वर्तमान क्षण हाच आपला आहे

IMG_20200613_193049

वर्तमान क्षण हाच आपला आहे मन नेहमीच वर्तमान नाकारीत असतं, वर्तमान क्षणापासून ते पळ काढत.दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास तुम्ही जितकं मनाशी नातं सांगाल तितका त्रास तुम्हाला होतो. हेच आणखी योग्य रीतीनं असं सांगता येईल : तुम्ही वर्तमान क्षणाची जाणीव ठेवा, त्याचा आदर करा. तितकं तुम्ही वेदनेतून मुक्त व्हाल,यातनांतून मुक्त व्हाल. अहंकारी मनाच्या गुलामीतून मुक्त व्हाल.तुमच्या स्वत:साठी किंवा इतरांसाठी वेदना निर्माण करायच्या नसतील,तुमच्यात उपस्थित असलेल्या गत वेदनांत भर टाकायची नसेल तर त्याला महत्त्व देऊ नका. त्याच्यासाठी वेळच देऊ नका, गतकाळाचा उपयोग एखादा व्यावहारिक प्रश्न सोडविण्यापुरताच करा. असं जे आपण गतकाळात अडकतो ते थांबवायचं कसं?

वर्तमान क्षण हाच आपला आहे याची खोलवर जाणीव असूद्या की, तुमच्याजवळ जे काही आहे, तो आहे वर्तमान क्षण, आताला, वर्तमानाला तुमच्या जीवनाचे प्राथमिक केंद्रस्थान बनवा.याआधी तुम्ही भूत आणि भविष्यकाळाच्या चिंतनात मग्न होता आणि वर्तमानाला धावती भेट देत होता, तसे आता तुमचे वास्तवस्थान वर्तमान असूद्या आणि तुमच्या जीवनातील व्यावहारिक घटकांना हाताळत असताना आवश्यक तेव्हाच भूत व भविष्याची धावती भेट घ्या.वर्तमान क्षणाला नेहमीच “हो” म्हणा.


    काळ या भ्रामक कल्पनेचा अंत करा

 एक सूत्र लक्षात घ्या. वेळ ही भ्रामक आणि फसवी कल्पना आहे;तिचा अंत करा. कारण काळ आणि मन एकमेकांशी अत्यंत निगडितअसतात. काळ ही कल्पना मनातून काढून टाका आणि पाहा की,काळ स्तब्ध झाला आहे, थांबला आहे; मात्र तुम्ही काळाशी मनाचा संबंध ठेवायचंच ठरविलं तर ती वेगळी बाब आहे.


तुम्ही मनाशी एकरूप होऊ लागला, तर काळाच्या व्यूहात अडकता आणि मग तुम्हाला स्मृती आणि भावी अपेक्षा यांच्याच सोबतीनं राहावं लागतं. यामुळं तुमचं मन सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळ याच्या चक्रात गुंततं आणि त्यामुळे नेमकं वर्तमानकाळाचं तुमचं भान सुटतं. वर्तमानकाळात जगावं असं तुम्हाला वाटतच नाही. हा जो दबाव तुमच्या मनावर असतो, तो यामुळं असतो की,

भूतकाळ तुम्हाला तुमची ओळख देतो आणि भविष्यकाळ मुक्तीची आशा लावतो; परंतु एक लक्षात ठेवा, की, हे दोन्ही मोहमाया आहेत,खोटी आशा आहे.तुम्ही भूत आणि भविष्यकाळ यात जेवढं गुंताल, तितकं जास्त वर्तमान
क्षणाला पारख व्हाल आणि खरंतर वर्तमान क्षणच मूल्यवान

स्वातंत्राची एकच गुरूकिल्ली आहे ती म्हणजे वर्तमानात जगणे सतत वर्तमान क्षणाचे भान ठेवण. वर्तमानच तुम्हाला मुक्तेतेचा आनंद देईल.असतो.वर्तमान क्षण अगदी मूल्यवान का असतो ? एक कारण म्हणजे तोच क्षण सत्य असतो. जे काही आहे ते वर्तमान क्षणातच आहे. अखंडित वर्तमान हा असा अवकाश आहे की, त्यात तुमचं संपूर्ण आयुष्यच तुमच्यापुढं दर्शित होतं.हाच एक घटक शाश्वत आहे. जीवन जे काही आहे ते आता आणि या क्षणीआहे. वर्तमानात आहे. तुमचं वर्तमान जीवन अस्तित्वात नव्हतं अस कधीचपूर्वी झालेलं नाही, भविष्यात तसं होणारही नाही.दुसरं म्हणजे, वर्तमान क्षणच तुम्हाला मनाच्या बंदिस्तीतून मुक्त करतो मनापलीकडं नेतो. तोच एक बिंदू आहे, जो तुम्हाला काळविरहित आणि निराकार अस्तित्वाच्या साम्राज्यात नेतो.वर्तमानाच्या पलीकडे काही असतं. याचा कधीतरी अनुभव तुम्हाला आला आहे का? त्याची कल्पना तरी तुम्हाला जाणवली का? पुढं अस कधी होईल असे तुम्हाला वाटत का? वर्तमान क्षणच पूर्ण सत्य असल्यामुळे त्याच्या अल्याड-पल्याड काहीतरी घडेल असं तुम्हाला वाटतं का ? उत्तर सरळ सरळ नकाराथीआहे.भूतकाळात काहीच कधी घडलं नसतं. जे घडतं ते वर्तमानात, याक्षणी,आता. भविष्यातही काही घडणार नाही. जे घडणार ते आता, या क्षणी.मी जे सांगतोय त्याचं सारं मनाच्या साहयानं कधीच समजून घेता येणार नाही. तुम्हाला समज येताच तुमची जाणीव मनापासून तुटून तुमच्या अस्तित्वाकडं जाईल.काळाकडून वर्तमानाकडं येईल, एकदम तुम्हाला सगळं चैतन्यमयवाटायला लागेल, ऊर्जामय वाटायला लागेल. तुमच्या अस्तित्वाचं भान तुम्हाला येईल,वर्तमान क्षण नाकारणे आणि वर्तमान क्षणाला अडविणे ही जुनी पद्धत तोडली पाहिजे. कधी भूतकाळ तर कधी भविष्यकाळ तुमच्या चित्ताचा गरज नसताना ताबा घेत असतो. त्यांतून तुम्ही लक्ष काढून घेण्याची सवय करा. दैनंदिन जीवनात काळाच्या बंधनातून शक्य तितके मुक्त व्हा, बाहेर पडा.तुमचे लक्ष कधी भूतकाळात तर कधी भविष्यात कसं भरकटतं हे पाहत राहा. जे काही तुम्ही पाहाल त्याचं विश्लेषण करू नका किंवा त्याच मूल्यमापनही करू नका. विचार पाहा, भावना पाहा, प्रतिीक्रिया पाहा. मात्र त्यात व्यक्तिशः गुंतू नका, ही आपली वैयक्तिक समस्या आहे असे मानू नका. मग तुम्ही जे पाहता त्यापेक्षा वेगळच शक्तिमान असं काहीतरी तुम्हाला जाणवायला लागेल तुमच्या मनाच्या तळाशी जे काही आहे ते केवळ पाहणं, नि:स्तब्ध पाहनं त्याचा मौन साक्षीदार बनणं एवढंच तुम्ही करायचं.तुम्ही मनाला त्रयस्थपणे, साक्षीभावाने पहायला लागा म्हणजे मनाला मिळणारी शक्ती कमी व्हायला लागेल. मनाशी तुम्ही जितक एकरूप व्हाल तितका काळ बलवान बनेल. मनाला पाहत राहा, म्हणज ती स्थिती कालातीत परिमाणाची निर्मिती करू लागेल. मनाची शक्ती अशा प्रकारे काढून घेतली तर ना भूतकाळ राहतो, ना भविष्यकाळ. तेव्हा तम्ही.वर्तमानात येता. वर्तमानात येणं, वर्तमानक्षण जगणं याची एकदा का जाणीव झाली की, काळाच्या चौकटीबाहेर पडणं सुलभ बनतं, भूतकाळ किंवा भविष्यकाळ तुमच्यावर मात करीत नाही. उलट गरज भासेल तेव्हा तेवल्यापुरतंच काळाचं भान तुम्ही ठेवाल आणि तुम्ही वर्तमान क्षणात खोल जाल.काळाच्या बंधनात अडकलेल मन हीच मूळ समस्या आहे.

1 thought on “वर्तमान क्षण हाच आपला आहे”

Leave a Comment

%d bloggers like this: