100% प्रकाशमय Meditation कसे करावे

100% प्रकाशमय Meditation कसे करावे
100% प्रकाशमय Meditation कसे करावे

100% प्रकाशमय Meditation कसे करावे शिव म्हणाले :जागे होताना, झोपताना, स्वप्न पाहताना, स्वत:ला प्रकाश समजा.चालता बोलताना, खातापिताना,काम करताना सातत्याने स्वत:ची आठवण अशी ठेवा की, तुम्ही प्रकाश आहात,100% प्रकाशमय Meditation कसे करावे

तुमच्या हृदयात एक ज्योत जळते आहे आणि तुमचे शरीर केवळ त्या ज्योतीभोवतीचे प्रकाशयुक्त वलय (ऑरा) आहे.

कल्पना करा: तुमच्या हृदयात एक ज्योत जळते आहे आणि तुमचे शरीर केवळ त्या ज्योतीभोवतीचे प्रकाशयुक्त वलय आहे, दुसरे काहीच नाही;

तुमचे शरीर केवळ ते प्रकाशयुक्त वलय आहे. या कल्पनेला तुमच्या मनात खूप खोलवर आणि तुमच्या जाणिवेत जाऊ द्या. तिला तेथे ठसवा.

याला वेळ लागेल; पण जर तुम्ही सतत तसा विचार केला, तशी भावना ठेवली,कल्पना केली, तर ते संपूर्ण दिवसभर ते लक्षात ठेवण्याची क्षमता तुमच्या मध्ये येईल.जेव्हा तुम्ही जागे होता, रस्त्यावर चालता, तेव्हा तुम्ही चालणारी ती ज्योत असता.


सुरुवातीला अन्य कुणाला या गोष्टीची जाणीव होणार नाही;

पण तीन महिने जर तुम्ही या विचारात सातत्य ठेवले तर त्यानंतर इतर लोकही याची दखल घेतील. इतर लोकांविषयीची जाणीव झाल्यानंतर तुम्ही सर्व ताणांपासून मुक्त व्हाल.

कुणालाच काहीही सांगू नका.फक्त अशी कल्पना करा की, एक ज्योत आहे आणि तुमचे शरीर त्याभोवतीचे प्रकाशयुक्त वलय आहे. भौतिक शरीर नाही, तर एक विद्युत शरीर, एक प्रकाशयुक्त शरीर असा विचार करत राहा-करत राहा.

जर तुम्हाला काहीतरी झाले आहे. त्यांना कसे जाणवेल की एक सूक्ष्म प्रकाश तुमच्याभोवती आहे. तुम्ही, जेव्हा त्यांच्याजवळ जाल,त्यांना स्पर्श केलात तर तो त्यांना उष्ण वाटेल तुमच्याबाबतीत काहीतरी विलक्षण घडल्याची जाणीव त्यांना होईल.

कुणालाही सांगू नका जेव्हा इतरांच्या हे लक्षात येईल.तेव्हा तुम्ही तणावमुक्त व्हाल, आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या टप्यात प्रवेश करू शकाल,त्यापूर्वी नाही.

100% प्रकाशमय Meditation कसे करावे दुसरा टप्पा असा आहे की, यात तुम्ही या कल्पनेचे स्वप्न पाहिले पाहिजे. आता तुम्हीते स्वप्नात पाहू शकता. ते वास्तव बनलेले आहे.100% प्रकाशमय Meditation कसे करावे

100% प्रकाशमय Meditation कसे करावे आता ती केवळ कल्पना उरलेली नाही.कल्पनेच्या माध्यमातून तुम्ही एक वास्तव उघड केले आहे. ते सत्य आहे. प्रत्येक गोष्ट प्रकाशनिर्मित आहे. तुम्ही प्रकाश आहात -या सत्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात- कारण पदार्थाचा प्रत्येक कण प्रकाश आहे. शास्त्रज्ञ सांगतात की, तो परमाणूंनी बनलेला आहे.दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. सर्वांचा स्रोत प्रकाशच आहे. तुम्ही सुद्धा घनरूपातील प्रकाश आहात. कल्पनेद्वारा तुम्ही हे सत्य फक्त उघड केले आहे. हे तुमच्यात खोलवर शोषून घ्या- आणि जेव्हा तुम्ही त्याने ओतप्रोत व्हाल तेव्हा तुम्ही ते स्वप्नातदेखील आणू शकाल, त्यापूर्वी नाही. त्यानंतर, झोप येत असताना त्या ज्योतीचा विचार करणे सुरू ठेवा, तिला पाहत रहा, तुम्ही प्रकाश असल्याची भावना ठेवा. तिची आठवण करत करत तुम्हाला झोप लागेल आणि ती आठवण सुरूच राहील. सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला काही स्वप्ने पडतील की, तुमच्यामध्ये एक ज्योत आहे, तुम्ही प्रकाश आहात. पुढे थोड्याच काळात स्वप्नातदेखील तुम्हाला तीच भावना होत राहील आणि ही भावना एकदा तुमच्या स्वप्नात प्रविष्ट झाली की, स्वप्ने अदृश्य होण्यास सुरुवात होईल. स्वप्नेकमी कमी होत जातील आणि झोप अधिक गाढ होईल. तुम्ही एक प्रज्वलित ज्योत असल्याचे, एक प्रकाश असल्याचे सत्य जेव्हा तुमच्या स्वप्नामध्ये प्रकट होईल. तेव्हा सर्व स्वप्ने अदृश्य होतील. स्वप्ने अदृश्य झाल्यानंतर ही भावना तुम्ही झोपेत बाळगू হकता, त्यापूर्वी कधीच नाही. आता तुम्ही दाराशी पोहोचला आहात. जेव्हा स्वप्ने अदृश्य झाली आहेत, आणि तुम्ही ज्योत असल्याचे स्मरण तुम्हाला होत आहे, तुम्ही ज्योत असल्याचे स्मरण तुम्हाला होत आहे, तुम्ही निद्रेच्या दाराशी आहात. या भावनेसह तुम्ही प्रवेश करू शकता, आणि तुम्ही ज्योत असल्याच्या भावनेसह असा प्रवेश एकदा केलात की, तुम्ही त्याविषयी झोपेतही जाणीव ठेवू शकता. आता झोप येईल ती फक्त तुमच्या शरीराला, तुम्हाला नाही.100% प्रकाशमय Meditation कसे करावे

योग आणि तंत्र यांनी मानवी मनाची विभागणी तीन भागात केली आहे हे लक्षात ठेवा जागे होणे, झोपणे, स्वप्न पाहणे असे मनाचे तीन भाग त्यांनी केले आहेत हे जाणिवेचे भाग नाहीत, तुमच्या मनाचे आहेत आणि जाणीव हा चौथा भाग आहे.तुमच्या पौर्वात्य देशात विचारवंतांनी त्याला कोणतेही नाव दिले नाही, ते केवळ त्याला चौथा, तुर्य असे म्हणतात. पहिल्या तीन भागांना नावे आहेत, ते ढग आहेत- एक जागृत होणारा ढंग, एक झोपणारा ढग, एक स्वप्न पाहणारा ढग. ते सर्व ढग आहेत आणि ते ज्या अवकाशात चलनवलन करतात- ते आकाश निनावी आहे, त्याला फक्त चौथा म्हटले गेले आहे.

100% प्रकाशमय Meditation कसे करावेत्या तीन अवस्थांच्या पलीकडे जाण्यासाठी, हे तंत्र तुम्हाला मदत करते. तुम्ही एक ज्योत, एक प्रकाश असण्याविषयी जर जागृत असाल तर झोप तुम्हाला येत नाही. तुम्ही जागृत आहात आता तुम्ही त्या ज्योतीभोवती रूप धारण केलेले आहे. झोपले आहे ते तुमचे शरीर, तुम्ही नाही.श्रीकृष्णांनी गीतेमध्ये हेच सांगितले आहे की, योगी कधीच झोपत नाहीत.

जेव्हा इतर सर्वजण झोपलेले असतात तेव्हा ते जागे असतात. याचा अर्थ त्यांची शरीरे कधीच झोपत नाहीत असा नाही त्यांची शरीरे झोपतात- पण फक्त शरीरे झोपतात. शरीरांना विश्रांतीची आवश्यकता असते, जाणिवेला विश्रांती लागत नाही;

कारण शरीरे ही यंत्रे आहेत, जाणीव यंत्र नाही. शरीरांना इंधनाची गरज आहे, विश्रांतीची गरज आहे. म्हणूनच त्यांचा जन्म होतो ते तरुण होतात, मग ते वृद्ध होतात आणि मरण पावतात.

जाणिवेचा कधीच जन्म होत नाही, ती कधी वृद्ध होत नाही, कधी मरण पावत नाही. तिला इंधनाची, विश्रांतीची आवश्यकता नाही. ती एक विशुद्ध शक्ती आहे, चिरस्थायी शाश्वत शक्ती, ज्योत आणि प्रकाशाची प्रतिमा जर निद्रेच्या दारातून तुम्ही आत नेऊ शकलात तर त्यानंतर तुम्ही कधीही झोपणार नाही, तुमचे फक्त शरीर विश्रांती घेईल आणि तुमचे शरीर झोपले असल्याचे तुम्हाला समजून येईल.

100% प्रकाशमय Meditation कसे करावेएकदा हे घडले की, तुम्ही चौथा बनता. आता जागे होणे, झोपणे आणि स्वप्न पाहणे हे केवळ मनाचे भाग उरतात. ते भाग आहेत आणि तुम्हा चौथा भाग बनला आहात. असा भाग की, जो त्या तिन्हीच्या मधून जाणारा असूनही त्यांच्यापैकी कुणीही नाही.100% प्रकाशमय Meditation कसे करावे

1 thought on “100% प्रकाशमय Meditation कसे करावे”

Leave a Comment

%d bloggers like this: