Bhastrika Pranayam 100 टक्के

Bhastrika Pranayam 100 टक्के भस्रिका म्हणजे लोहाराचा भाता.भस्रिका प्राणायामातील पहिल्याभागात पोटाच्या वेगवान हालचालीने पूरक व रेचक वेगाने,आवाजासहित व एका-मागून एका करावे लागतात.ते लोहाराच्या भात्यातून निधणाऱ्या हवेप्रमाणे भासतात. म्हणून या प्राणायामास ” भस्त्रिका “असे नाव पडले आहे.Bhastrika Pranayam 100 टक्के

शरीरविज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास भस्त्रिकेच्या पहिल्या भागात उदरश्वसनाचा उपयोग केलेला दिसतो व दुसऱ्या भागात इतर प्राणायामाप्रमाणे नियंत्रित चेस्ट ब्रीदिंग पूरक, कुंभक व रेचक या क्रिया केल्या जातात.

भस्त्रिका प्राणायामातील या पहिल्या भागामुळे शुद्धीक्रिया व कपालभाती यांचे बहुतांश लाभ
साधकाला प्राप्त होतात.त्याशिवाय जलद, लघु व सक्रिय श्वास-उच्छ्वासामुळे शरीराची प्राणवायूची गरज पूर्णपणे भागून प्राणवायूचे शरीरातील राखीव बळ वाढते.

त्यामुळे दुसर्या भागात पूरकानंतर येणारा कुंभक विनाश्रमाने, नियंत्रित व दीर्घ होतो.

भस्रिकेच्या दीर्घ अभ्यासाने साधकाची कुंभक राखण्याची क्षमता वाढते.या क्षमतेमुळे इतर प्राणायाम सहजसिद्ध होतात.म्हणजे श्वसनमार्गाची शुद्धी,उदरश्वसन व वक्षश्वसन यांची उन्नती व संतुलन क्रिया आणि प्राणायाम यांचे एकाच वेळी लाभ व इतर प्राणायामांची सहजसिद्धी, इत्यादी अनेक गोष्टींची प्राप्ती केवळ एका भक्तिका प्राणायामाच्या अभ्यासाने साधकाला प्राप्त होते;

म्हणून भस्तिका प्राणायामाला योगाभ्यासात उच्च स्थान मिळाले आहे.

Bhastrika Pranayam 100 टक्के
Photo by VisionPic .nBhastrika Pranayam 100 टक्के et on Pexels.com

तंत्र :

पूर्वस्थितीपद्मासनात बसा. तळहातांनी गुडघे घट्ट पकडा.मूलबंध लावा.भस्त्रकेच्या तंत्राचे  दोन भाग आहेत.ते पुढील प्रमाणे

कृती

पहिला भाग :

Bhastrika Pranayam 100 टक्के मूलबंध तसाच ठेवून कपालभातीप्रमाणे छाती फूगवून तशीच ती स्थिर करा.फुगलेली छाती व आकुंचित ओटीपोट या स्थितीत पोटास कटका घेऊन
झटकन उच्छ्वास करा व लगेच तितक्याच झटक्याने पोट पूर्वस्थितीस नेऊन झटकन श्वास घ्या.अशी वेगवान वर्तुळे एकामागून एक, मध्ये न थांबता, करा.Bhastrika Pranayam 100 टक्के

हा श्वासोच्छ्-वास घर्षणयुक्त आवाजासहित होईल. श्वासोच्छ्वास उथळ पण तालबद्ध होईल.ही
वर्तुळे अधिकाधिक वेगाने करा.

अशी वेगवान श्वासोच्छ्वासांची वर्तुळे दमेपर्यन्त करा व शेवटी पूर्ण रेचक करून सावकाश पूर्ण पूरक करा. या ठिकाणावरून भस्त्रिकेचा दुसरा भाग सुरू होतो.

दुसरा भाग

पूर्ण रेचकानंतर किचित सावकाश ८ ते १० सेकंदात पुरक करा,त्यावेळी श्वसनमार्ग मोकळा ठेवा.पुरक पूर्ण झाल्यावर कुभक सुरु करा,प्रथम जालंधरबंध लावून हवेचा कंठातील मार्ग बंद करा.ओटीपोट आत खेचा व खेचलेल्या स्तिथित तसेच ठेवा.सहज कुंभक करा,मग रेचक करा.जालरबन्ध सोडून मस्तक वर घ्या.उजव्या अंगठयाने उजवी नाकपुडी बंद करा व डाव्या नाकपुडीने सावकाश रेचक करा. सहजतेने, जितका लांबविता येईल तेवढा लांबवा.या  रेचका बरोबरच भस्त्रिकेचे एक आवर्तन संपते.

सूचना :

◆कपालभाती व अनुलोम-विलोम याच्या तंत्रांचा चांगला अभ्यास केल्यानंतर भस्त्रिका प्राणायाम अभ्यासावा.
◆इच्छा व क्षमता असल्यास रेचकानंतर “सहजशून्य कुंभक” करावा.
◆रेचक दोन्ही नाकपुडयांनी केला तरी हरकत नाही. ◆वरील प्रकाराप्रमाणे,भस्त्रिका करण्याचे अनेक प्रकार आहेत.
◆ भस्त्रिका पहिल्या भागतील रेचक (उच्छ्वास) व पूरक (श्वास) सर्व प्रकारांत वेगवान, उथळ व केवळ ऊध्व उदराच्या झटक्याने करतात.
◆काही परंपरांत कंठाचा अंशतः संकोच करून पहिल्या भागातील झटक्याच्या वेळी आवाज काढला जातो.

अभ्यास :

पहिल्या भागात २० वेगवान झटके घेऊन सहज कुंभकाचा दुसरा भाग पूर्ण करावा व अशी तीन आवर्तने करावी.

कपालभाती व उज्जायी प्राणायामा सहित
भस्त्रिका करताना ३ आवर्तने पूरेशी आहेत. पण केवळ भस्त्रिका प्राणायाम करावयाचा असल्यास वरील पद्धतीने १८ ते ३६ आवर्तने करावीत.

दृष्टी व मन :

पहिल्या भागात पोटाच्या हालचालीवर, दुसऱ्या भागात पूरक-रेचकांवर व कुंभकात ओटीपोटावर लक्ष ठेवावे,डोळे बंद करावे.

प्रकार दुसरा

पहिल्या भागातील झटके घेताना अंशतः कंठसंकोच करा.रेचक-पूरकांच्या वेळी आवाज निर्माण करा. दूसऱ्या भागात उजव्या नाकपुदडीने पूरक व डावीने रेचक करा.बाकीचे तंत्र वरीलप्रमाणेच.

प्रकार तिसरा

पाहिल्या भागात १,३, ५, ७ या विषम झटक्याच्या वेळी उजव्या नाकपुडीने पूरक व रेचक करा.श्वासमार्ग मोकळा ठेवा व २, ४, ६, ८ या सम झटक्यांच्या वेळी काव्या नाकपुडीने रेचक-पूरक करा, दुसऱ्या भागात श्वसनमार्ग खुला ठेवा व अनुक्रमे १, ३, ५, ७ आदी विषम आवर्तनात उजव्या नाकपुडीने पूरक, मग कुंभक व शेवटी डाव्या नाकपुडीने रेचक करा. अनुक्रमे २, ४, ६, ८ आदी सहा आवर्तनात डावीने पूरक, मग कुंभक व उजवीने रेचक करा.

प्रकार चौथा

पहिल्या भागात उजवीने झटकन पूरक व डावीने रेचक असे दमेपर्यंत करा.नंतर दुस-्या भागात उजव्या नाकपूडीने पूरक, मंग अध्यंतर कुंभक व डाव्या नाकपुडीने रेचक करा. असे एक आवर्तन पूर्ण करा.

अशी आवर्तने अनुक्रमे १, ३,५. ७ आदी विषम वेळा करा. तसेच अनुक्रमे २, ४, ६, ८आदी समआवर्तनांत खालील-प्रमाणे भस्त्रिका करा. पहिल्या भागात डावीने पूरक व उजवीने रेचक झटक्याने करा. दुसर्या भागात डावीने पूरक, मग यथाशास्त्र कुंभक व शेवटी उजवीने रेचक करा.

सूचना :

१. कपालभाती व उज्जायी यांतील सूचना घ्यानात ठेऊन भस्त्रिका करावी.

. भस्त्रिका प्राणायामाच्या अनेक पद्धती अनेक परंपरांत प्रचलीत आहेत.आपल्याला योग्य अशी कोणतीही पद्धत प्रत्येकाने अंगिकारावी.

. भस्त्रिकेतील कुंभक यथाशक्ती व सुखावह होईल इतकाच करावा.

. भस्त्रिकेतील पहिल्या भागातील पूरक व रेचक हे इतर प्राणायामांतील पूरक-रेचकांसारखे सावकाश नसतात. ते झटके असतात. तसेच दुसऱ्या भागातील
पूरकदेखील इतर प्राणायांमातील पूरकापेक्षा गतिमान व प्रतिक्रियात्मक असतो हे मुद्दे विसरू नये

लाभ : १.

कपालभाती व इतर प्राणायाम यांचे सर्व लाभ काही फरकाने भस्त्रिकेतील प्राणायामाच्या अभ्यासाने प्राप्त होतात.

■उदरश्वसन व वक्षश्वसन या दोन्ही प्रकारच्या श्वसनांची काळजी घेतली जाते.

■दमा, श्वसनदोष, धाप लागणे, कमकुमत श्वसन, इत्यादी दोष नाहीसे होतात.

■उज्जायी, कपालभाती, अनुलोम-विलोम व भस्त्रिका यांचा अभ्यास एकमेकांनापूरक आहे.

■भस्त्रिका प्राणायाम सर्व ऋतूंत करण्यास योग्य आहे. त्याच्या अभ्यासाने वात, पित्त व कफ यांचे संतुलन होते.

■ पाचन क्रिया वुद्धिंगत व प्रभावी होते.

■आध्यात्मिक प्रगती होते.

■भावनात्मक जीवन काही अंशी संतुलित होते.

■मन शांत व एकाग्र होण्यास मदत होते.Bhastrika Pranayam 100 टक्के

Leave a Comment

%d bloggers like this: