Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा

Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा: अनुलोम विलोम प्राणायाम हा श्वासाचा प्रवाह व पद्धत अधिक नैसर्गिक व स्वास्थ्यपूर्ण होण्यास आणि श्वास प्रमाणित व संतुलीत करण्यास उपयोग होतो.

श्वासोच्छ्वासाचा”व त्याचबरोबर मनाचा देखील समतोल साधण्यासाठी दोन्ही नाकपुड्यांनी आळीपाळीने श्वासोच्छ्वास करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे.

अनुकंपी व परानुकंपी मज्जासंस्थांत संतुलन साधून नाडीशुद्धी प्राणायामाद्वारे स्वास्थ्य मिळविता येऊ शकते.दोन्ही नाकपुड्यांनी आळीपाळीने श्वसन करण्याच्या क्रियेस योगिक साहित्यात विविध प्रकारे संबोधले जाते.

नाडी शोधनम्, नाडी शुद्धी व सुखपूर्वक प्राणायाम. या अभ्यासामुळे मौलिक प्राणशक्ती वाहून नेणाच्या नाड्या स्वच्छ व सशक्त होतात म्हणून त्यास नाडीशोधन प्राणायाम म्हंटले जाते.मन व शरीर शांत व विश्रांत करण्याचे हे एक फारच प्रभावी तंत्र आहे.


अनुलोम-विलोम किंवा नाड़ीशुद्धी व सुखपूर्वक प्राणायाम.या अभ्यासामुळे प्राणशक्ती वाहून नेणाऱ्या नाडया स्वच्छ व सशक्त होतात म्हणून त्यास,नाडीशोधन प्राणायाम म्हंटले जाते


मन व शरीर शांतविश्रांत करण्याचे हे एक फारच प्रभावी साधन आहे!

Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा अनुलोम विलोम प्राणायाम करतांना श्वसन एकावेळी एका नाकपूडीतून सावकाश, खोलवर व शांतपणे व्हावयास हवे. प्रत्येक श्वास पूर्ण श्वासाप्रमाणेच, फुप्फुसांची पूर्ण क्षमतावापरून, संथ व विश्रांत असावयास हवा.

नाकपुड्या बंद करण्यासाठी अंगठा व अनामिका किंवा करंगळीचा वापर केला जातो. श्वसनाच्या वेळी नाकपुड्यामधे अदलाबदल कशी केली जाते, त्यानुसार नाडीशोधन प्राणायाम तीन प्रकारे केला जातो,


Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा पहिल्या प्रकारात श्वास आत घेतल्यावर प्रत्येक वेळी कार्यरत असलेली नाकपूडी – म्हणजे ज्या नाकपूडीने श्वास घेतला जातो ती बदलली जाते. दुसऱ्या प्रकारात, एका नाकपूडीने श्वास बाहेर सोडला जातो तर दुसऱ्या नाकपूडीने श्वास आत घेतला जातो.Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा

अशाप्रकारे काही आवर्तने झाल्यावर श्वास घेण्याची व उच्छ्वास सोडण्याची नाकपूडी बदलली जाते. तिसऱ्या प्रकारात अनेक श्वास घेतल्यानंतर नाकपूडी बदलली जाते.या अभ्यासाच्या तीन पायऱ्या आहेत.


* नव्यानेच हा अभ्यास सुरू करणाऱ्यांनी श्वास घेण्याचा व उच्छ्वास सोडण्याचा कालावधी समान ठेवण्याचा प्रयास करावा व या श्वसन प्रकाराची केवळ सहा आवर्तने करावी. श्वसनाच्या या विशेष तंत्रात प्रत्येक नाकपूडीने श्वास आत घेतला किंवा बाहर सोडला, की एक आवर्तन झाल्याचे समजावे. म्हणजेच श्वास आत घेऊन सोडल्यावर दोन आवर्तने होतात.


* याप्रकारे सराव केल्यावर उच्छ्वासाचा कालावधी श्वास आत घेण्याच्या कालावधीपेक्षा दुपटीने सावकाशपणे वाढविला जातो.

Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा ध्यानाप्रमाणेच मन संथ व खोलवर चालू असलेल्या श्वसनावर चालू असलेल्यावर केंद्रित केले जाते.या प्राणायामाचा प्रगत अभ्यास दहा ते वीस मिनिट अथवा त्याहनही अधिक वेळा चालू ठेवला जातो.

यात श्वास आत घेतल्यावर किंवा श्वास बाहेर सोडल्यावर श्वास साठवून ठेवला जातो. जेव्हा श्वास आत घेणे व उच्छ्वास बाहेर सोडणे यांचे परस्परांशी प्रमाण १०:२० सेकद असे सहजपणे आरामात आणता येईल व या पद्धतीने बऱ्याच कालावधीपर्यंत अभ्यास केला जाईल त्याचवेळी व्यक्तीची श्वास रोखन ठेवण्याचा हा प्रगत अभ्यास करण्याची पात्रता असेल.

Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा
Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा

अनुलोम -विलोम श्वसन करण्याचे तंत्र

आरामदायी बैठकस्थितीत आसनस्थ व्हा. डावा हात मांडीवर विसावून ठेवा.
■उजव्या हाताची हळुवारपणे मुठ बांधा व अंगठा, करंगळी व शेजारील अनामिका ही बोटे मोकळी सोडा. हातांच्या या स्थितीस नासिका मुद्रा म्हणतात. जर ही स्थिती अडचणीची वाटत असेल तर तुम्ही अंगठा व पहिले बोट देखील वापरु शकता.
■प्रारंभी श्वास पूर्णपणे बाहेर सोडा. अंगठ्याने उजवी नाकपूडी हळूवारपणे बंद करा. डावी नाकपूडी उघडी असेल. डाव्या नाकपूडीने संथपणे श्वास आत घ्या.
■ हळूवारपणे अनामिकेने डावी नाकपूडी बंद करून उजव्या नाकपूडीने श्वास बाहेर सोडा
■आता उजव्या नाकपूडीने श्वास आत घेऊन ही नाकपूडी बंद करा. डाव्या नाकपूडीने श्वास बाहेर सोडा
नाकपूड्यांची अदलाबदल करीत श्वासोच्छ्वास करण्याचा हा अभ्यास चालू ठेवा. (श्वास बाहेर – श्वास आत – नाकपूडी बदल-श्वास बाहेर-श्वास आत-
नाकपूडी बदल) प्रारंभी ३ मिनिटे हा सराव करा. कालांतराने जशी तुमची शक्ती व क्षमता वाढत जाईल तसा तुम्ही सरावाचा कालावधी वाढवू शकता.
■हा अभ्यास करतांना डोके पुढे वाकवू नका तसेच नाक एका बाजूला झुकेल इतका नाकपूड्यांवर बोटांनी दाब देऊ नका.
हाताना मांड्यावर ठेवा व डोळे बंद करून स्थिर बसून रहा. श्वसन व मन कसे शांत व स्थिर झाले आहे.यांचे निरिक्षण करा.
उजव्या नाकपूडीने श्वास बाहेर सोडून अभ्यासास पूर्णविराम द्या.

अनुलोम-विलोम चे लाभ

Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा: (दोन्ही नाकपूड्यांद्वारे) समानतेने श्वसन केल्याने अनुकंपी व परानुकंपी मज्जासंस्था संतुलित होतात. त्यामुळे आपल्याला विश्रांत व संतुलित झाल्याचा अनुभव येतो.


दीर्घ उच्छ्वासामुळे परानुकपी मज्जासंस्था अनुकंपी मज्जासंस्थेपेक्षा प्रबल होते सर्वसाधारणपणे याच्या उलट स्थिती असते) त्यामुळे तणाव व व्याधी यांचे दुष्टचक्र भेदण्यास सहाय्य मिळते.शरीरातील व्याधीमुक्तीचे कार्य चालण्यासाठी आपण अधिक वेळ देतो व अशाप्रकारे आपल्या शारीरिक व मानसिक समस्या दूर होण्यास अनुकूलता निर्माण करतो.


शांतता प्रस्थापित होते व चिंता व तणाव कमी होतो.


नाकपूड्यांमधील अॅलर्जी, ब्रॉन्कारयटिस, अस्थमा यासारख्या श्वसनसंस्थेशी निगडित व्याधी निवारल्या जातात. या प्रकारच्या श्वसनामुळे केवळ नाकपुड्यांमधील श्वसनमार्गच मोकळा होतो, असे नव्हे तर फुप्फुसाचे कार्य अधिक चांगल्यारितीने होते व फुप्फुसातील वायूंचा वापर चांगल्यारितीने होतो.


तणावामुळे वाढलेला रक्तदाब, आम्लता व अन्य परिणामांची तीव्रता कमी होते.


शरीरातील जोम वाढतो कारण अधिक जीवनऊर्जा, प्राण मिळालेला असतो.जेव्हा नाड्या शुद्ध होतात त्यावेळी शरीर हलके होते; त्वचा कांतिमान होते; पचनक्रिया सुधारते; शरीर सडपातळ होते व मन:शांती अनुभवास येते.


मेंदूच्या दोन्ही बाजूंच्या अर्धगोलांची कार्यक्षमता सर्वोत्कृष्ट पातळीपर्यंत नेला गेल्याने मेंदूच्या कार्यात संतुलन निर्माण होते.Anulom-Vilom Pranayama BP 100% कमी करा

Leave a Comment

%d bloggers like this: