सोनेरी प्रकाशावर Meditation

सोनेरी प्रकाशावर Meditation
सोनेरी प्रकाशावर Meditation

सोनेरी प्रकाशावर Meditation हे ध्यान तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा करा. पहाटेची वेळ यासाठी सर्वोत्तम आहे.झोपेतुंन जाग येण्याच्या क्षणी सावध होऊन हे ध्यान “वीस मिनिटे” करा.

जागे झाल्यावर सर्वप्रथम ही गोष्ट करा. त्यासाठी गादीवरून उठण्याची गरज नाही.
जाग आल्यावर लगेचच गादीवरच हे ध्यान करा. कारण जेव्हा तुम्ही झोपेतून जागे होता तेव्हा तुम्ही अतिशय संवेदनक्षम आणि ग्रहणक्षम असता.

तुम्ही अतिशय टवटवीत असता आणि त्यामुळे ध्यानाचा प्रभाव अतिशय खोलवर जाईल. जेव्हा तुम्ही झोपेतून नुकतेच जागे होत असता, सगळी पृथ्वी जागी होत असते, तेव्हा पूर्ण जगावर जागी होणाऱ्या ऊर्जेला भरती आलेली असते त्या भरतीचा उपयोग करून घ्या. ती संधी चुकवू नका.

सोनेरी प्रकाशावर Meditation सर्व प्राचीन धर्मांमध्ये सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जायची. कारण सूर्याच्या उदय हा सर्व शक्तींचा उदय आहे. त्याक्षणी त्या शक्तीच्या लाटेवर तुम्ही सहजतेने स्वार होऊ হकता, ते सुलभतेने होईल.सोनेरी प्रकाशावर Meditation

संध्याकाळी ते कठीण होईल, त्यावेळी शक्ती क्षीण होत जातात, अशा वेळी तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध झगडावे लागेल. पहाटेच्या वेळी तुम्ही प्रवाहासोबत जाल.

सोनेरी प्रकाशावर Meditation म्हणून ध्यानाची सुरुवात करण्याची सर्वोत्तम वेळ ही पहाटेची आहे.तुम्हाला झोपेतून नुकतीच जाग येत असण्याची, तुम्ही अर्धवट झोपेत असण्याची वेळ आहेसोनेरी प्रकाशावर Meditation

याची पद्धतही खूप वेगळी आहे. कोणत्याही विशिष्ट शरीरस्थितीची,योगासनाची,स्नानाची कशाचीच आवश्यकता नाही.बिछान्यात जसे तुम्ही झोपता, तसे पाठीवर पडून राहा.

डोळे मिटून घ्या. जेव्हा श्वास आत घेता, तेव्हा कल्पनेने असे दृश्य पाहा की, एक तेजस्वी प्रकाश तुमच्या मस्तकातून शरीरात प्रवेश करतो आहे. जणू काही सूर्य तुमच्या मस्तकाजवळच उगवतो आहे.

सोनेरी प्रकाशावर Meditation सोनेरी प्रकाश तुमच्या मस्तकात ओतत आहे. तुम्ही अगदी पोकळ आहात आणि तो सोनेरी प्रकाश मस्तकात ओतला गेला आहे,तो अजून खाली, खाली, खोलवर जात आहे

आणि तसा वाहत वाहत तुमच्या पायाच्या बोटांमधून बाहेर पडत आहे. श्वास आत घेतात हे काल्पनिक दृश्य पहा.सोनेरी प्रकाशावर Meditation.

श्वास बाहेर सोडताना दुसऱ्या दृश्याची कल्पना करा. तुमच्या पायाच्या बोटांद्वारे तुमच्या शरीरात अंधाराचा प्रवेश होत आहे. गडद अंधाराची एक नदी पायांकडून वरच्या दिशेने तुमच्या शरीरात वाहत येते आणि मस्तकातून बाहेर पडते आहे.

हे कल्पना दृश्य पाहण्यासाठी संथ आणि खोल श्वसन करा. तुम्ही खोल आणि संथ श्वसन करू शकता.कारण त्यावेळी शरीर स्वस्थ आणि शांत असते.पुन्हा सांगतो : श्वास आत घ्या, तुमच्या मस्तकातून सोनरी प्रकाशात आत येऊ द्या,कारण तेथे ‘सुवर्ण पुष्प’ त्याच्या प्रतीक्षेत आहे.

तो सोनेरी प्रकाश मदन करेल. तो तुमच्या संपूर्ण शरीराला शुद्ध करून सर्जनतेने भरून टाकेल. ही पुरुषशक्ती आहे.त्यानंतर श्वास बाहेर सोडताना, अंधाराला अंधारासारख्या गडद अंधाराला, नदीप्रमाणे तुमच्या पायांच्या बोटांमधून शरीरात येऊ द्या. त्याला वरच्या दिशेने वाहू द्या.

ही स्त्रीशक्तीआहे. ती तुमची सांत्वना करेल, तुम्हाला ग्रहणक्षम बनवेल, तुम्हाला शांत करेल,तुम्हाला विश्रांती देईल आणि तिला मस्तकातून बाहेर जाऊ द्या. मग पुन्हा श्वास आतघ्या, त्याबरोबर सोनेरी प्रकाश आत येईल.

भल्या पहाटे वीस मिनिटे हे ध्यान करा. यासाठी दुसरी चांगली वेळ म्हणजे तुमची रात्री झोपतानाची वेळ होय. बिछान्यात पडून राहा. काही मिनिटे विश्राम करा.

झोप आणि जागेपणा यामध्ये तुम्ही हेलकावे खात असल्याची जाणीव जेव्हा तुम्हाला होऊ लागेल.तेव्हा ध्यानास सुरुवात करा. आणि वीस मिनिटे ते सुरू ठेवा. त्या दरम्यान जर तुम्हाला झोप लागली तर फारच उत्तम; कारण त्याचा प्रभाव तुमच्या अबोधावस्थेत टिकून राहाले आणि कार्य करीत राहील.

सोनेरी प्रकाशावर Meditation तीन महिन्यांनंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल: मूलधार चक्रावर,साठणारी शक्ती तेथे साठवली जात नसून ती वरच्या दिशेने जात असेल.सोनेरी प्रकाशावर Meditation

1 thought on “सोनेरी प्रकाशावर Meditation”

Leave a Comment

%d bloggers like this: