Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020

Beginners Pranayama विशेष तत्त्वे: 2020काही आधारभूत नियम पाळले तर कोणालाही प्राणायामाचे लाभ मिळू शकतात.

(कोणत्याही प्राणायाम अभ्यासावर) आपले शरीर कशी प्रतिक्रिया देते याकडे जर लक्ष असेल तर या अभ्यासात घाबरण्यासारखे काहीच नसते.

ज्यावेळी आपण श्वसनक्रियेत बदल करतो आणि त्यावर शरीर देत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया एकतर आपल्याला कळतच नाहीत किंवा आपण त्यांच्याकडे डोळेझाक करतो, त्यावेळी समस्या उद्भवतात.

नवसाधकांनी

Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020
Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020

.एखाद्या चांगल्या योगशिक्षकाकडून प्राणायामाचे शिक्षण घ्या जो तुम्हाला मार्गदर्शन करेल व तुमच्या अभ्यासातील चुकाही दुरूस्त करेल. तुम्ही स्वत: एकट्याने अभ्यास करीत असाल तेव्हा प्रामाणिक, नियमित व पद्धतशीर रहा. तुम्ही नि:संशय यशश्री खेचुन आणाल व स्वास्थ्यसमृद्धी, जोम शांती व आनंद यांच्या दिशेने मार्गक्रमण कराल.

.प्रारंभी तुम्ही स्नायू ताणण्याचे व दीर्घ श्वसनाचे अभ्यास केलेच पाहिजेत.त्यामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते, ज्या स्नायूंचा उपयोग फारसा होत नाही त्यांच्यातील कठिणपणा कमी होतो व शरीराबरोबरच श्वसनाविषयीची सजगता वाढीस लागते.

.ज्या लोकांना श्वसनाचे प्रदिर्घ आजार आहेत, जसे की एम्फिसीमा,ब्रॉन्कायटीस, अस्थमा वगैरे त्यांनी थेट प्राणायाम अभ्यासास प्रारंभ करू नये. फुप्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी तसेच फासळ्या, पाठ व श्वासपटलाचे स्नायू मोकळे करण्यासाठी प्रथम काही आसने करावीत. श्वसनाचा विशेष अभ्यास व दीर्घ श्वसन करणे ही प्राणायाम अभ्यासाची पूर्वअट आहे.

.आपण स्वत:ला आपल्या मर्यादेबाहेर खेचतो, ही आपल्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या असते. स्वतःची क्षमता बलपूर्वक ओलांडल्याने आपल्याला लाभ मिळण्याऐवजी आपली हानीच अधिक होत असते. परिणामी आपण या अभ्यासातील रुची हरवून बसतो व अंततः हा अभ्यासच सोडून देतो. सावकाश व काळजीपूर्वक मार्गक्रमणा केल्याने हा अभ्यास एक आनंददायी अनुभव तर ठरतोच शिवाय आपल्याला त्याचा लाभही मिळतो.

.आपल्यापैकी बऱ्याच जणांना खोलवर श्वसन करतांना झटापट करावी लागते कारण सर्वसाधारणपणे या प्रकारचे श्वसन करण्याची आपल्याला सवय नसते संथपणे श्वसन चालू असतांना काही जणांना मधेच चटकन एक श्वास घ्यावासा वाटतो.श्वसन करतांना कोणत्याही प्रकारची झटापट केली जाता कामा नये. अडखळत श्वसन
करण्याचे टाळावे व आवश्यकता भासल्यास मधेच काही छोटे श्वास घ्यावेत. मतीतार्थ असा, की अभ्यास सुखावहतेनेच करावा.

.उच्छ्वास सोडतांना जर आपल्याला अडचण जाणवली किंवा उच्छ्वासाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असेल तर संपूर्ण प्राणायाम अभ्यासावर विपरित परिणाम होतो.उदरश्वसनाचा अभ्यास करून या समस्येवर मात करता येते.

.प्राणायाम व श्वसनाचा अभ्यास इतकाही ताणू नये, की आपल्याला कंटाळा येईल व आपण थकून जाऊ,

.अभ्यास करतांना घाई गडबड करू नये. अभ्यास करतांना त्याकडे पूर्णपणे लक्ष असावयास हवे.

.श्वास बलपूर्वक व झटापट करून रोखून ठेवण्याचा  प्रयास करू नका.

१०.अभ्यास अर्थपूर्ण व्हावा

११.एकसुरीपणा घालविण्यासाठी वेगवेगळ्या आसनाचा उपयोग करा.

१२.अभ्यास हळूवारपणे व अहिंसक रितीने केला जावा.

Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020 नवसाधकांनी धद्के देत, अनियमितता असलेले श्वसन करू नये. ते सहज, स्थिर व निरंतर होत जावे जोपर्यंत आपण श्वसन करू शकतो तोपर्यंत आपण योगसाधना – म्हणजे आसन व प्राणायाम करू शकतो. त्यामुळे समंजस व प्रेमळ शिक्षकाच्या देखरेखीखाली हा अभ्यास आपल्या दिनक्रमात समाविष्ट करू या.Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020

पूर्वापार चालत आलेले योगशास्त्राचे ज्ञान म्हणजे विविध प्रकारच्या प्राणायाम अभ्यासांचा खजिनाच आहे. आपण त्यापैकी केवळ काही मुलभूत अभ्यासांचाच विचार करू जे आपल्याला आपल्या अपेक्षांप्रमाणे लाभ प्रदान करतील – शरीर व मन या दोहोंचेही स्वास्थ्य या प्राणायाम अभ्यासाकडून आपल्या अपेक्षा असतात.

ज्या क्रमाने आपण मार्गक्रमणा करणार आहोत तो महत्त्वाचा आहे कारण कोणतीचि प्रगती कधीही बेशिस्तीने वा गलथानपणामुळे होत नसते. जेव्हा आपण आपल्या खोलीतील फर्निचर बदलण्याचे ठरवितो त्यावेळी प्रथम आपण जुन्या वस्तू दूर करतो.नंतर नवे फर्निचर घरात आणतो व त्यानंतर ते खोलीत व्यवस्थितपणे लावतो – जने ते दूर करणे, नवे आणणे व व्यवस्थित लावणे. क्रम महत्त्वाचा असतो.आपल्या बाबतीतही हा क्रम लागू होतो.

आपल्याला आवश्यक असणार्या मौलिक शक्तीला शरीरात जागा मिळण्यासाठी प्रथम आपल्याला आपले शरीर व मन यात दडलेले विष व टाकाऊ पदार्थ निष्कासित करणे आवश्यक असते. त्यानंतर या प्राणाचे शरीराच्या विविध भागात वाटप व्हावे लागते.

Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020 अभ्यास पुढील क्रमानुसार व्हावयास हवा.

१. अस्वच्छता दूर करणारे श्वसन: कपालभाती, भस्त्रिका.


२. ऊर्जा प्रदान करणारे श्वसन : अनुलोम विलोम, नाडी शुद्धी (नाकपुड्याची अदलाबदल करून केलेले श्वसन), उज्जायी श्वसन.


३.संतुलन साधणारे श्वसन : भ्रामरी (मधमाशीचा आवाज) व ‘ओम्‘ चा जप.

Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020 आपण जे काही करतो त्यामागे एखादे कारण असते. म्हणून आपण प्रत्यक्ष प्राणायामाच्या अभ्यासास प्रारंभ करण्यापूर्वी ‘मी हे का करावयास हवे’ या मागचे तर्कशास्त्र प्रथमजाणून घेणे महत्त्वाचे आहे.Beginners Pranayama विशेष तत्त्वे 2020

Leave a Comment

%d bloggers like this: