प्राणायामातील तंत्र Jalandhar Bandh

प्राणायामातील तंत्र Jalandhar Bandh
प्राणायामातील तंत्र Jalandhar Bandh

प्राणायामातील तंत्र Jalandhar Bandh: प्राणायामाची तंत्रे समजण्यासाठी मुद्रा आणि बंध याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

मुद्रा या संस्कृत शब्दाचा अर्थ बंद करणे, कुलूप असा आहे. शरीराची निरनिराळी रंध्रे बंद करण्याकरिता घेतलेल्या अंगस्थिती असा त्याचा अर्थ होतो आणि या कृतीमध्ये हाताच्या बोटांचा वापर करून निरनिराळे हावभाव करावे लागतात.

बंध म्हणजे एकमेकांना जोडणे किंवा पकडून ठेवणे. यामध्ये शरीराचे कोणतेही अवयव किंवा इंद्रिये ठराविक स्थितीत ठेवून नियंत्रणाखाली आणली जातात.

विजेचे उत्पादन केल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी रोहित्र (tramsformer),फ्यूज, स्विच व विद्युतरोधक (insulator ) पदार्थानी वेष्टिलेल्या तारा या सर्वांची गरज भासते.तसे केले नाही तर विद्युतप्रवाह प्राणघातक ठरतो.

योग्याच्या शरीरात प्राणायामामुळे प्राणाचा प्रवाह सुरू झाला म्हणजे चैतन्य वाया न जाऊ देता व नुकसान केल्याशिवाय ते योग्य ठिकाणी वाहून नेण्याकरिता योग्याला बंधाचा उपयोग करावा लागतो.

बंधाशिवाय केलेल्या प्राणायामाच्या सरावामुळे प्राणाच्या प्रवाहात व्यत्यय येतो व मज्जासंस्थेला इजा पोहोचते.


हठयोगात वर्णन केलेल्या अनेक मुद्रांपैकी जालंधर, उड्डीयान व मूलबंध या तीन मुद्रा प्राणायामाकरिता आवश्यक आहेत. त्यांच्यामुळे चैंतन्याचे वितरण नीट तऱ्हेने होते, शरीरात हवा प्रमाणाबाहेर खेळत नाही आणि चैतन्य वाया जात नाही. प्राणायामामध्ये या बंधांचा सराव सुप्त असलेली कुंडलिनी जागृत करून त्यातील चैतन्य सुषुम्ना नाडीद्वारे वर पाठविण्यासाठी उपयुक्त असतो. समाधी स्थिती अनुभवण्याकरिता त्यांचा वापर करणे अत्यंत उपयोगी आहे.

जालंधर बंध

साधकाने सर्वप्रथम जालंधर बंध आत्मसात केला पाहिजे. जाल म्हणजे जाळे किंवा जाळी होय. सर्वांगासनाचे वेळी जेव्हा हनुवटी उरोस्थीवर टेकलेली असते तेव्हा या बंधावर प्रभुत्व मिळवता येते.


(अ) सुलभ रीतीने बसता येईल अशा आसनामध्ये बसावे. उदाहरणार्थ, सिद्धासन, स्वस्तिकासन,भ्रदासन, वीरासन, बद्धकोणासन किंवा पद्मासन

(आ) पाठ सरळ ठेवावी, उरोस्थी( फासांना जोडणार हाड़ आणि ते मानवी शरीराच्या छातीच्या मध्यभागी असते.)उर:पंजराचा पुढील भाग वर उचलावा.


(इ) ताण पड़ू न देता मानेची बाजू लांब करून पाठीमागचे खांद्याचे हाड आत आणावेत. मानेचा व उर:पोकळीचा कणा अंतर्वक्र ठेवावा आणि मस्तक पाठीमागून छातीच्या बाजूला झुकवावे.


(ई) घसा आकुंचित करू नये किंवा मानेच्या स्नायंवर ताण देऊ नये. मान पुढे किंवा खाली वाकवून अथवा मागे वळवून तिच्यावर ताण देता कामा नये.मानेचे व घशाचे स्तायू सैल ठेवावे

wp 1594611798818985345941254956388
wp 15946118589594063701091670878318


(उ) डोके अशा पद्धतित खाली आणावे की जबड्चाच्या दोन्ही कडा समतोलपणे दोन जत्रुच्या( गळ्याच्या खाली आणि छातीच्या वरच्या बाजूला धडाच्या वरील भागातील दोन्ही बाजूंचे चंद्रकोर हाडे.)मधील जागेत व्यवस्थित बसू शकतील.

wp 15946119190058865946238481960315


(ऊ) हनुवटी एका किंवा दुस-्या वाजूला जास्त ताणू नये. त्याचप्रमाणे मान एका बाजूला वाकवू नये.तसे केल्याने ताण पड़ून वेदना होतात व हे फार वेळ टिकते, लवचिकता जशी जशी वाढते तशी तशी मान जास्त खाली येऊ
लागते,


(ए) हनुवटी छातीवर जोर वापरून खाली आणू नये.परंतु उर: पोकळी वरती उचलून खाली थेट असलेल्या हनुवटीला मिळू द्यावी.

wp 15946119665759034178982982608442
img 20200712 2018401194445793299327061


(ओ) हनुवटी छातीवर टेकली असताना बरगड्या आत ओढू नयेत.


(ऐ) शिराचा मध्यविंदू व हनुवटी आणि उरोस्थीचा मध्य, नाभी व गुद्वार आणि जननेद्रिये यामधील जागा (विटप) ही सर्व एका रेषेत येऊ द्यावीत.


(औ) कानशिलावरील त्वचा सैल ठेवावी, डोळे आणि कान निश्चल ठेवावेत.


(अं) हा जालंधर बंध होय,

               परिणाम(लाभ)


सौर जाल (solar plexus) शरीराच्या मध्यावर वसलेले आहे. योग शास्त्राप्रमाणे ते जठराग्नीचे स्थान आहे. त्याच्यामुळे अन्न पचन होऊन उष्णता तयार होते. चंद्रजाल मेंदूच्या मध्यभागी आहे.

त्यापासून शीतलता निर्माण होते. जालंधर बंध करून मानेभोवतीच्या नाड्या बंद केल्यामुळे चंद्रजालाचे शीतल चैतन्य खाली जाण्यावे बंद होते आणि सूर्यजालापासून उत्पन्न झालेल्या उष्ण चैतन्यापासून त्याचा बचाव होतो. या कारणास्तव जीवनामृताचा संचय होतो आणि आयुष्य वाढते. या बंधामुळे इडा व पिंगला या नाड्यावरही दाब आल्यामुळे प्राण सुषुम्ना नाडीतून वाहतो 

wp 15946149655921156390661084289500
सौर जाल (solar plexus)

जालंधर बंधामुळे नासिकामार्ग मोकळे होतात. त्याचमुळे रक्त आणि प्राण (चैतन्य) यांचा हृदय, मस्तक व मान यामघील अंतर्सावी ग्रंथीमधील (थायरॉइड व पॅराथायरॉईड) प्रवाह नियमित होतो.

जालंघर बंध केल्याशिवाय जर प्राणायाम केला तर हृदय,मेंदू,डोळे व आतील कान यांच्यावर दाब येऊन चक्कर येण्याचा संभव असतो.या बंधामुळे मेंदूला आराम मिळतो आणि मन, बुद्धी व अहंकार यांना नम्रता येते.


प्राणायामातील तंत्र Jalandhar Bandh टीप,ज्यांची मान वाकत नसेल त्यांनी त्रास न घेता मस्तक शक्य तेवढे खाली आणावी.प्राणायामातील तंत्र Jalandhar Bandh

Leave a Comment

%d bloggers like this: