.

सूचना :

१. प्रारंभी केवळ रेचकाचा अभ्यास करावा. पूरक साधा व आवाज-रहित आणि रेचक आवाजासहित अशा अभ्यासाने आत्मविश्वास वाढतो व रेचका-
तील आवाज काढण्याची कृती सोपी होते.

२. पूरकात प्रारंभी आवाज काढताना घशाचा क्षोभ होतो व खोकला येतो.अशा वेळी अभ्यास बंद करावा.

३. भ्रमरासारखा आवाज काढण्याचा सराव आधी करावा. प्रारंभी हा सराव.एकदा पूरकात आवाज व एकदा रेचकात आवाज असा निरनिराळा अभ्यास करावा.मग केवळ पूरक व रेचक आवाजासह करावे व त्यानंतर प्रभुत्व आल्यावरच प्रमाण-बद्ध पूरक, कुंभक व रेचक अभ्यासावेत.

४. घशात वा नाकात सूज असेल किंवा बेदना असतील तर भ्रामरी करू नये.

५. शांत वेळी मध्यरात्री भ्रामरीचा आनंद अवर्णनीय असतो.

६. घेरंडसंहितेत मध्यरात्री नीरव स्थानी कानात बोटे घालून पूरक, रेचक व कुंभक करावे म्हणजे अनेकविध नादांचा अनुभव येतो व मनाचा विलय होतो असे म्हटले आहे.

लाभ:

१. भ्रामरीतील नाद, कंपने व मधुरता यांमुळे सर्व मनोकायिक यंत्रणा रोमांचित होते. म्हणूनच भ्रामरीला ” चिदानंदकारी” असे म्हटले आहे.

२. मनातील ताण-तणावांचा क्षय होतो व त्याचा परिणाम म्हणून सर्व शरीर शिथिल होते. गाढ झोपेची ही गुरुकिल्ली आहे.

३. सर्व शारीरिक संस्था अधिक कृतिशील होतात.

४. मन एकचित्त होते. मनाच्या किरकोळ क्रियात्मक विकृती (फंक्शनल डिफेक्ट्स्)दूर होतात.

५. विश्रांती, मनःशांती व मनःस्थैर्य यांकरिता उत्तम उपाय म्हणजे हा प्राणायाम
होय.Bhramri pranayama

Leave a Comment

%d bloggers like this: