Bhramari प्राणायाम

तंत्र

Bhramari प्राणायाम: पाठीचा कणा ताठ व सरळ ठेऊन व हात मांड्यांवर ठेऊन बसा. मनाला सूचना देऊन शरीराला जाणीवपूर्वक विश्रांत करा. चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य ठेवा

wp 15949670383274116135020278065380
बैठक


◆ओठ मिटलेले आहेत, याची खात्री करा. दंतपंक्ती परस्परांपासून विभक्त असू द्या जिव्हा खालच्या दतपक्तीच्या मागे विश्रांत करून ठेवा. कोणाला वाटल्यास जीभेचे टोक तोंडात शिरोभागी हलकासा स्पर्श करूनही ठेवता येऊ शकेल. यास खेचरी मुद्रा म्हणतात.


◆खोलवर श्वास घ्या व संथपने उच्छ्वास सोडतांना खालच्या पट्टीतला हंकाराचा (नननन….) आवाज काढा जो भ्रामरीच्या आवाजाशी मिळताजुळता असतो.हुकाराची हा आवाज डोक्यात व मुखातल्या वरच्या-मागच्या बाजूस (सॉफ्ट पॅलेट) जाणून घ्या.


◆विनासायास होणाऱ्या श्वसनवीरामासाठी म्हणजेच केवल कुंभकासाठी मन सिद्ध करा. सरावानंतर श्वसनातील या विरामाचा कालावधी वाढत जातो. ते प्रगतीचे लक्षण होय.


◆ त्यानंतरच्या केवल कुंभकादरम्यान, जेव्हा हुंकारध्वनी थांबतो तेव्हा संपूर्ण शरीरात कंपने घुमत राहतात.अश्या कुंभकादरम्यान साधकाला जो आनंद प्राप्त होतो तो अमर्याद व अवर्णनीय असतो.


श्वासास उत्स्फूर्तपणे प्रारंभ होऊ द्या. खोलवर श्वास घ्या व उपरोक्त अभ्यासाची पुनरावृत्ती करा.


◆ शांतपणे बसा व ‘जगात सर्व काही सुरळीत चालू आहे’ या भावनेचा आस्वाद घ्या.


◆प्रारंभीच्या काळात, भ्रामरीची पाच- दहा आवर्तने पुरेशी असतात. नंतर सावकाशपणे भ्रामरीचा अभ्यास पाच ते दहा मिनिटांपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

कंपने व अनुनाद – गुणगुणण्याचा गाभा

Bhramari प्राणायाम
भ्रामरी

भ्रामरी प्राणायाम :पाठीचा कणा ताठ व सरळ ठेऊन व हात मांड्यांवर ठेऊन बसा. मनाला सूचना देऊन शरीराला जाणीवपूर्वक विश्रांत करा. चेहऱ्यावर सुंदर स्मितहास्य ठेवा जेव्हा दोन स्त्रोतांमधून बाहेर पडणाऱ्या कंपनांची कंप्रता म्हणजेच कंपनाची वारंवारिता जुळते त्यावेळी मोठ्या विपुलतेने लहरी निर्माण होतात व या लहरी सर्वत्र दुमदुमण्यासारखी अद्भूत गोष्ट घडून येते,त्यालाच अनुनाद म्हणतात. एखाद्या तारवाद्यास सुरात लावले जाते त्यावेळी ध्वनीलहरी दुमदुमतात. जर ते वाद्य योग्यरितीने सुरात लावले गेले तर सुंदर ध्वनी त्या वादयात दुमदुमत राहतो. याचप्रकार, भ्रामरीचा अभ्यास करतांना बारकाईने सुर लावणे आवश्यक असते. पाच वेळा हुंकारध्वनी निर्माण करावा. प्रत्येक हुंकाराची पट्टी भिन्न असावी. कोणत्या पट्टीतील हुंकार शरीरात व विशेषत: डोक्यात अधिकतेने दुमदुमतो याचे लक्षपूर्वक निरिक्षण करावे. जेव्हा शरीराची नैसर्गिक कंप्रता व हुंकारध्वनीची कंप्रता जुळून येते तेव्हा ही कपने साऱ्या शरीरात जाणवतात. अनेक लोक हुंकारध्वनी लाबवितात व त्या नादात अनुनाद अनुभवू शकत नाहीत. अनुनाद तर भ्रामरीचा सर्वात महत्वाल्या भाग आहे.या अनुनादाचा, दुमदुमण्याचा जो सुखावणारा व गुंगी आणणारा परिणाम असतो तो शरीर व मनाला मधूर एकतानतेत विसर्जित करतो.

ध्वनि कंपने व स्वास्थ्य

images 138777466503986454426.
ध्वनि कंपने

संगीत व ध्वनी यांचा व्याधीमुक्तीच्या कार्यावर अनुकूल परिणाम होऊ शकती,हे प्रयोगाअंती निश्चितपणे सिद्ध झाले आहे. असे आढळून आले आहे, की गुणगुाधा।लाळेतील टी’ पेशींची (प्रतिकारसंस्थेतील मुख्य पेशी) निर्मिती अधिकतेने होटे.हे तणावाचा सामना अधिक चांगल्यारितीने करू शकणाऱ्या सुटृढ प्रतिकार संस्थेचे निदर्शक होय.

त्सूनोडासारख्या वैद्यांनी १९८५ मधे असे दाखबून दिले, की काही विशिष्ट ध्वनि मेंदूच्या डाव्या किंवा उजव्या अर्धगोलाकडे आडवे पसरतात. भ्रामरी व योगाीतील गुणगुणण्याच्या तंत्रामुळे ‘ध्वनी औषधी चे तंत्र आपल्या कक्षेत आणले गेलेले आहे.त्यामुळे लोक आता मोठ्या संख्येने या तंत्राचा अभ्यास करू लागले आहेत.तथापि,या अभ्यासाचे सूक्ष्म परिणाम केवळ

व्यक्तिगत पातळीवरच अनुभवता येतात.हे तंत्र शरीरावर कसा परिणाम करते, याचा अभ्यास करतांना शास्त्रज्ञांनी है गहित धरले, की गुणगुणतांना जिभेचे टोक व तिचा रुंद भाग टाळूच्या म्हणजे तोंडाच्या वरच्या भागाशी जोडले जातात. हा संपर्क अतिशय हळूवारपणे व विशेष रितीने होत असतो. टाळूच्या कडक भागात ध्वनी व कंपनांविषयी संवेदनशील असणारी काही ठिकाणे असतात. ही ठिकाणे त्यांना जिव्हेने स्पर्श करताच उत्तेजित होत असतात ज्याप्रकारे आपली बोटे पियानोच्या पट्ट्यांवरून फिरतात त्याप्रमाणे या संवेदनशील केंद्राचे क्रमाक्रमाने व वारंवार उत्तेजन झाल्यामुळे थॅलॅमस व हायपोर्थॅलॅमस यांच्याद्वारे मेंदूमधील केंद्रावर परिणाम होतो. शारीरिकदृष्ट्या हायपोर्थलॅमस टाळूच्या हाडाच्या फार जवळ स्थित असतो.

Bhramari प्राणायाम गुणगुनताना आवाज जेव्हा घुमतो त्यावेळी टाळूच्या संवेदनशील केंद्राद्वारे तो प्रक्षेपित केला जातो.त्यामुळे हायपोरथलॅमसच्या स्थानीय चयापचयावर परिणाम होतो. भिन्न आवाज हायपोरथलमसच्या भिन्न प्रदेशांवर परिणाम करतात.  हायपोर्थेलंमल म्हणजे शरीर व मन एकत्र भेटण्याचे ठिकाणच जणू. हायपोरथॅलॅमसमधे सामजस्य,एकतानता आणली गेल्यावर संपूर्ण शरीर -मन संरचनेस त्याचा लाभ हाता.Bhramari प्राणायाम

1 thought on “Bhramari प्राणायाम”

Leave a Comment

%d bloggers like this: